काय आहे नाझी सॅल्यूट? ट्रम्पच्या शपथविधीत एलॉन मस्कच्या कृतीने का माजलेय जगभरात खळबळ?
अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. शपथविधी सोहळ्याला जगभरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये अमेरिकन उद्योगपती एलोन मस्क यांचाही समावेश होता. डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर मस्क यांनाही व्यासपीठावर भाषण देण्याची संधी मिळाली. दरम्यान, आनंद व्यक्त करताना, मस्क यांनी छातीवर हात ठेवला आणि लोकांना अभिवादन करण्यासाठी सॅल्यूट केला. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्याच्या शैलीचे कौतुक केले पण आता त्यावरून गोंधळ माजला आहे. एलोन मस्कने दिलेला तो सॅल्यूट नाझी सॅल्यूट असल्याचं म्हटलं आहे.
That is 1000% a Nazi salute being given behind the presidential podium on Inauguration Day (also MLK day) by the richest person on the planet. That moment will live in infamy. pic.twitter.com/dkfVMC5Fpk
— Kahlief “Positivity Peddler” Adams (@KahliefAdams) January 20, 2025
एलॉन मस्कचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मस्कने स्वतः त्यांच्या भाषणानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांच्या भाषणाचा काही भाग पोस्ट केला. यासोबतच त्यांनी लिहिले आहे की भविष्य खूप रोमांचक आहे. व्हिडिओमध्ये भाषण दिल्यानंतर मस्क ज्या पद्धतीने हात वर करून अभिवादन करत आहेत त्याची तुलना सोशल मीडियावर लोक नाझी सॅल्यूटशी करत आहेत.
नाझी सॅल्यूटला हिटलर सॅल्यूट असंही म्हटलं जातं. १९३० च्या दशकात जर्मनीमध्ये नाझी विचारसरणीचं वर्चस्व होतं. एक विशेष प्रकारचा सलाम हा या विचारसरणीचं एक शक्तिशाली प्रतीक होता. नाझी सॅल्यूटमध्ये, उजवा हात खांद्यावरून हवेत उंचावला जातो आणि सॅल्यूट दिला जातो. या दरम्यान, तळहात सहसा ४५ अंशाच्या कोनात खाली झुकलेला असतो.
हिटलर आणि नाझी उद्दिष्टांप्रती भक्ती आणि एकतेची भावना दर्शविण्यासाठी नाझी सॅल्यूटचा वापर केला जात असे. सर्व सार्वजनिक कार्यक्रम, रॅली आणि लष्करी समारंभांमध्ये याचा वापर केला जात असे. नाझींना सॅल्यूट देणारा प्रत्येक माणूस हेइल हिटलर म्हणजे माझ्या नेत्याचा जयजयकार किंवा सिएग हेइल म्हणजे त्याला सलाम म्हणायचा.
जरी नाझी सॅल्यूटला हिटलर सॅल्यूट म्हटलं जात असलं तरी त्याचा शोध हिटलर किंवा हुकूमशहा मुसोलिनी यांनी लावला नव्हता. नाझी सॅल्यूट हा मुळात रोमन सॅल्यूटचा सर्वात प्रसिद्ध प्रकार आहे. तथापि, दोघांच्याही उद्दिष्टांमध्ये खूप फरक आहे. प्राचीन रोममध्ये रोमन सॅल्यूट हा मूळात आदर आणि निष्ठेचे प्रतीक होते, परंतु नाझी विचारवंतांनी ते वापरण्यास सुरुवात केल्यावर त्याचा अर्थ बदलला.
इटलीमध्ये मुसोलिनीच्या फॅसिस्ट विचारसरणीत आणि जर्मनीमध्ये हिटलरच्या नाझी विचारसरणीत ते दडपशाहीचे प्रतीक बनले. टॉर्बजॉर्न लुंडमार्क यांचे टेल्स ऑफ हाय अँड बाय नावाचे एक पुस्तक आहे. यात स्पष्टपणे सांगितलं आहे की, नाझी सॅल्यूटचा शोध हिटलर किंवा मुसोलिनीने लावला नव्हता. ते दुसरे महायुद्ध आणि युरोपपुरते मर्यादित नाही. हा सॅल्यूट रोमन साम्राज्याच्या काळापासून अस्तित्वात आहे आणिल सॅल्यूट रोमानो (रोमन सॅल्यूट) म्हणून ओळखलं जातं.
राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणात अनेक घोषणा केल्या. यावेळी, त्यांनी त्यांच्या कार्यकाळातील योजनांची यादी केली आणि मंगळावरील मोहिमेचाही उल्लेख केला. वॉशिंग्टन डीसीमधील कॅपिटल वन अरेना येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात जेव्हा अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी मंगळ मोहिमेचा उल्लेख केला त्यावेळी ते खूपच आनंदी आणि उत्साही दिसत होते. त्यांची कंपनी स्पेसएक्स देखील अंतराळ योजनांमध्ये सहभागी आहे.
समारंभाला संबोधित करण्याची त्यांची पाळी आली तेव्हा मस्क म्हणाले की जिंकण्याचा अनुभव असाच असतो. निवडणुका येतात आणि जातात, पण ही निवडणूक खरोखरच महत्त्वाची आहे. अमेरिकन अंतराळवीर त्यांचा ध्वज घेऊन दुसऱ्या ग्रहावर जातील तेव्हा ते किती अद्भुत असेल याची तुम्ही कल्पना करू शकता का? त्यांनी लोकांना वचन दिले की मी तुमच्यासाठी कठोर परिश्रम करेन.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, सोशल मीडियावर ट्रम्पच्या शपथविधी सोहळ्यात मस्कने सलग दोनदा नाझी सलामी दिल्याचं म्हटलं जात आहे. आता एलोन मस्क यांनीही सोशल मीडियावर होत असलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे की, खरं सांगायचं तर, त्यांना आणखी वाईट पद्धतींची आवश्यकता आहे. ‘प्रत्येकजण हिटलर आहे’ ही म्हण आता खूप जुनी झाली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सरकारी कार्यक्षमता विभाग (DOGE) मध्ये एक सल्लागार गट स्थापन केला आहे. ट्रम्प यांनी टेस्लाचे सीईओ एलोन मस्क आणि भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांची सरकारी कार्यक्षमता विभागात नियुक्ती केली आहे. अमेरिकेच्या संघराज्य सरकारमधील तीन-चतुर्थांश नोकऱ्या कमी करण्याचे आणि अनेक संघराज्य संस्थांना काढून टाकण्याचे मार्ग सूचवण्याचं या सल्लागार गटाचं उद्दिष्ट आहे.