Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Qatar Plane : कतारकडून ट्रम्प यांना ४०० दशलक्ष डॉलर्सचं आलिशान विमान भेट; कायदे, नैतिकता धाब्यावर

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना कतारच्या शाही घराण्याकडून ४०० दशलक्ष डॉलर्स किंमतीचे बोईंग ७४७ हे आलिशान विमान भेट म्हणून देण्यात येणार आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: May 14, 2025 | 07:35 PM
कतारकडून ट्रम्प यांना ४०० दशलक्ष डॉलर्सचं अलिशान विमान भेट; कायदे, नैतिकता धाब्यावर

कतारकडून ट्रम्प यांना ४०० दशलक्ष डॉलर्सचं अलिशान विमान भेट; कायदे, नैतिकता धाब्यावर

Follow Us
Close
Follow Us:

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना कतारच्या शाही घराण्याकडून ४०० दशलक्ष डॉलर्स किंमतीचे बोईंग ७४७ हे आलिशान विमान भेट म्हणून देण्यात येणार आहे. हे विमान तात्पुरते ‘एअर फोर्स वन’ म्हणून वापरले जाणार असून नंतर ट्रम्प यांच्या राष्ट्रपती ग्रंथालयात ठेवले जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान हे विमान केवळ भव्यतेमुळे नव्हे तर संविधानातील विदेशी भेटींबाबतच्या तरतुदींना धक्का देणारे ठरत असल्याने वादंग उठलं आहे.

Israel News: इस्रायलचा गाझा पट्टीमध्ये Air Strike; 60 नागरिकांचा तडफडून मृत्यू तर, 22 मुलांचा…

या भेटीमध्ये तीन शयनकक्ष, खासगी लॉंज आणि एक एक्झिक्युटिव्ह ऑफिस असलेले आलिशान बोईंग ७४७ विमान समाविष्ट आहे. सध्या वापरात असलेले ‘एअर फोर्स वन’ विमान जवळपास ४० वर्ष जुनं असून त्यांचं नूतनीकरण रखडलं आहे. यामुळे नाराज झालेल्या ट्रम्प यांनी कतारकडून आलेली ऑफर नाकारणे “मूर्खपणाचे” ठरेल असं म्हटलं आहे.

ट्रम्प यांनी Truth Social या प्लॅटफॉर्मवर पोस्ट लिहिली असून त्यामध्ये त्यांनी, “संरक्षण विभागाला मोफत मिळणारी ही ७४७ विमानाची भेट ४० वर्ष जुन्या एअर फोर्स वनच्या जागी तात्पुरता पर्याय असेल, आणि हा व्यवहार पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने होत आहे.” असं म्हटलं आहे. कतारच्या संरक्षण मंत्रालयाकडून ही भेट पेंटॅगॉनला दिली जात असून, विमानात एअर फोर्स वनच्या सुरक्षितता आणि संरक्षण मानकांनुसार फेरबदल केले जातील, असं कतारमधील एका अधिकाऱ्याने एका वृत्तवाहिनीला सांगितलं.

कायदेशीर आणि राजकीय पेच
या प्रकरणात संविधानातील Emoluments Clause (धनसंपत्ती कलम) ची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. या कलमानुसार कोणताही सरकारी पदाधिकारी काँग्रेसच्या संमतीशिवाय कोणतीही भेट, सन्मान, पद किंवा कार्यालय कोणत्याही परकीय राष्ट्र किंवा राजाकडून स्वीकारू शकत नाही. लंडन मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटीचे संविधानतज्ज्ञ अँड्रू मोरन यांनी सांगितलं की, “इतक्या मोठ्या स्वरूपाची किंवा प्रकाराची भेट अमेरिकेच्या इतिहासात यापूर्वी कधीच पाहिली नाही. ही गोष्ट संविधानाच्या चौकटीला न बसणारी आहे.”

व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “कायदेशीर बाबी अजून अंतिम झालेल्या नाहीत, पण कोणतीही भेट पूर्ण कायदेशीर प्रक्रियेतूनच स्वीकारली जाते.”

दोन इतर महत्त्वाचे मुद्दे
१. राष्ट्रपतीच्या अधिकृत वाहनाची प्रतिमा:
‘एअर फोर्स वन’ हे राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत विमान आहे. त्यासाठी परकीय राष्ट्राची मदत घेणे हे ट्रम्प यांच्याच ‘मेक इन अमेरिका’ भूमिकेशी विसंगत मानले जात आहे.

