
बिकिनी इमेज ट्रेंडनंतर X चा मोठा निर्णय! आता केवळ 'या' यूजर्सना मिळणार Grok AI वर फोटो बनवण्याची सुविधा, नेमकं प्रकरणं काय?
खरं तर एक्स प्लॅटफॉर्मवर अलीकडेच एक ट्रेंड सुरु झाला होता. यामध्ये ग्रोक एआय लोकांना ईमेज एडीट करून अनड्रेस करून देत होता. हा ट्रेंड प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर भारत आणि ब्रिटनसह अनेक देशांमधील सरकारने कंपनीला नोटिस पाठवले. याबाबत कठोर कारवाई करत योग्य निर्णय घेण्यास सांगितलं. याबाबत आता एक्सने निर्णय घेतला असून या परिणाम यूजर्सवर होणार आहे. अनेक देशांच्या सरकारने पाठवलेली नोटीस आणि सर्वत्र झालेल्या टिकेनंतर आता कंपनीने ग्रोकवरील ईमेज एडीटींग सेवा केवळ पेड यूजर्ससाठी उपलब्ध केली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
ग्रोक एआयच्या बिकिनी ट्रेंडबाबत भारत सरकारने कठोर निर्देश जारी केले. सरकारने सांगितलं की, भारतात अशा प्रकारचा कंटेट सहन केला जाणार नाही आणि कंपनीला त्यांच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेला अशा प्रकारचा कंटेट त्वरित हटवावा लागणार आहे. या प्रकरणी एक्सने दिलेली उत्तर सराकारने मान्य केली नाहीत आणि सांगितलं की, कंपनीला स्पष्टपणे सांगावे लागेल की भविष्यात अशा प्रकराच्या ट्रेंडला रोखण्यासाठी कोणते निर्णय घेतले जाणार आहेत.
iPhone 17 vs Galaxy S25 Ultra: Apple की Samsung? परफॉर्मन्स, कॅमेरा आणि फीचर्समध्ये कोण मारतंय बाजी?
या संपूर्ण आता एक्सने सांगितलं आहे की, केवळ पेड सब्सक्राइबर्स म्हणजेच ब्लू टिक वाले यूजर आता ग्रोकवर इमेज एडिट करू शकणार आहेत. याचा अर्थ असा आहे की, केवळ व्हेरिफाईड पेड अकाऊंट असलेले यूजर्सचं ग्रोकवर इमेज एडिटिंग करू शकणार आहेत. या यूजर्सचे नाव आणि पेमेंट डिटेल्स कंपनीकडे स्टोअर केलेले असतील. तथापि, याचा अर्थ असा नाही की यूजर ग्रोकवर मोफत इमेज एडिट करू शकणार नाहीत. ते ग्रोक अॅप किंवा वेबसाइटद्वारे पूर्वीसारखे इमेज एडिट करू शकतात. तेथे किती तांत्रिक सुरक्षा उपाय सुरू करण्यात आले आहेत हे अद्याप माहिती नाही.
Ans: Grok हा Elon Musk यांच्या xAI (एक्सएआय) कंपनीचा AI टूल आहे.
Ans: Grok रिअल-टाइम माहिती देतो, X (पूर्वीचे Twitter) वरील ट्रेंड्स समजतो आणि थोड्या विनोदी शैलीत उत्तरं देतो.
Ans: Grok प्रामुख्याने X (Twitter) प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.