US President Donald Trump warns Iran if it assassinates him
वॉशिंग्टन: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर मोठी कारवाई करण्याचा इशार दिला आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे ती, जर इराणने त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला तर अमेरिका त्यांना संपूर्णतः नष्ट करून टाकेल. हा इशारा त्यांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान दिला, जिथे ते इराणवर नवीन निर्बंध लागू करणाऱ्या आदेशांवर स्वाक्षरी करत होते. खरं तर निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आरोप अमेरिकेन इराणवर लावला होता.
इराणने केली ट्रम्पच्या हत्येची योजना
नोव्हेंबर 2023 मध्ये अमेरिकेच्या न्याय विभागाने दावा केला होता की, इराणने डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला होता. सप्टेंबरमध्ये इराणी अधिकाऱ्यांनी फरहाद शाकेरी नावाच्या व्यक्तीला ट्रम्प यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी आणि त्यांची हत्या करण्यासाठी नियुक्त केले होते. मात्र, अमेरिकन गुप्तचर संस्थांनी या कटाला वेळेत उघड करून नाकाम केले. तर एककीकडे इराण हे आरोप फेटाळले होते.
इराणवर नवीन निर्बंध लागू
डोनाल्ड ट्रम्प यांनी कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करून इराणविरोधातील ‘अधिकतम दबाव’ धोरण पुन्हा सुरू केले आहे. या आदेशांतर्गत अमेरिकेच्या वित्त विभागाला आदेश देण्यात आले आहेत की, त्यांनी इराणच्या अर्थव्यवस्थेवर कठोर निर्बंध लावावेत, विशेषतः त्याच्या तेल निर्यातीला रोखण्यासाठीहा निर्णय ट्रम्प यांनी घेतला आहे.
अमेरिकेतील काही प्रभावी राजकारण्यांनीही इराणविरोधात अधिक कडक पावले उचलण्याची मागणी केली आहे. सीनेटर लिंडसे ग्राहम आणि जॉन फैटरमेन यांनी एक प्रस्ताव मांडला आहे, यामध्ये इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाविरोधात कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सुलेमानीच्या हत्येचा बदला घेण्याचा इराणचा इशारा
इराणने 2023 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड एयरोस्पेस फोर्सचे प्रमुख आमिर अली हाजीजादेह यांनी, “ईश्वराने इच्छा केली तर आम्ही ट्रम्प यांना नक्कीच ठार करू.” असी धमकी दिली होती. ही धमकी जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर देण्यात आली होती.
3 जानेवारी 2020 रोजी अमेरिकन सैन्य आणि CIA ने ट्रम्प यांच्या आदेशानुसार सुलेमानी यांचा ठार केले होते. त्यानंतर बदला म्हणून, इराणने 7-8 जानेवारी 2020 रोजी बगदादमधील अमेरिकन दूतावासावर आणि लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे डागली होती.
इराणबरोबर वाटाघाटी करण्याची ट्रम्प यांची इच्छा
ट्रम्प यांनी जरी इराणविरोधात कठोर धोरण पुन्हा लागू केले असले, तरी त्यांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांसोबत वाटाघाटी करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, ते इराणला समजावून सांगू इच्छितात की त्यांनी अण्वस्त्र विकसित करण्याचा प्रयत्न सोडावा. तर, दुसरीकडे ट्रम्प यांनी जो बायडेन प्रशासनावर तेल-निर्यातीवरील निर्बंध योग्य प्रकारे लागू करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे.