why Lipulekh Pass important for India Know in detail
भारत आणि चीनमध्ये सीमाव्यापारावर सहमती झाली असून यासाठी लिपुलेख खिंडीचा मार्ग निवडण्यात आला आहे. पण नेपाळने याला तीव्र विरोध केला आहे. याला भारताने प्रत्युत्तर देत १९५४ पासून हा व्यापार सुरु असल्याचे म्हटले आहे. पण भारतासाठी ही खिंड इतकी महत्वाची का आहे? आणि भारत आणि नेपाळमध्ये यावरुन वाद का सुरु आहे? हे आज या लेखातून आपण या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत.
लिपुलेख खिंड हिमालयाच्या उंच पर्वतांमध्ये ५ हजार ११५ मीटर उचींवर आहे. येथे भारत, चीन आणि नेपाळच्या सीमा येऊन मिळतात यामुळे याला त्रिकोणी जंक्शन म्हटले जाते. गेल्या अनेक काळापासून हा या भागातून भारत व्यापार करतो. तसेच कैलास मानसरोवरच्या यात्रेकरुंसाठी ही खिंड महत्वाची आहे. भारतासाठी याचे धोरणात्मक, धार्मिक आणि आर्थिक महत्व फार आहे.
१८१६ मध्ये ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी आणि नेपाळमध्ये सुगौली करार करण्यात आला होता. याअंतर्गत काली नदी भारत-नेपाळ सीमा म्हणून निश्चित करण्यात आली होती. पण नेपाळच्या मते, काली नदी लिपुलेख खिंडीतून उगम पावते, म्हणजेच कालापानी आणि लिंपियाधुरा हे नेपाळचे भाग आहेत.
नेपाळने दावा केला आहे की, ब्रिटीश काळात या सीमा चुकीच्या पद्धधतीने निश्चित करण्यात आल्या. परंतु भारताने हा दावा फेटाळला आहे.
भारताने सुरुवातीपासून हा दावा फेटाळला असून भारताच्या मते, काली नदी कालापाणी गावाजवळ उगम पावते. १८७९ च्या सर्व्हे ऑफ इंडियाच्या नकाशात कालापाणी हा भाग भारताचा दाखवण्यात आला आहे.
या नकाशानुसार, कालापाणी परिसर १८३० पासून अधिकृतरित्या भारताचा भाग आहे. यामुळे भारत नेपाळचे दावे फेटाळत आला आहे. तसेच १९५४ पासून भारत आणि चीनमध्ये या भागातून व्यापार केला जातो, यामुळेही भारताने नेपाळचे दावे फेटाळले आहे.
भारतासाठी का महत्वाची आहे लिपुलेख खिंड?
भारतासाठी लिपुलेख मार्ग हा धोरणात्मक, आर्थिक आणि धार्मिक दृष्टीकोमनातून महत्वाचा आहे. हे कसे ते आता आपण समजून घेऊयात.
पण यावर नेपाळने तीव्र विरोध केला आहे. शिवाय यामध्ये चीनचाही मोठा स्वार्थ आहे. येथून चीन आणि भारतमधील अंतर कमी आहे. हे चीनसाठी भू-राजकीय, धोरणात्मक आणि आर्थिक दृष्ट्या महत्वाचे आहे. चीन आणि भारतामझील युद्धादरम्यान हा मार्ग बंद झाला होताच परंतु याचा वापर करुन चीन भारतावर दबाव आणण्याची शक्यता आहे. सध्या भारत आणि चीन दोन्ही देशांना याचे फायदे आहेत.
नेपाळचे पंतप्रधान ओली भारत दौऱ्यावर; विशेष आमंत्रणासाठी परराष्ट्र सचिव काठमांडूत