Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sonal Chauhan: दुबई विमानतळावर अडकली बॉलीवूड अभिनेत्री; थेट पंतप्रधान मोदींकडे केले मदतीचे आवाहन

इराणवरील क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर दुबई विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. आणि याच दरम्यान बॉलीवूड अभिनेत्री सोनल चौहान दुबई विमानतळावर अडकली आहे. अभिनेत्रीने थेट भारत सरकारकडे मदतीचे आवाहन केले.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 01, 2026 | 10:47 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • दुबई विमानतळावर अडकली बॉलीवूड अभिनेत्री
  • थेट पंतप्रधान मोदींकडे केले मदतीचे आवाहन
  • सोनल चौहानने नक्की काय म्हटले?
 

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर परिस्थिती बिकट होत चालली आहे. या तणावाचा आता थेट मनोरंजन उद्योगावर परिणाम झाला आहे. अभिनेत्री आणि गायिका सोनल चौहान दुबई विमानतळावर अडकली असल्याचे समोर आले. आणि अभिनेत्रीने एक्स अकाउंटवर पोस्ट करत पंतप्रधान मोदींना आवाहन केले आहे. अभिनेत्रीचीही पोस्ट आता सोशल मीडियावर चर्चेत आहे.

अमेरिका-इस्रायल हल्ल्यांनंतर, इराण प्रत्युत्तर देण्याच्या स्थितीत आहे. इराण थेट आखाती प्रदेशातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांनी लक्ष्य करत आहे. दुबईमध्येही हल्ले केले जात आहेत. परिणामी, दुबई विमानतळ आणि अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सर्व उड्डाणे निलंबित करण्यात आली आहेत.

Ramayana ला मिळालं जागतिक व्यासपीठ; रणबीर कपूरच्या चित्रपटाचा ट्रेलर San Diego Comic-Con मध्ये होणार लाँच

अभिनेत्री-गायिकेचे पंतप्रधानांना आवाहन

या कठीण काळात, अभिनेत्री आणि गायिका सोनल चौहान यांनी पंतप्रधान मोदींना टॅग करून मदतीचे आवाहन केले आहे. अभिनेत्रीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आदरणीय पंतप्रधान मोदी, सध्या सुरू असलेल्या संकटामुळे मी दुबईमध्ये अडकली आहे. विमाने रद्द करण्यात आली आहेत आणि भारतात परतण्याचा कोणताही स्पष्ट मार्ग नाही. घरी परतण्यासाठी सुरक्षित प्रवासासाठी मी सरकारकडून आदरपूर्वक मार्गदर्शन मागते. कोणत्याही मदतीबद्दल मी आभारी आहे.”

 

Hon’ble PM @narendramodi ji,
I am currently stranded in Dubai due to the ongoing crisis, with flights cancelled and no clear way to return to India. I respectfully seek the Government’s guidance for a safe journey home
Grateful for any support extended🙏🏻🇮🇳@MEAIndia @IndiainDubai
— SONAL CHAUHAN (@sonalchauhan7) February 28, 2026

इराणच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईनंतर, जगातील सर्वात व्यस्त विमानतळ, दुबई इंटरनॅशनल (DXB) आणि अल मकतूम इंटरनॅशनल (DWC) अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहेत. या अचानक झालेल्या व्यत्ययामुळे हवेत अडकलेल्या हजारो विमान प्रवाशांमध्ये सोनल चौहानचाही समावेश आहे.

BO Collection : पहिल्या दिवशी 75 लाख तर, दुसऱ्या दिवशी कोटींची कमाई; The Kerala Story 2 चा सिनेमागृहात कल्ला

सोनल चौहान कोण आहे?

सोनल चौहान ही एक प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, मॉडेल आणि गायिका आहे जिने तिच्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांमध्ये एक खास ओळख निर्माण केली. सोनल चौहानला २००८ च्या “जन्नत” चित्रपटाने प्रचंड प्रसिद्धी मिळाली, ज्यामध्ये तिने इमरान हाश्मीसोबत अभिनय केला होता. आजही तिला “जन्नत गर्ल” म्हणून प्रेमाने आठवले जाते. सोनल केवळ अभिनयापुरती मर्यादित नाही. ती एक उत्तम गायिका देखील आहे, तिने तिच्या “अदा” चित्रपटात गाणे देखील गायले आहे. सोनल ही केवळ बॉलीवूडमध्येच नाही तर दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही एक लोकप्रिय चेहरा आहे. काही काळापूर्वी, सोनल प्रभास अभिनीत मेगा-बजेट चित्रपट ‘आदिपुरुष’ आणि नागार्जुनच्या ‘द घोस्ट’ चित्रपटात दिसली होती.

Web Title: Us israel strike iran bollywood actress sonal chauhan stranded at dubai airport appeals pm modi for help

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 10:47 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Raj Thackeray: ‘हे सरकार मानसिक रुग्ण, त्यांनाच हॉस्पिटलात भरती करा’; जंतर-मंतरवरील लाठीमारावर राज ठाकरे आक्रमक
1

Raj Thackeray: ‘हे सरकार मानसिक रुग्ण, त्यांनाच हॉस्पिटलात भरती करा’; जंतर-मंतरवरील लाठीमारावर राज ठाकरे आक्रमक

‘पंतप्रधानांनी देशातील विद्यार्थ्यांची माफी मागावी’; लाठीमारावरून राहुल गांधींचा थेट हल्ला; RLM रुग्णालयात जखमींची घेणार भेट
2

‘पंतप्रधानांनी देशातील विद्यार्थ्यांची माफी मागावी’; लाठीमारावरून राहुल गांधींचा थेट हल्ला; RLM रुग्णालयात जखमींची घेणार भेट

Prakriti Nautiyal : सिनेसृष्टीतून आणखीन एक जोडपं दुरावलं! घटस्फोटासाठी दाखल केला अर्ज, लग्नाला झालीत दोन वर्ष
3

Prakriti Nautiyal : सिनेसृष्टीतून आणखीन एक जोडपं दुरावलं! घटस्फोटासाठी दाखल केला अर्ज, लग्नाला झालीत दोन वर्ष

Akshay Kumar : वाटलं original निघाला remake! खिलाडीचा ‘हैवान’, ‘या’ दाक्षिणात्य सिनेमाची कॉपी
4

Akshay Kumar : वाटलं original निघाला remake! खिलाडीचा ‘हैवान’, ‘या’ दाक्षिणात्य सिनेमाची कॉपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.