फोटो सौैजन्य: सोशल मीडिया
ढाका: भारत आणि बांगलादेश संबंध सध्या तणावपूर्ण टप्प्यावर आहेत. अलीकडेच बांगलादेशने पुन्हा एकदा भारतावर गंभीर आरोप केले आहेत. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने शेख हसीनासह भारतावर बांगला देशातील काही लोकांना गायब केल्याचा आरोप केला आहे. यामुळे दोन्ही देशांतील संबंधांवर अधिक परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भारतावर बागंलादेशाचा आरोप
बांगलादेशमधील “जबरदस्तीने गायब होणाऱ्या व्यक्तींच्या” प्रकरणांची चौकशी करणाऱ्या आयोगाने जारी केलेल्या अहवालानुसार, या घटनांमध्ये भारताचा सहभाग असू शकतो. तसेच माजी न्यायाधीश मैनुल इस्लाम चौधरी यांच्या नेतृत्वाखालील आयोगाने “अनफोल्डिंग द ट्रुथ” खाली तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे की, “बांगलादेशातील जबरदस्तीने गायब होण्याच्या घटनांमध्ये भारताची भागीदारी असल्याचे पुरावे सापडले आहेत.
आयोगाने आपल्या अहवालात आणखी काय म्हटले आहे?
आयोगाने सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, “भारतीय तुरुंगांमध्ये कैद असलेल्या बांगलादेशी नागरिकांची ओळख पटवावी. यासाठी बांगलादेशच्या पराराष्ट मंत्रालय आणि गृह मंत्रालयाने पुढाकार घ्यावा.” तसेच बांगलादेशाच्या बाहेर या प्रकरणाचा तपास करणए त्यांच्या अधिरापक्षेत्राबाहेर आहे असेही आयोगाने स्पष्ट केले. आयोगाने असेही नमूद केले आहे की, “भारताचा या संपूर्ण प्रकरणात सहभाग आणि त्याचा दोन्ही देशांवर होणारा परिणाम यासाठी अधिक तपशीलवार विश्लेषण आवश्यक आहे.”
शेख हसीना यांच्यावर देखील आरोप
यापूर्वी याच आयोगाने बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर देखील अशाच प्रकारचे आरोप केले होते. मात्र, अंतिम अहवालात भारतावर आरोप ठोठवण्यात आला आहे. आयोगाच्या या वेगवेगळ्या निष्कर्षांमुळे बांगलादेशमधील राजकीय परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे.
भारत आणि बांगलादेशमधील संबंध बिघडले आहेत
पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेवरून हटवल्यानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध बिघडले. अंतरिम सरकारने भारतासोबतचा बँड विथ ट्रान्झिट करार रद्द केला आणि भारतावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पाकिस्तान आणि तुर्कीसारख्या देशांशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला. खताच्या संकटावर मात करण्यासाठी भारताने बांगलादेशला तातडीने मदत केली होती. मात्र ही मदत केवळ व्यावसायिक लाभापुरतीच मर्यादित आहे.
माजी पंतप्रधान शेख हसीना यांना भारताकडून आशा आहेत
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी सँड मार्टिन बेट आणि सीमेवरील वाढत्या धोक्याबाबत भारताकडून मदत मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. भारताची रणनीती स्पष्ट आहे, गरज पडल्यास बांगलादेशला दबावाखाली आणण्यासाठी योग्य वेळेची वाट पहावी लागेल. बांगलादेशसारख्या शेजारी देशाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे शक्य नाही हे भारताला समजले आहे. पण आमचे हित जपण्याला प्राधान्य आहे.