दक्षिण कोरियात राष्ट्राध्यक्षांविरोधात महाभियोग मतदान होणार; युन सुक येओल लोकशाहीसाठी धोका असल्याचे नागरिकांचे मत
सियोल: दक्षिण कोरियात सध्या राजकीय खळबळ सुरू आहे. मार्शल लॉ लागू केल्याची घोषणा केल्यानंतर दक्षिण कोरियात युन सुक येओल यांच्या विरोधात वातावरण चिघळले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे संसदेत अध्यक्षांना तीव्र विरोध करण्यात आला. यून यांच्याविरोधात फक्त राजकीय नेत्यांमध्येच नाही तर नागरिकांमध्ये देखील असंतोष वाढला आहे. विरोधी पक्ष नेत्यांनी त्यांच्या कारभारावर टीका करत महाभियोग प्रस्ताव मांडला असून आज (7 डिसेंबर) संसदेत मतदान होणार आहे.
महाभियोग प्रस्तावाचा मुद्दा
युन यांच्या मार्शल लॉ लागू केल्यानंतर विरोध पक्षांनी याला तीव्र विरोध केला. यामुळे त्यांना 6 तासांतच आपला निर्ण मागे घ्यावा लागला. विरोधा पक्षांनी युन यांच्यावर त्यांनी लागू केलेला निर्ण असंवैधिनक असल्याचा आरोप केला आहे. या निर्णयामुळे राष्ट्राध्यक्षांच्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा युन यांच्यावर आरोप आहे. महाभियोग प्रस्ताव संसदेत दोन तृतीयांश बहुमताने मंजूर करण्यासाठी विरोधी पक्षांना सत्ताधारी पक्षातील किमान आठ खासदारांचे समर्थन मिळणे आवश्यक आहे. यामुळे युन यांच्या विरोधात असलेल्या पक्षांनी त्यांच्या रणनीतींवर जोर दिला आहे.
लोकशाहीसाठी धोका
जनतेतही राष्ट्राध्यक्ष यून यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला आहे. अनेक नागरिक त्यांना लोकशाहीसाठी धोका मानत आहेत. लोक रस्त्यावर उतरुन विरोध निदर्शने करत आहेत. युन यांच्या पक्षातील काही सदस्यांनी देखील त्यांच्यावर टीका केली आहे. पक्षाचे नेते हान डोंग-हून यांनी युन यांच्या संविधानिक अधिकारांचे निलंबन करण्याची मागणी केली आहे. या मागणीला इतर नेत्यांनीही पाठिंबा दिला आहे. त्यांच्या मते, देशाच्या लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी युन यांच्या अधिकारांवर निर्बंध आवश्यक आहेत.
6 तासांत निर्णय मागे घेतला गेला
दक्षिण कोरियामध्ये मार्शल लॉ लागून करण्यात आल्यानंतर 24 तासांत राजकीय वादळ उठले आहे. मंगळवारी दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यून सुक-योल यांनी मार्शल लॉ लागू करण्याचा निर्णय जारी केला होता. मात्र, नेशनल असेंब्लीने तातडीने मतदानाद्वारे हा निर्ण पलटवला. यामुळे सरकारला आदेश मागे घ्या लागला. त्यानंतर देशभरात या प्रकरणावरुन तीव्र विरोध निदर्शने झाली. तसेच हा निर्णय 6 तासांत मागे घेण्यात आला.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
राष्ट्राध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी
राष्ट्रपती यून सुक-योल यांच्या या निर्णयावर संताप व्यक्त करत मुख्य विरोधी पक्षाने त्यांच्यावर राजीनाम्याची मागणी केली. तसेच विरोधकांनी इशारा दिला की, जर यून सुक-योल यांनी पद सोडले नाही, तर त्यांच्याविरुद्ध महाभियोग चालवला जाईल. याच पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री किम योंग-ह्यून यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि देशातील अस्थिरतेबद्दल जनतेची माफी मागितली.
संरक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर लगेच त्यांच्या पदावर चोई ब्युंग ह्युक यांची नवे संरक्षण मंत्री म्हणून निवड करण्यात आली.सध्या दक्षिण कोरियामध्ये राष्ट्राध्यक्ष युन यांच्याविरोधात वातावरण तापलेले आहे. युन यांचे अधिकार निलंबित करून लोकशाहीला संरक्षण देण्याची मागणी वाढत आहे. मात्र, या घटनेमुळे दक्षिण कोरियाच्या लोकशाही व्यवस्थेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.