Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-US Trade: व्यापार करार की केवळ कागदी घोडे? भारत-अमेरिका महत्त्वाची बैठक रद्द; ट्रम्पच्या ‘अशा’ विधानाने उडाला गोंधळ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून होणाऱ्या सौरऊर्जेच्या आयातीवर १२६ टक्के प्रारंभिक शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भारत आणि अमेरिकेतील चालू व्यापार करार धोक्यात येऊ शकतो.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 25, 2026 | 11:48 AM
donald trump imposes 126 percent tariff on indian solar panels trade deal at risk

donald trump imposes 126 percent tariff on indian solar panels trade deal at risk

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांचा मोठा धक्का
  • व्यापार करार टांगणीला
  • चीनचा अँगल

US tariff on Indian solar panels 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (President Donald Trump) यांच्यातील वैयक्तिक मैत्री सर्वश्रुत असली, तरी व्यापाराच्या बाबतीत ट्रम्प यांनी ‘अमेरिका फर्स्ट’ या आपल्या जुन्या धोरणालाच प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने भारतातून आयात होणाऱ्या सौर पॅनेलवर तब्बल १२६ टक्के प्रारंभिक शुल्क लादण्याची घोषणा केली आहे. या एका निर्णयामुळे भारतीय सौर ऊर्जा क्षेत्राला मोठा धक्का बसला असून, भारत आणि अमेरिका यांच्यातील आगामी व्यापार करारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

नेमका वाद काय? का लादला गेला १२६% कर?

अमेरिकेच्या वाणिज्य विभागाच्या मते, भारत सरकार देशांतर्गत सौर पॅनेल उत्पादकांना मोठ्या प्रमाणावर अनुदान (Subsidy) देते. यामुळे भारतीय कंपन्यांना उत्पादन खर्च कमी पडतो आणि ते अमेरिकन उत्पादकांपेक्षा अत्यंत स्वस्त दरात आपले पॅनेल विकतात. याला ‘अन्याय्य व्यापार’ (Unfair Trade) संबोधत अमेरिकेने केवळ भारतच नाही, तर इंडोनेशियावर १४३% आणि लाओसवर ८१% शुल्क लादले आहे. अमेरिकन सौर उत्पादकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Turkey F-16 Crash: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! उड्डाणानंतर काही मिनिटांतच तुर्कीचे F-16 फायटर जेट कोसळले; पहा भयानक VIDEO

भारत-अमेरिका व्यापार करार आणि निर्माण झालेला पेच

सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे, हा निर्णय अशा वेळी आला आहे जेव्हा भारत आणि अमेरिका एका ऐतिहासिक व्यापार कराराच्या अगदी जवळ होते. काही आठवड्यांपूर्वीच दोन्ही देशांनी एक फ्रेमवर्क तयार केले होते, ज्यानुसार भारतीय निर्यातीवरील ५०% शुल्क १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, ट्रम्प यांच्या ताज्या निर्णयाने या सर्व चर्चांवर पाणी फेरले गेले आहे. या तणावामुळे या आठवड्यात होणारी तीन दिवसांची उच्चस्तरीय बैठकही रद्द करण्यात आली आहे.

चीनचा ‘व्हाया भारत’ मार्ग रोखण्याचा प्रयत्न?

अमेरिकन तज्ज्ञांच्या मते, चिनी कंपन्या अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांना बगल देण्यासाठी आग्नेय आशियाई देशांमध्ये आणि भारतात आपले उत्पादन केंद्र हलवत आहेत. २०२४ मध्ये भारतातून अमेरिकेला होणारी सौर पॅनेलची निर्यात $७९२.६ दशलक्ष इतकी झाली, जी २०२२ च्या तुलनेत नऊ पटीने जास्त आहे. हा अचानक झालेला बदल अमेरिकेला संशयास्पद वाटत असून, चिनी मालाला भारतातून अमेरिकेत शिरण्यापासून रोखण्यासाठी हे कडक शुल्क लादण्यात आले आहे.

