लारक बेटावरील हल्ल्याने पेटली संघर्षाची ठिणगी; इराणने जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळ उडवले, ट्रम्प म्हणाले - "सैनिकांसाठी प्रार्थना करा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
पश्चिम आशियातील अमेरिका आणि इराण (US-Israel Iran War) यांच्यातील तणाव आता एका अत्यंत धोकादायक टप्प्यावर पोहोचला आहे. गेल्या काही काळापासून लष्करी कारवायांपुरता मर्यादित असलेला हा संघर्ष आता सागरी वाहतूक आणि आर्थिक निर्बंधांच्या सीमा ओलांडून भीषण युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) जॉर्डन देशातील अमेरिकेच्या प्रमुख लष्करी तळांना लक्ष्य करत बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा केल्याचा दावा केला आहे. इराणच्या ताब्यातील लारक बेटावर (Larak Island) अमेरिकन हवाई दलाने केलेल्या अचानक हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ही मोठी लष्करी कारवाई करण्यात आल्याचे इराणच्या लष्करी सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
इराणी सरकारी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेने लारक बेटावर केलेल्या हल्ल्यात इराणचे अनेक सैनिक मारले गेले असून काही नागरिकही जखमी झाले आहेत. (US-Iran war) या कारवाईमुळे संतप्त झालेल्या इराणच्या ‘आयआरजीसी’ने जॉर्डनमधील ‘किंग हुसेन’ आणि ‘अल अझराक’ या दोन महत्त्वाच्या अमेरिकन हवाई तळांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला चढवला. जॉर्डनच्या हवाई हद्दीत घुसलेली अनेक क्षेपणास्त्रे रोखण्यात आल्याचा दावा स्थानिक यंत्रणांनी केला असला, तरी या प्रत्युत्तरामुळे संपूर्ण मध्य पूर्वेत खळबळ उडाली आहे. इराणने याआधीच इशारा दिला होता की, त्यांच्या भूभागावर होणाऱ्या कोणत्याही आक्रमणाची अमेरिकेला मोठी किंमत मोजावी लागेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal Flood : इंजिनिअरला राष्ट्रीय पुरस्कार द्या! नेपाळ महापुराच्या रौद्ररूपातही अचल राहिले ‘ते’ घर; सोशल मीडियावर VIDEO VIRAL
अमेरिकन सेंट्रल कमांडने (CENTCOM) दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी अमेरिकन सैन्याने इराणच्या लारक बेटावरील दोन प्रमुख रॉकेट लाँचरना लक्ष्य केले होते. जागतिक खनिज तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘होर्मुझच्या सामुद्रधुनीत’ (Strait of Hormuz) सागरी सुरुंग (Naval Mines) पेरण्यासाठी इराणचे सैनिक या लाँचरचा वापर करणार होते, असा दावा अमेरिकेने केला आहे. आंतरराष्ट्रीय सागरी व्यापार आणि व्यावसायिक जहाजांच्या सुरक्षेसाठी ही ‘मर्यादित आणि अचूक कारवाई’ करणे अमेरिकेला भाग पडल्याचे सेंटकॉमच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
Iran has launched several ballistic missiles towards US targets in the region US Patriot PAC-3 in Jordan fired at least 3-4 interceptor missiles for each incoming Iranian ballistic missile. • Footage from Eilat shows Iranian missiles targeting the King Hussein International… pic.twitter.com/OI1kbevGb9 — Arya Yadegaar (@AryJeayBackup) August 30, 2026
credit – social media and Twitter
जवळपास महिनाभराच्या शांततेनंतर अमेरिकेने इराणच्या भूभागावर केलेला हा पहिलाच मोठा लष्करी हल्ला ठरला आहे. यापूर्वी जुलैअखेरीस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतील लष्करी कारवाया तात्पुरत्या स्थगित केल्या होत्या आणि मुत्सद्देगिरीला संधी दिली होती. मात्र, इराणने पुन्हा एकदा या अत्यंत महत्त्वाच्या जलमार्गात सागरी जहाजांच्या प्रवासाला अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याने अमेरिकेने थेट कारवाईचा बडगा उचलला. होर्मुझच्या या सामुद्रधुजीतून जगातील तब्बल २० टक्के तेलाची वाहतूक होते, त्यामुळे या भागात युद्धाचे ढग दाटल्याने जागतिक इंधन बाजारातही घबराट पसरली असून तेलाचे दर वाढले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : National Nutrition Day: का साजरा केला जातो ‘हा’ दिवस? जाणून घ्या संतुलित आहाराचे महत्त्व अन् निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली
इराणच्या या प्रतिहल्ल्यानंतर वॉशिंग्टनमध्ये उच्चस्तरीय बैठकांचे सत्र सुरू झाले असून पेंटागॉनने मध्य पूर्वेतील आपल्या सर्व लष्करी तळांना हाय अलर्टवर ठेवले आहे. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन जनतेला भावूक आवाहन केले आहे. ट्रम्प म्हणाले की, “जमिनीवर तैनात असलेले आमचे शूर सैनिक अमेरिकेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र लढा देत आहेत. या संकटसमयी सर्व देशवासियांनी आपल्या सैनिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि विजयासाठी प्रार्थना करावी.”
अमेरिकन सेंट्रल कमांडने (CENTCOM) स्पष्ट केले आहे की, इराणी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले हवेतच नष्ट करण्यासाठी अमेरिकेची अत्यंत प्रगत ‘थॉड’ (THAAD) आणि ‘पॅट्रियॉट’ (Patriot) ही हवाई संरक्षण प्रणाली (Air Defense System) पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. दरम्यान, अमेरिकेचे प्रशासन इराणवर अधिक कडक आर्थिक निर्बंध लादण्याची तयारी करत आहे, ज्यामुळे इराणची आर्थिक नाकेबंदी तीव्र होईल. दोन्ही देशांमधील हा संघर्ष आता केवळ क्षेपणास्त्रांपुरता उरला नसून, तो एका पूर्ण क्षमतेच्या प्रादेशिक आणि जागतिक महायुद्धाच्या दिशेने सरकत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.






