Violence erupts again in Thailand-Cambodia; Firing resumes in both countries on border
थायलंड आणि कंबोडियात पुन्हा एकदा सीमावादाला सुरुवात झाली आहे. दरम्यान या वादाने तीव्र रुप धारण केले आहे. गुरुवारी (२४ जुलै) सीमेवर जोरदार गोळीबार झाला. दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये चकामक झाला. यामध्ये दोन्ही देश एकमेकांवर आधी हल्ला केल्याचा आरोप करत आहे. दोन्ही देशांच्या चकामकीत दोन थाई सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही देशांतील सीमावदा तीव्र वाढत चालला आहे.
थायलंड लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, तामुएन थॉम येथील ख्मेर मंदिराजवळ गोळीबाराची घटना घडली. गेल्या काही आठवड्यांपासून दोन्ही देशाच्या सैन्येत या भागात अनेक गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. दोन्ही देशांमधील तणावर लक्षणीयरित्या वाढत आहे.
दरम्यान कंबोडियाच्या संरक्षण मंत्रालयाने थाई सैनिकांनी प्रथम हल्ला केलाचा आरोप केला आहे. यानंतर या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात आणि स्वंसंरक्षणासाठी त्यांच्या सैन्याने हल्ला केला असल्याचे कंबोडियाने म्हटले.
तर दुसरीकडे थायलंडच्या लष्कराने, कंबोडियन सैन्याने सीमावर्ती भागात सशस्त्र सैन्य तैनात करण्यापूर्वी पाळत ठेवणारा ड्रोन पाठवला असल्याचे म्हटले आहे. यामुळे हा हल्ला करण्यात आला असल्याचे थायलंडच्या सैनिकांनी सांगितले.
दरम्यान कंबोडियनसंरक्षण मंत्रालाने, थाई सैन्याच्या हल्ल्याला आणि त्यांच्या देशाच्या सार्वभौमत्वाचे, प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्याचा अधिकार आहे. थायलंडने या प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन केले असल्याने हल्ला करण्यात आला आहे. यापूर्वी देखील मे २०२५ मध्ये अनेक वेळा मोठ्या प्रमाणात गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. सध्या हा वाद अधिक रौद्र रुप घेण्याची शक्यता आहे.
थायलंड आणि कंबोडियात २००८ पासून सुरु सीमा क्षेत्राबाबतचा वाद सुरु आहे. हा वाद सध्या पुन्हा उफाळला आहे. हा वाद हजारो वर्ष जुन्या मंदिरामुळे सुरु झाला होता. प्रेह विहार मंदिरांवरुन हा वाद सुरु आहे. सध्या हे मंदिर कंबोडियाच्या सीमावर्ती प्रांतात आहे.
मात्र थालंडने याचा काही भाग त्यांच्या परिसरात येतो असा दावा केला आहे. २००८ मध्ये या मंदिराला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सामील करण्यात आले होते. यानंतर हा वाद तीव्र भडकाल होता. तेव्हापासून दोन्ही देशांच्या सीमांवर अनेकवेळा गोळीबाराच्या घटन घडल्या आहेत. यामुळे हजारो लोकांचे प्राण गेले आहेत.