
फोटो सौजन्य AI फोटो सौजन्य AI
जगातली सर्वात खोल नदी आणि अमेझॉनच्या जंगलानंतर चे सर्वात मोठे जंगल रेनफॉरेस्ट या नावाने DRC ( कॉंगो ) मध्ये आहे . पण तेथील खनिजांवरून सुरु असलेले गृहयुद्ध यामुळे या देशाची प्रगती आणि शांती गायब आहे . आता तिथल्या सरकार पुढे ही जनगणना अचूकपणे पार पडण्याची मोठी कसरत असणार आहे . आफ्रिकेमध्ये दोन कॉंगो आहेत एक रिपब्लिक ऑफ कॉंगो आणि दुसरा डेमोक्रॅटिक रिपब्लिक कॉंगो , जनगणना करणारा हा डेमोक्रॅटिक रिपब्लिक कॉंगो आहे .
जवळ जवळ ४२ वर्षांनी DRC मध्ये दुसरी राष्ट्रीय अधिकृत जनगणना होत आहे . शेवटची अधिकृत जनगणना १९८४ मध्ये झाली होती . तेव्हा देशाची लोकसंख्या जवळपास ३ कोटी होती . आजचा अंदाज ११. २८ पेक्षा जास्त आहे . तसेच या जनगणनेचा खर्च अंदाजे १९२ दशलक्ष डॉलर ठेवण्यात आला आहे . मार्च २०२६ पर्यंत ८४ टक्के निधी उभारला गेला आहे . अशी माहिती मिळत आहे . तसेच संयुक्त राष्ट्र संघाकडून काँगोला तांत्रिक मदत देखील मिळत आहे . याचबरोबर जनगणना सुरु होत असताना या देशाचे नकाशांकन ( mapping ) करण्याचे काम ही सुरु करण्यात आले आहे .
जनगणनेतून सरकारला देशात किती लोक आहेत ते कुठे राहतात आणि कोणत्या भागात किती लोकसंख्या आहे याची अचूक माहिती मिळेल . त्यावरून शाळा , रुग्णालये , रस्ते , पाणी ,वीज , रोजगार आणि सरकारी योजनांसाठी निधीचे नियोजन करणे सोप्पे होईल .
DRC मधील काय भाग हा संघर्षग्रस्त आहे . त्यामुळे देशाच्या प्रत्येक भागात लोकांपर्यंत पोहोचून अचूक आकडे गोळा करणे हे सरकार आणि UNFPA समोर मोठे आव्हान आहे . राष्ट्रपती फेलिक्स त्शिसेकेदी यांनी देशाच्या संपूर्ण भूभागात करण्यावर भर दिला आहे . तसेच या देशात याआधी ४२ वर्षांपासून लोकसंख्येचा हिशोबच नाही असेही जाणकार सांगत आहेत . तसेच ही जनगणना करत असताना कोणताही हिंसाचार होऊ नये याची देखील काळजी DRC सरकारला करावी लागणार आहे .