भुंकपाच्या धक्क्यातुन देश सावरला नसताना आता भीषण विनाशाचा सामना करत असलेल्या तुर्कस्तानला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला (Earthquake In Turkey ). तुर्की आणि सीरियामध्ये (Turkey And Seria) या विनाशकारी भूकंपात 33,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशातच ढिगाऱ्याखालून लोकांना सुखरुप बाहेर काढण्याच काम बचाव पथकाकडुन केलं जात आहे. या दरम्यान, जिथे यंत्रे निकामी झाली आहेत तिथे दोन भारतीय स्निफर कुत्र्यांनी आश्चर्यकारक काम करून एका सहा वर्षांच्या मुलीचे प्राण वाचवले आहेत.
[read_also content=”कुराणचा अपमान केल्याप्रकरणी पाकिस्तानमध्ये जमावाकडुन एकाची हत्या, 12 जणांना अटक https://www.navarashtra.com/world/12-people-arrested-in-pakistan-mob-lynching-case-nrps-369392.html”]
तुर्कस्तानमध्ये भूकंपामुळे झालेल्या प्रचंड विध्वंसाच्या पार्श्वभूमीवर जगातील अनेक देशांचे सैनिक तुर्की आणि सीरियामध्ये मदत आणि बचाव कार्य करत आहेत. या बचाव कार्यात एनडीआरएफची टीमही भारताकडून मदत आणि बचाव कार्यात गुंतलेली आहे. या टीमसोबत स्निफर डॉगही तुर्कीला पाठवण्यात आले आहेत. यातील दोन स्निफर श्वानांनी ढिगाऱ्याखाली दबलेल्या सहा वर्षीय मुलीचे प्राण वाचवले आहेत. ज्यासाठी या दोन्ही कुत्र्यांचे खूप कौतुक होत आहे.
एनडीआरएफची एक टीम तुर्कीच्या नुरदगी भागात मदत आणि बचाव कार्यात गुंतलेली आहे. यावेळी जेसीबी तसेच अनेक यंत्रांच्या साहाय्याने ढिगाारा उपसण्याच काम सुरू आहे तसच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचही काम सुरू आहे. दरम्यान, एनडीआरएफच्या स्निफर डॉग ज्युलीने ढिगाऱ्यात एका ठिकाणी भुंकायला सुरुवात केली. ज्युलीला ढिगाऱ्यात जिवंत व्यक्तीच्या खुणा सापडल्याचे एनडीआरएफच्या जवानांच्या लक्षात आले. यानंतर दुसरा कुत्रा रोमियोलाही त्याच ठिकाणी पाठवण्यात आले आणि त्यानेही भुंकायला सुरुवात केली. यानंतर एनडीआरएफच्या जवानांना येथे ढिगाऱ्यात काही जिवंत व्यक्ती अडकल्याची माहिती मिळाली. त्यांनी लगेच ढिगारा उपसून त्याखाली अडकलेल्या सहा वर्षाच्या मुलीला जिवदान दिलं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तुर्कीमध्ये रविवारी झालेल्या भूकंपात मृतांची संख्या 29,605 झाली आहे. एकूण 3,576 लोक मरण पावले, ज्यात सीरियाच्या वायव्येकडील बंडखोरांच्या ताब्यातील भागात 2,168 आणि सीरियाच्या सरकार-नियंत्रित भागांमध्ये 1,408 लोकांचा समावेश आहे. तुर्कस्तानच्या दहा प्रांतांमध्ये झालेल्या भूकंपामुळे २५ हजारांहून अधिक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, ढिगाऱ्यात अजूनही 10,000 हून अधिक मृतदेह असू शकतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनसह अनेक तज्ञ संस्थांनी असा अंदाज वर्तवला आहे की मृतांची एकूण संख्या 50 हजारांपेक्षा जास्त असू शकते. तज्ज्ञांसोबतच, तुर्कस्तानमधील बहुतेक लोकांचा असाही विश्वास आहे की भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर झालेल्या विनाशाचे कारण प्रत्यक्षात निकृष्ट बांधकाम आहे. सरकारने वेळीच पावले उचलली असती तर भूकंपामुळे हानी झाली असती, पण हा प्रकार टाळता आला असता.