Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nepal Election 2026 : Gen Z विद्रोहानंतर नेपाळमध्ये पहिल्यांदाच मतदान; ‘या’ तीन नेत्यांमध्ये चुरशीची लढत

Nepal Elections : नेपाळमध्ये येत्या ५ मार्च २०२६ रोजी निवडणुक पार पडणार आहे. जनरेशनल-झेड च्या विद्रोहानंतर पहिल्यांदाच नेपाळमध्ये निवडणुका होत असून याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 28, 2026 | 10:44 AM
Candidates for the post of Prime Minister in Nepal KP Sharma Oli, Gagan Thapa, Balendra Shah

Candidates for the post of Prime Minister in Nepal KP Sharma Oli, Gagan Thapa, Balendra Shah

Follow Us
Follow Us:
  • नेपाळमध्ये ०५ मार्च २०२६ रोजी होणार सार्वत्रिक निवडणुका
  • जनरेशनल झेडच्या आंदोलनांनतर पहिल्यांदाच पार पडत आहे मतदान
  • या तीन नेत्यांमध्ये चुरशीची लढत
Nepal Elections 2026 news in marathi : काठमांडू : नेपाळचे (Nepal) राजकारण आता एका अत्यंत निर्णायक आणि ऐतिहासिक वळणावर येऊन पोहचले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सुरु झालेल्या जनरेशनल झेडच्या तरुणांनी ओली सरकारविरोधात आंदोलन छेडले होते. यामुळे देशात प्रचंड अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान या विद्रोहानंतर आता नेपाळमध्ये ०५ मार्च २०२६ रोजी सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहेत. सध्या संपूर्ण देश नव्या नेतृत्वाच्या शोधात असून यासाठी तीन प्रमुख उमेदवारांमध्ये लढत सुरु आहे. आता यामध्ये नेमकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नेपाळमध्ये सत्ता हालवण्यासाठी शिजतोय कट? चार राजकीय पक्षांच्या कुटनीतीची जगभरात चर्चा

सत्तेसाठी तीन प्रमुख उमेदवार मैदानात

नेपाळमध्ये पंतप्रधान पदासाठी सध्या तीन उमेदवारांमध्ये चुरशीची लढत सुरु आहे. यामध्ये युवांमध्ये लोकप्रिय असणारे बालेंद्र शाह उर्फ बालेन शाह सध्या आघाडीवर आहेत.  केपी शर्मा देखील पुन्हा सत्तेत येण्यासाठी कम्युनिस्ट पक्षातून प्रयत्न करत आहेत. तर या दोन्ही नेत्यांना आव्हान देण्यासाठी जुन्या नेपाळी कॉंग्रसचे तरुण नेते गगन थापा पंतप्रधान पदासाठी उमेदवार आहेत.

तरुणांचे लोकप्रिय नेते बालेन शाह

सध्या नेपाळच्या तरुणांमध्ये सर्वात लोकप्रिय असलेले बालेन शाह याच्या सत्तेत येण्याची शक्यता अधिक असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे. त्यांच्या कामाची आणि साधेपणाची पद्धत लोकांना खूप आवडते. 2022 च्या निवडणुकीत बालेन शाह यांनी आपला स्वतंत्र पक्ष स्थापन केला होता.  या निवडणुकीत त्यांचा दणदणीत विजय झाला होता. त्यांनी अनेक मोठ्या राजकीय पक्षांच्या पराभव करत महापौर पद मिळवले होते.

बालेन शाह नेपाळमधील मोठ्या बदलाचे संकेत मानले जातात. बालेन शाह यांनी पंतप्रधान पदासाठी काठमांडूच्या महापौर पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा हा राजीनामा नेपाळचे माजी पदच्युत पंतप्रधान केपी ओली शर्मा (KP Sharma Oli) यांना थेट आव्हान मानला जात आहे. बालेन शाह आता राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी (RSP) पक्षातून पंतप्रधान पदासाठी निवडणूका लढवणार आहेत.

गगन थापा

याच वेळी नेपाळच्या कॉंग्रसचे 49 वर्षीय नेते गगन थापा देखील नेपाळच्या जनतेमध्ये लोकप्रिय आहे. यंदा त्यांनी  जनतेला भ्रष्टाचाराविरोधात आवश्यक आणि कठोर पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.  सत्तेत येताच त्यांनी  पारदर्शकतेसाठी  शक्तिशाली आयोग स्थापन करुन भ्रष्टाचाराच्या मोठ्या घोट्याळ्यांची चौकशी करणार असल्याचे म्हटले आहे.

माजी पंतप्रधान केपी शर्मा

नेपाळच्या जनरेशनल झेडच्या तरुणांनी  गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये केपी ओली शर्मा सरकार हाणून पाडले होते. सरकारच्या सोशल मीडियावरील बंदी, भ्रष्टाचार, बेरोजगारी, आणि नेपोटिझमविरोधात आंदोलन छेडले होते. या आंदोलना प्रचंड हिंसाचार झाला होता. ओली सरकारमधील अनेक नेत्यांची घरे जाळून त्यांना मारहाण करण्यात आली होती. यावेळी ओली शर्मा यांना आपल्या पदाचा राजीनामा दाव्या लागला होता. सध्या ओली शर्मा पुन्हा सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Nepal Election : नेपाळच्या राजकारणात नवी लाट! बालेन शाह बनले पंतप्रधान पदाचे दावेदार

💡

Frequently Asked Questions

  • Que: नेपाळच्या निवडणुकीत पंतप्रधान पदासाठी प्रमुख उमेदवार कोण आहेत?

    Ans: नेपाळच्या 2026 च्या निवडणुकीत पंतप्रधान पदासाठी तरुणांचा लोकप्रिय नेते बालेंद्र शाह, नेपाळ कॉंग्रेसचे नेते गगन थापा आणि नेपाळचे माजी पदच्युत पंतप्रधान सत्तेसाठी मैदानात उतरले आहेत.

  • Que: नेपाळच्या 2026 च्या निवडणुका महत्वाच्या का मानल्या जात आहे?

    Ans: गेल्या वर्षी झालेल्या जनरेशनल झेडच्या हिंसक आंदोलनानंतर नेपाळमध्ये पहिलीच मोठी निवडणुक होत आहे. यावर देशाचे राजकीय भविष्य ठरणार असल्याने ही निवडणुक अत्यंत महत्वाची मानली जात आहे.

  • Que: सध्या नेपाळचे सरकार कोणाकडे आहे?

    Ans: सध्या नेपाळमध्ये सुशीला कार्की यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार सत्तेत आहे,

Web Title: Nepal election 2026 gen z violent protest balen shah gagan thapa oli sharma in pm race

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 10:43 AM

Topics:  

  • KP Sharma Oli
  • nepal
  • Nepal News
  • sushila karki
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.