अमेरिकन कंपन्यांसमोरही मोठे आव्हान

जरी हा निर्णय अमेरिकन उत्पादकांसाठी विजयासारखा वाटत असला, तरी अमेरिकेतील सौर ऊर्जा प्रकल्प राबवणाऱ्या कंपन्यांसाठी ही मोठी अडचण आहे. भारतातून पुरवठा बंद झाल्यामुळे अमेरिकेतील सौर प्रकल्पांचा खर्च प्रचंड वाढणार आहे. आधीच उच्च व्याजदरामुळे संकटात असलेला हा उद्योग आता पुरवठा साखळीतील विस्कळीतपणामुळे अधिकच संकटात येण्याची शक्यता आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : SOTU 2026: ‘America is Back’ ट्रम्प यांनी काँग्रेसमध्ये फुंकलं सुवर्णकाळाचं रणशिंग; जागतिक स्तरावर दिला धगधगता संदेश

पुढील दिशा काय?

अमेरिकन वाणिज्य विभाग ६ जुलै २०२६ पर्यंत या अनुदानांवर आणि अँटी-डंपिंग चौकशीवर अंतिम निर्णय घेणार आहे. तोपर्यंत हे १२६% प्रारंभिक शुल्क लागू राहील. भारत सरकारने यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली, तरी जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) मंचावर हा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. भारतासाठी ही केवळ आर्थिक हानी नाही, तर ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील व्यापाराच्या कडक धोरणांची ही एक पूर्वसूचना मानली जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने भारतीय सौर पॅनेलवर १२६% शुल्क का लादले?

    Ans: भारताने आपल्या उत्पादकांना दिलेल्या अनुदानामुळे अमेरिकन कंपन्यांना स्पर्धेत टिकणे कठीण होत असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे.

  • Que: या निर्णयाचा भारत-अमेरिका व्यापार करारावर काय परिणाम होईल?

    Ans: यामुळे कराराचे मूळ फ्रेमवर्क संकटात आले असून, दोन्ही देशांमधील अधिकारी स्तरावरील महत्त्वाची बैठक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

  • Que: ६ जुलै २०२६ ची तारीख का महत्त्वाची आहे?

    Ans: या तारखेपर्यंत अमेरिकन वाणिज्य विभाग अनुदानांवर आपला अंतिम निर्णय देणार असून, त्यानंतरच हे शुल्क कायम राहणार की नाही हे स्पष्ट होईल.

Web Title: Donald trump imposes 126 percent tariff on indian solar panels trade deal at risk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 11:48 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • international news
  • Trump tariffs

संबंधित बातम्या

Wrestling World Championship मध्ये विश्वजीत मोरेची ऐतिहासिक कामगिरी, रौप्य पदक पटकावणारा पहिला ग्रीको-रोमन कुस्तीपटू
1

Wrestling World Championship मध्ये विश्वजीत मोरेची ऐतिहासिक कामगिरी, रौप्य पदक पटकावणारा पहिला ग्रीको-रोमन कुस्तीपटू

Chicago Temple : अमेरिका हादरली! शिकागोत हिंदू मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न; 19 वर्षांच्या ‘नव-नाझी’ तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक
2

Chicago Temple : अमेरिका हादरली! शिकागोत हिंदू मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न; 19 वर्षांच्या ‘नव-नाझी’ तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक

US-Iran Conflict: अमेरिका इराणवर करणार ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’चा वापर? जाणून घ्या काय आहे अमेरिकेची ‘ही’ गुप्त लष्करी योजना
3

US-Iran Conflict: अमेरिका इराणवर करणार ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’चा वापर? जाणून घ्या काय आहे अमेरिकेची ‘ही’ गुप्त लष्करी योजना

बाबो… अमेरिकेतही ‘लाडकी बहिण’चा Impact? आता Donald Trump यांनी अमेरिकन नागरिकांना दिले हे मोठं आश्वासन
4

बाबो… अमेरिकेतही ‘लाडकी बहिण’चा Impact? आता Donald Trump यांनी अमेरिकन नागरिकांना दिले हे मोठं आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.