आयफेल टॉवरमध्ये लागली आग; 1200 पर्यटकांना बाहेर काढण्यात यश
जगप्रसिद्ध पॅरिसमधील आयफेल टॉवरला आज आग लागली. त्यामुळे तातडीने संपूर्ण टॉवर रिकामा करण्यात आला. नाताळच्या पूर्वसंध्येला टॉवरवर मोठ्या संख्येने लोक जमले होते. मात्र, सर्वांना वेळीच बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आलं. या घटनेनंतर आयफेल टॉवर बंद करण्यात आला असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.
मद्यपींसाठी खुशखबर! सकाळी ५ पर्यंत सुरू राहणार दारूची दुकाने
मिरर यूकेने दिलेल्या वृत्तात, टॉवरची देखभाल करणाऱ्या कंपनीच्या मते, एलिव्हेटेड पॉवर रेल्वेमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे अलार्म वाजला. तर दुसऱ्या मजल्यावर आणि तिसऱ्या मजल्यावरही अशीच समस्या दिसून आली. शॉर्ट सर्किटनंतर सकाळी 10.50 वाजता अलार्म वाजू लागला. त्यामुळे पर्यटकांना तातडीने बाहेर काढण्यात आलं.
प्राथमिक अहवाल आणि सोशल मीडियावर याबाबत वृत्त पसरल्यानंतर, अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की कोणत्याही पर्यटकांना इजा झाली नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली त्यावेळी टॉवरमधून सुमारे १२०० लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
Big Breaking: जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनाला मोठा अपघात; 5 जवान शहीद
ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला गर्दी
सहसा, ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला, मोठ्या संख्येने पर्यटक आयफेल टॉवरला भेट देण्यासाठी येतात. आजही ख्रिसमसची पूर्वसंध्येला मोठ्या संख्येने पर्यंटक दाखल झाले होते. दरम्यान काही पर्यटकांना धूर निघताना दिसला आणि त्यानंतर अलार्मही वाजू लागला. यानंतर काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झाले होतं. आयफेल टॉवरला दररोज २५ हजारांहून अधिक पर्यटक भेट देतात.
फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील ही एक जगप्रसिद्ध वास्तू आहे. १८८९ मध्ये तयार झालेला आयफेल टाॅवर केवळ फ्रान्सचंच सांस्कृतिक वैभव नाही, तर अख्ख्या जगाच्या दृष्टीनं आजही ते एक आश्चर्य मानलं जातं. फ्रान्सला गेलेला कोणताही पर्यटक आयफेल टॉवर पाहिल्याशिवाय परत येत नाही.
आयफेल टॉवर अनेक कारणांनी चर्चेत असतो. कुणी आयफेल टॉवरवर जाऊन लग्न करतात, तर आयफेल टॉवर कलल्याच्या बातम्याही अनेकदा कानावर येतात, पण तब्बल १३३ वर्षे झाली तर आयफेल टॉवर आजही तसाच दिमाखात उभा आहे. काही दिवसांपूर्वीच या आयफेल टॉवरची उंची तब्बल वीस फुटांनी (सहा मीटर) वाढल्यामुळे जगात तो पुन्हा चर्चेचा विषय झाला होता.
तशी याआधीही या टॉवरची उंची वाढली आहे! ज्यावेळी हा टॉवर तयार झाला, त्यावेळी त्याची उंची होती १०२४ फूट (सुमारे ३१२ मीटर), पण गेल्या १३३ वर्षांत या टॉवरची उंची तब्बल ६० फुटांनी वाढली आहे. गेल्या काही वर्षांपर्यंत १०६३ फूट असलेली या टॉवरची उंची या आठवड्यात एकदम वीस फुटांनी वाढल्यानं ती आता १०८३ फूट झाली आहे!
आयफेल टॉवरवर नुकताच एक रेडिओ ॲण्टेना बसविण्यात आला. तंत्रज्ञानाच्या विस्तारीकरणासाठी वैज्ञानिकांनी हेलिकॉप्टरच्या साहाय्यानं नुकताच हा ॲण्टेना बसविला. या ॲण्टेनामुळे आयफेल टॉवरची उंची वाढली आहे.
गुस्ताव आयफेल यांनी १९८९ मध्ये या टॉवरची उभारणी केली होती. त्यांच्या नावावरूनच या टॉवरला आयफेल असं नाव देण्यात आलं होतं. ज्यावेळी टॉवर तयार झाला, त्यावेळी ती जगातील सर्वाधिक उंच वास्तू होती.