Indonesia's Mount Lewotobi Laki-laki erupts
Indonesia Volcano Eruption News : जकार्ता : इंडोनेशियातील (Indonesia) फ्लोरेस बेटावर माउंट लेवोटोबी लाकी-लाकी ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. शुक्रवारी(१ ऑगस्ट) रात्री अचानक बेटावर जोरदार स्फोट झाला, या स्फोटामुळे बेटावर तब्बल १० किलोमीटरपर्यंत राख व धूराचे ढग हवेत फेकले गेले. राखेच्या ढगांमध्ये विजा देखील चमकताना दिसल्या. सध्या या भयावह घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र इंडोनेशियाच्या स्थानिक प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सध्या लेवोटोबीच्या उद्रेकामुळे कोणतीही जीवीतहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही, मात्र खबरदारी म्हणून आसपासच्या परिसरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे निर्देश देण्यात आले आहे. इंडोनेशियाची ज्वालामुखी विज्ञान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट जमिनीखाली साचलेल्या स्फोटक दाबामुळे झाला आहे.
या स्फोटामुळे इंडोनेशियाच्या ज्वालामुखी विज्ञान संस्थेमे Volcanic Mudflow म्हणजे ज्वालामुखीच्या पुराची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना नद्या व खोऱ्यांपासून दूर राहण्याचे, तसेच क्रेटरपासून किमान ६ किलोमीटर अंतर राखण्याचे आदेश दिले आहेत.
ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे आतापर्यंत कोणतीही उड्डाणे रद्द झाल्याची नोंद करण्यात आलेली नाही. मात्र यापूर्वी झालेल्या उद्रेकामुळे जीवितहानीचे गांभीर्य लक्षात घेता बालीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाने २४ उड्डाणे रद्द केली होती. इंडोनेशिया रिंग ऑफ फायरमध्ये स्थित आहे. यामुळे या भागात भूकंपीय आणि ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या घटना सतत होत असतात.
‘ओलिसांची सुटका करा, नाहीतर…’, IDF च्या प्रमुखांची गाझात पुन्हा हल्ले सुरु करण्याची धमकी
Mount Lewotobi ERUPTS again in terrifying scene Ash shoots 18KM into the sky FIRRY cloud and lava burst from Indonesia’s volcano https://t.co/gqUk6AdNjY pic.twitter.com/7RzbggKiYS — RT (@RT_com) August 1, 2025
FAQs (संबंधित प्रश्न)
कसा होतो ज्वालामुखीचा उद्रेक?
पृथ्वीच्या आतील थरामध्ये निर्माण होणाऱ्या दाबामुळे लावा, गरम हवा, राख आणि जलवाष्प एकत्र बाहेर पडल्याने ज्वालामुखीचा उद्रेक होतो.
ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे विजा का चमकतात?
ज्वालामुखीचा उद्रेक होतो, त्यावेळी त्यातून राख आणि गरम हवा बाहेर पडते. यावेळी राख आणि वायूंचे घर्षण होते, ज्यामुळे विजा चमकतात.
काय आहे रिंग ऑफ फायर (Ring Of Fire) ?
रिंग ऑफ फायर हे प्रशांत महासागराभोवती पसरलेले भूकंपीय क्षेत्र आहे. या ठिकाणी सतत भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो. इंडोनेशियात रिंग ऑफ फायरमध्ये स्थित आहे.