
फोटो सौजन्य AI
पाकिस्तान पीपल्स पार्टीचे चेअरमन बिलावल भुट्टो POK मध्ये सुरु असलेल्या आंदोलनावर विधान केलेले आहे . ज्याच्यात सांगितले आहे कि पाकिस्तान सरकार ने सुरु असलेले आंदोलन त्वरित शांत करावे , तसेच एका स्वतंत्र आयोगाची स्थापना करून आंदोलनाची चौकशी करण्याचे आवाहन केले आहे . मुझफ्फराबादमध्ये पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या नेत्यांशी बोलताना बिलावल भुट्टो झरदारी यांनी पीओकेमध्ये झालेल्या हिंसाचाराला राष्ट्रीय शोकांतिका म्हटले.त्यांनी या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी आणि पुढील मार्ग सुचवण्यासाठी सर्व पक्षांच्या सहमतीने एक स्वतंत्र आयोग स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला. त्यांनी सांगितले कि , गेल्या एका महिन्यापासून आझाद काश्मीरची परिस्थिती खूप चिंताजनक आहे. प्रत्येक काश्मिरी चिंतेत आहे आणि प्रत्येक पाकिस्तानी चिंतेत आहे.ते पुढे म्हणाले, ही परिस्थिती जेवढी जास्त काळ चालेल, तेवढं काश्मीरच्या मुद्द्याला आणि पाकिस्तानच्या प्रतिष्ठेला जास्त नुकसान होईल.
बिलावल भुट्टो म्हणाले, मी सर्व संबंधित पक्षांचा एक स्वतंत्र आयोग स्थापन करण्याचा प्रस्ताव देतो. या आयोगाला सध्याच्या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी, संबंधित तथ्ये शोधण्यासाठी, सर्व पक्षांच्या तक्रारी आणि भूमिका समजून घेण्यासाठी, प्रलंबित राजकीय, कायदेशीर आणि प्रशासकीय मुद्द्यांची समीक्षा करण्यासाठी आणि पुढे जाण्याचा निष्पक्ष आणि कायमस्वरूपी मार्ग सुचवण्यासाठी पुरेसे अधिकार दिले जावेत. बिलावल म्हणाले की अशांततेच्या काळात झालेला प्रत्येक मृत्यू ही राष्ट्रीय शोकांतिका आहे आणि त्यांनी मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या.
भुट्टो यांनी सांगितले कि , प्रत्येक आरोपाची चौकशी हि निपक्ष पणे करण्यात यावी . त्यांनी पुढे असे सांगितले कि या आंदोलनामुळे हाती फक्त काश्मिरी जनता आणि सरकार यांचा संघर्ष एवढाच होईल . पाकिस्तानची आर्मी हि नेहमीच जनतेचा विचार करूनच काम करत असते . शांतीचा प्रस्ताव मान्य असल्यास भुट्टो हा सगळा मुद्दा पंतप्रधान शहाबाज समोर मांडतील त्याआधी आंदोलनकर्त्यांनी विरोध प्रदर्शन आणि लॉन्ग मार्च बंद करावेत . आणि यातून मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं .
तुफान बॉम्बिंग , अमेरिकेची इराणच्या चाबहार बंदरावर ऍक्शन . भारताला आले टेंशन
धर्माच्या नावावर भारतापासून वेगळे होत असताना काश्मीर मधील काही लोकांनी पाकिस्तान सोबत जाणे पसंद केले . POK होण्यासाठी हेच लोक पाकिस्तान सरकारला मदत करत राहिले . पण जेव्हा गरिबी , बेरोजगारी , भ्रष्टाचार , आंतरिक राजकारण यामुळे POK मधली काश्मिरी जनता भरडली जायला लागली तेव्हा त्यांनी POK मधील काश्मीरचा भाग वेगळा करण्यासाठी आवाज उठवायला सुरवात केली . आणि पाकिस्तानी आर्मी ,पोलीस यांच्यासोबत काश्मिरी जनतेचा संघर्ष उभा राहिला . पुढे किती दिवस अजून पाकिस्तानी आर्मी जनतेचा आवाज दडपण्यात व्यस्त राहते कि त्यांच्या वेगळ्या होण्याच्या मागणीला मान्यता न देता त्यांना चांगले दिवस आणून पाकिस्तानात समाविष्ट करून घेते . हे येणारा काळ सांगेल .