मुंबई : युक्रेन आणि रशियाच्या युद्ध सुरु असल्याने मोठ्या प्रमाणावर अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यात येत आहे. काल रात्री उशिरा अनेक विद्यार्थी मुंबई विमानतळावर पोहचले. यातील 26 विद्यार्थी केरळचे असल्याने त्यांची राहण्याची व्यवस्था नवी मुंबईतील केरळ भवनात करण्यात आली होती. आम्ही सुखरुप परतलो हेच आमचं भाग्य अशी भावना या विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
युक्रेन आणि रशियात युद्ध सुरू असल्याने मोठ्या संख्येने शिक्षणासाठी युक्रेन मध्ये गेलेले विद्यार्थी मायदेशी परतण्यासाठी सरकारकडे आर्त हाक मारत आहेत. आतापर्यंत युक्रेन मधून एकूण 709 विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यात आले आहे. युक्रेन आणि रशियाच्या युद्धाच्या चौथ्या दिवशी युक्रेनमधील जवळपास 490 भारतीय विद्यार्थ्यांना रोमानिया और हंगरी मार्गे भारतात आणण्यात आले आहे. काल रात्री आलेल्या या विद्यार्थ्यांमध्ये त्यातील 26 विद्यार्थी केरळच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहेत. त्यांची त्यांची राहण्याची व्यवस्था नवी मुंबईतील केरळ भवनात करण्यात आली होती. यावेळी त्याच्यांशी संवााद साधला असता त्यांनी आपली आपबिती सांगितली. हे खूपच कठीण अन अनुभव होता, आम्ही परतलो हेच आमचं भाग्य आहे. अजून काही विद्यार्थी अडकून आहेत, त्यांनाही सरकारने लवकर आणावे. अशी विनंती करत त्यांनी सरकारचे आभार मानले.
[read_also content=”दिशा सालियन मृत्यू प्रकरणी केलेलं वक्तव्य भोवलं; नारायण राणे, नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/fir-lodge-against-narayan-rane-and-nitesh-rane-in-disha-salian-case-nrps-245938.html”]