नेपाळचे पंतप्रधान ओली भारत दौऱ्यावर; विशेष आमंत्रणासाठी परराष्ट्र सचिव काठमांडूत (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Nepal news in Marathi : काठमांडू : नेपाळचे (Nepal) पंतप्रधान केपी ओली शर्मा भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. पुढील महिन्यात त्यांचा दौरा निश्चित करण्यात आला आहे. यावेळी पंतप्रधान ओली शर्मा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. याच वेळी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री काठमांडूच्या दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर नेपाळला गेले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री पंतप्रधान ओली शर्मा यांना भारताकडून औपचारिक आमंत्रण देण्याची शक्यता आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यात १६ तारखेला पंतप्रधान ओली शर्मा भारतात येणार आहे. हा दौरा भारत आणि नेपाळच्या मजबूत संबंधासाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.
ट्रम्पचा दुहेरी खेळ? भारतावर टॅरिफचा बोजा, पण रशियाशी अमेरिकेचा व्यापार तेजीत
काठमांडूच्या वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, केपी ओली शर्मा पंतप्रधान मोदींची भेट घेणार असून ही भेट बोधगयात होणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी स्वत: त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहतील. त्यानंतर १७ सप्टेंबरला पंतप्रधान मोदींचा वाढदिवसादिवशी दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होईल.
या बैठकीत दोन्ही देशांचे प्रतिनिधी मंडळ सहभागी असले. यावेळ नेपाळ आणि भारतामधील संबंधावर चर्चा होईल. तसेच या भेटीनंतर ओली शर्मा नालंदा युनिव्हर्सिटीला भेट देणार आहेत. नेपाळचे पंतप्रधान ओली शर्मा यांनी भारत भेटीसाठी उत्सुकता व्यक्त केली आहे.
सध्या भारताचे परराष्ट्र सिचव विक्रम मिस्री काठामंडूत रविवारी सकाळी दाखल झाले आहे. यादरम्यान ते नेपाळचे अध्यक्ष रामचंद्र पौडेल, पंतप्रधान केपी ओली शर्मा आणि नेपाळच्या कॉंग्रसचे अध्यक्षांची भेट घेणार आहे. तसेच सीपीएनचे प्रचंड याची आणि परराष्ट्र मंत्री अर्जू राणा देउबा यांचीही ते भेट घेतील.
विक्रम मिस्री यांचा गा दुसरा नेपाळ दौरा आहे. यापर्वी त्यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये काठमांडूला भेट दिली होती. या भेटीदरम्यान भारत आणि नेपाळमध्ये कनेक्टिव्हीटी, विकास सहकार्य आणि इतर द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा होईल.
नेपाळ आणि भारतामध्ये २०२४ पासून संबंधांमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहेत. भारताच्या अधिकृत नकाशात लिपुलेख सारख्या काही भागांचा समावेश होता. यावरुन ओली सरकारने वादग्रस्त विधाने केली होती. यामुळे दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले. यामुळे हे ताणलेले संबंध सुधारण्यासाठी हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.
गेल्या वर्षी २०२४ जुलैमध्ये नेपाळच्या पंतप्रधान पदाची ओली शर्मा यांनी शपथ घेतली. त्यानंतर पारंपारिकपणे त्यांचा पहिला विदेश दौरा हा भारताला होणार होता. पण पंतप्रधानांनी ही परंपरा मोडली आणि पहिल्या परराष्ट्र दौऱ्यात चीनला भेट दिली. या भेटीनंतरच चीन आणि भारतामध्ये नेपाळने चीनला प्राधान्य दिल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
पाकिस्तानात आणखी एक अपघात; प्रवासी ट्रेन रुळावरून घसरल्याने १ जण ठार २० हून अधिक जखमी