२. सुरक्षा आणि तांत्रिक गोष्टी:
‘एअर फोर्स वन’ मध्ये अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, कम्युनिकेशन सिस्टीम्स आणि संरक्षणात्मक तंत्रज्ञान बसवलेले असते. परकीय बनावटीच्या विमानात हे सर्व सुरक्षितपणे बसवणे ही एक मोठी आव्हानात्मक बाब ठरू शकते.

२०२३ मध्ये हाऊस ओव्हरसाइट कमिटीच्या अहवालानुसार ट्रम्प यांच्या कार्यकाळात परकीय सरकारांकडून मिळालेली १०० हून अधिक भेटवस्तू बेपत्ता असल्याचे उघड झाले होते. त्यामध्ये अल साल्वाडोरकडून मिळालेले ट्रम्प यांचे जीवनमानाचे चित्र आणि जपानकडून मिळालेले $२,५०,००० किमतीचे गोल्फ क्लब यांचा समावेश होता. ट्रम्प यांच्या प्रवक्त्यांनी यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, या वस्तू बहुधा त्यांच्या राष्ट्राध्यपूर्व किंवा नंतरच्या काळात मिळाल्या असाव्यात.

काय सांगतो अमेरिकन कायदा?

Emoluments Clause व्यतिरिक्त, १९६६ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या Foreign Gifts and Decorations Act अंतर्गत असे नमूद आहे की, $480 पेक्षा अधिक किमतीची कोणतीही भेट ही राष्ट्रपती वैयक्तिकरित्या ठेवू शकत नाहीत. अशा भेटी राष्ट्राची मालमत्ता मानल्या जातात आणि त्यांचे मूल्यांकन करून त्या व्हाइट हाऊस गिफ्ट युनिटमार्फत प्रक्रियेत आणल्या जातात. राष्ट्रपतींना त्या वस्तू वैयक्तिकरित्या हवी असल्यास त्यांना बाजारभावाने त्या खरेदी कराव्या लागतात.

राष्ट्रपतींना मिळालेल्या भेटींचा इतिहास

परकीय अतिथी अमेरिकन राष्ट्रपतींना अनेक प्रकारच्या भेटी देत आले आहेत. बहुतेक वेळा या वस्तू राष्ट्रपती स्वत:कडे न ठेवता नॅशनल अर्काइव्ज किंवा राष्ट्रपती ग्रंथालयात ठेवण्यात येतात. जॉर्ज डब्ल्यू बुश यांना अर्जेंटिनाकडून ३०० पाउंड्स कच्चे मेंढ्याचे मांस व बुल्गारियाकडून एक पिल्लू भेट मिळाले होते. अन्नपदार्थ सुरक्षा कारणास्तव नष्ट करण्यात आले, तर पिल्लू नॅशनल अर्काइव्जमार्फत इतरत्र ठेवण्यात आले.

चर्चेपूर्वी रशिया युक्रेनमध्ये पुन्हा वादाची ठिणगी; 1240 रशियन सैनिकांना ठार केल्याने युद्ध पेटणार?

बिल क्लिंटन यांना अझरबैजानकडून त्यांच्या आणि हिलरी क्लिंटन यांचा चेहरा असलेले विणलेले गालिचे भेट मिळाले, ते आता सरकारी संग्रहात आहेत.बराक ओबामा यांना विविध प्रकारचे कलात्मक आणि विनोदी भेटवस्तू मिळाल्या — जसे की डबल डेकर बसच्या आकारातील पेन्सिल शार्पनर. या सर्व घटनांतून हे स्पष्ट होते की, परकीय भेटी स्वीकारताना संविधान, कायदे आणि पारदर्शक प्रक्रिया यांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. ट्रम्प यांना मिळणाऱ्या बोईंग ७४७ भेटीच्या प्रकरणात हे नियम कसे आणि कितपत पाळले जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Qatar gift aircraft us president donald trump what is american legal ethical concerns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 07:34 PM

Topics:  

  • air force
  • Donald Trump
  • US President

संबंधित बातम्या

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
1

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?
2

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

हमासने टेकले गुडघे? युद्धबंदी आणि ओलिसांना सोडण्याची इस्रायलची अट केली मान्य; पण…
3

हमासने टेकले गुडघे? युद्धबंदी आणि ओलिसांना सोडण्याची इस्रायलची अट केली मान्य; पण…

झेलेन्स्की यांनी ट्रम्पना दिली खास चिठ्ठी, म्हणाले “माझ्या बायकोने लिहिली आहे…”
4

झेलेन्स्की यांनी ट्रम्पना दिली खास चिठ्ठी, म्हणाले “माझ्या बायकोने लिहिली आहे…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.