अल-जुलानी यांच्यापासून आता धोका नाही; अमेरिकेन सरकारने दहशतवादी लिस्टमधून हटवले, 85 कोटीचे बक्षिसही मागे घेतले
वॉश्गिंटन: सीरयातील बंडखोर गट हयात तहरीर अल शाम (HTS) च्या प्रमुखाला म्हणजेच अल-जुलानीला अमेरिकेने दहशतवाद्याच्या यादीतून काढून टाकले आहे. इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, अल-जुलानी आता दहशतवादी नसून त्याच्यावर ठेवलेला 85 कोटी रुपयांचे बक्षिसही मागे घेण्यात आले आहे. अमेरिकेचे सहायक विदेश मंत्री बारबरा लीफ यांनी सीरियातील HTS नेत्यांसोबत बैठक घेतल्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.
बारबरा लीफ यांच्या म्हणण्यानुसार, सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद यांना सत्तेतून हटविल्यानंतरच हा निर्णय घेतला गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, असद सरकार कोसळल्यानंतर अमेरिकेचा एक प्रतिनिधीमंडळ सीरियाला पोहोचला. याचे नेतृत्व बारबरा लीफ करत आहेत. त्यांनी HTS चे प्रमुख अबू जुलानी यांची भेट घेतली व चर्चा सकारात्मक आणि यशस्वी झाल्याचे सांगितले.
2018 मध्ये HTS ला दहशवादी संघटना म्हणून घोषित केले होते
यापूर्वी 2018 मध्ये अमेरिका सरकारने हयात तहरीर अल शाम (HTS) ला दहशतवादी संघटना घोषित केले होते. त्याआधी 2017 मध्ये जुलानीवर बक्षिस ठेवण्यात आले होते. रिपोर्ट्सनुसार, आता मात्र अमेरिकेने हयात तहरीर अल शाम (HTS) ला त्यांच्या सकारत्क विचारामुळे संघटनेला दहशतवादांच्या यादीतून हटवण्याचा विचार सुरू केला आहे.
सीरियाचे इस्त्रायलशी जवळीक वाढवण्याचे प्रयत्न सुरू
मिडल ईस्ट आयच्या अहवालानुसार, अमेरिका तुर्कीला सीरियावर पूर्ण नियंत्रण मिळवू देऊ इच्छित नाही. तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तैय्यप एर्दोगन यांनी सीरियातील असद सरकारला हटवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. हे प्रयत्न आता यशस्वी झाले आहेत. मात्र, अमेरिकन सरकारला वाटते की तुर्की किंवा इराण सीरियावर नियंत्रण मिळवू नये. त्यामुळेच HTS शी संपर्क वाढवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न दिसून येतो.
जुलानी यांनी मुलीचा फोटो काढल्याने वाद सुरु झाला
HTS प्रमुख जुलानीने एका तरुणीसोबत फोटो काढल्यामुळे वादात सापडला. 10 डिसेंबरला लिया खैरल्लाह नावाच्या मुलीने जुलानीसोबत फोटो काढला. फोटो काढण्यापूर्वी जुलानीने तिला डोके झाकायला सांगितल्यामुळे उदारमतवादी आणि कट्टरपंथीय दोघांनीही त्याची टीका केली.
जुलानीने मीडियाला एका मुलाखतीत स्पष्ट केले की, त्याने त्या मुलीला जबरदस्तीने डोके झाकायला लावले नाही. त्याने फक्त आपल्याला योग्य वाटले तसे वागल्याचे सांगितले. मात्र, कट्टरपंथीयांनी जुलानीवर इस्लामी शिकवणुकीत हस्तक्षेप करण्याचा आरोप केला आहे. या घटनांमुळे जुलानीच्या नेतृत्वाखालील HTS चे धोरण आणि भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे.