'ओलिसांची सुटका करा, नाहीतर...', IDF च्या प्रमुखांची पुन्हा गाझातमध्ये हल्ले करण्याची धमकी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Israel Hamas War : जेरुसेलम : सध्या गाझातील हमास आणि इस्रायल (Israel Hamas war) संघर्ष अजूनही सुरु आहे. अनेक काळापासून युद्धबंदीचे प्रयत्न सुरु आहेत मात्र सर्व प्रयत्न अपयशी ठरत आहेत. जानेवारी २०२५ च्या सुरुवातीला दोन्ही गटांमध्ये युद्धबंदी लागू करण्यात आली होती, मात्र मार्च २०२५ मध्ये हमासने उर्वरित ओलीसांची सुटका न केल्याने इस्रायलने गाझात हल्ले सुरु केले. यामुळे युद्धबंदीचे उल्लंघन झाले. तेव्हापासून इस्रायल गाझातील हमासच्या ठीकाणांवर हल्ले करत आहेत.
दरम्यान पुन्हा एकदा इस्रायलच्या प्रमुख लष्करी अधिकाऱ्याने हमासला इस्रायली ओलिसांची सुटका करण्याची धमकी दिली आहे. तसेच चर्चा सुरु केल्यास गाझात (Gaza) कारवाया पुन्हा एकदा सुरु होतील असे इस्रायलच्या सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्याने म्हटले आहे.
US Deportation : अमेरिकेने भारतीयांना दाखवला बाहेरचा रस्ता; आकडेवारी जाणून बसेल धक्का
इस्रायलची पुन्हा हल्ले सुरु करण्याची धमकी
इस्रायल ((Israel) लष्कराने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये इस्रायल लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल इयाल झमीर यांनी गाझातील अधिकाऱ्यांना संबोधित केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, येत्या काही दिवसांत ओलिसांच्या सुटकेसाठी करार होण्याची शक्यता कमी आहे, गाझातील अधिकारी यामध्ये अपयशी ठरत आहेत. लवकरात लवकर चर्चा पूर्ण करुन ओलिसांची सुटाक करा. ओलिसांची सुटका न झाल्यास युद्ध पुन्हा सुरु करण्याची धमकी इयार झमीर यांनी दिली आहे.
इस्रायलच्या सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२३ मध्ये हमासने इस्रायलवर हल्ला केला होता. यावेळी २५१ इस्रायली नागरिकांचे अपहरण करण्यात आले होते. यातील ४९ लोक अजूनही हमासच्या (Hamas) कैदेत असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. यातील २७ लोकांची मृत्यू झाल्याची शक्यता देखील इस्रायली सैन्याने वर्तवली आहे.
गेल्या २२ महिन्यांपासून युद्ध सुरु
गेल्या महिन्यांत अमेरिका इजिप्त आणि कतारच्या मध्यस्थीखाली इस्रायल आणि हमासमध्ये युद्धबंदीवर चर्चा सुरु झाली होती. मात्र ओलिसांच्या सुटकेच्या अपयशी ठरत आहे. यामुळे इस्रायल गाझातील कारवाया वाढवत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रायलवर दबाव वाढत आहे. गेल्या २२ महिन्यांपासून हा संघर्ष सुरु आहे. या संघर्षामुळे गाझातील पॅलेस्टिनींचे जीवन विस्कळीत झाले आहे. गाझातील पॅलेस्टिनींना पायाभूत सुविधा अन्न, वीज-पाणी मिळणे देखील कठीण झाले आहे. यामुळे सतत युद्धबंदीची मागणी संपूर्ण जगभरातून केली जात आहे.
Muhammad Yunus : ‘अमेरिकेसोबत व्यापारात अपयशी…’ ; बांगलादेशचा भारताला टोला