Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Giorgio Armani Passes Away: फॅशन विश्वातील ‘किंग’ हरपला! जॉर्जियो अरमानी यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन

जगातील प्रसिद्ध फॅशन डिझायनर जॉर्जियो अरमानी यांचे ९१ व्या वर्षी निधन झाले. 'किंग ऑफ फॅशन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरमानींनी आपल्या ब्रँडने फॅशन जगतात कसे क्रांती घडवली जाणून घ्या...

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 04, 2025 | 09:32 PM
Giorgio Armani Passes Away: फॅशन विश्वातील ‘किंग’ हरपला! जॉर्जियो अरमानी यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन
Follow Us
Close
Follow Us:

Giorgio Armani Passes Away: जगप्रसिद्ध फॅशन डिझायनर जॉर्जियो अरमानी (Giorgio Armani) यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले आहे. ‘अरमानी’ या ब्रँडने कपड्यांच्या जगात एक वेगळीच ओळख निर्माण केली होती, जी आजही कायम आहे. या ब्रँडचे कपडे वापरणे म्हणजे एक प्रकारचा ‘स्टेटस सिम्बॉल’ मानला जातो. अरमानी यांच्या निधनाने फॅशन जगतातील एका गौरवशाली युगाचा अंत झाला आहे. अरमानी ग्रुपने एका शोक संदेशात म्हटले आहे की, ‘असीम दु:खाने अरमानी ग्रुप हे जाहीर करत आहे की, आमचे संस्थापक आणि प्रेरणास्थान जॉर्जियो अरमानी यांचे निधन झाले आहे.’

‘या’ वर्षीही फॅशन शोमध्ये सहभाग

जॉर्जियो अरमानी काही काळापासून अस्वस्थ होते. याच कारणामुळे जूनमध्ये मिलान मेन्स फॅशन वीकमध्ये ते सहभागी होऊ शकले नाहीत. त्यांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच त्यांनी आपल्या ब्रँडचा एखादा इव्हेंट चुकवला होता. या वर्षीच्या सुरुवातीला पॅरिस, फ्रान्स येथे आयोजित ‘जॉर्जियो अरमानी प्रिवेची हाऊते कूचर स्प्रिंग/समर २०२५’ कलेक्शन शोच्या शेवटी त्यांची उपस्थिती ही त्यांची सार्वजनिक मंचावरील शेवटची उपस्थिती ठरली.

जॉर्जियो अरमानी आणि त्यांचा चिरंतन वारसा

‘रे जॉर्जियो’ म्हणजेच किंग जॉर्जियो म्हणून ओळखले जाणारे जॉर्जियो अरमानी हे जागतिक फॅशन जगतातील एक प्रतिष्ठित नाव होते. त्यांच्या साध्या, पण अत्यंत आकर्षक आणि आधुनिक डिझाइनसाठी ते ओळखले जात. १९३४ मध्ये इटलीतील पियाचेंझा येथे जन्मलेल्या अरमानी यांनी आपल्या करिअरची सुरुवात ‘विंडो ड्रेसिंग’ने केली. १९७० च्या दशकात डिझायनर म्हणून त्यांना खरी ओळख मिळाली आणि त्यानंतर त्यांनी अनेक वर्षे फॅशन जगताचे नेतृत्व केले.

हे देखील वाचा: नीता अंबानींचे कपडे डिझाइन करते ‘ही’ फॅशन डिझायनर; हजारो कोटींच्या संपत्तीची आहे मालकीण!

१९७५ मध्ये सुरू झालेल्या त्यांच्या ‘अरमानी’ ब्रँडने पुरुषांच्या कपड्यांमध्ये क्रांती घडवली. नंतर त्यांच्या व्यवसायाचा विस्तार महिलांचे फॅशन, अ‍ॅक्सेसरीज, फ्रेगरन्स आणि लक्झरी लाइफस्टाइलपर्यंत झाला. ‘किंग ऑफ फॅशन’ म्हणून ओळखले जाणारे अरमानी यांचा वारसा त्यांच्या कालातीत लक्झरी डिझाइन्समुळे नेहमीच जिवंत राहील, ज्यांनी अनेक पिढ्यांतील डिझायनर्स आणि फॅशनप्रेमींना प्रेरणा दिली. त्यांचे डिझाइन केवळ फॅशन शोपुरते मर्यादित नव्हते, तर हॉलिवूड रेड कार्पेट्स, बॉलिवूड, जगभरातील नेते आणि जागतिक स्टाइल स्टेटमेंटमध्येही त्यांची ख्याती पसरली होती.

जॉर्जियो अरमानी यांचा अंत्यसंस्कार

मिळालेल्या वृत्तानुसार, शनिवार आणि रविवार रोजी मिलानमध्ये त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्याची व्यवस्था केली जाईल. त्यानंतर अज्ञात दिवशी आणि ठिकाणी खाजगी अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

Web Title: World renowned fashion designer giorgio armani dies at the age of 91

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 09:30 PM

Topics:  

  • international news

संबंधित बातम्या

Nepal Banned Social Media: सोशल मीडियाला नेपाळचा ‘धक्का’; फेसबुक, एक्स, व्हॉट्सॲपसह २६ प्लॅटफॉर्मवर बंदी
1

Nepal Banned Social Media: सोशल मीडियाला नेपाळचा ‘धक्का’; फेसबुक, एक्स, व्हॉट्सॲपसह २६ प्लॅटफॉर्मवर बंदी

IRCC : कॅनडामध्ये भारतीयांना कायमस्वरूपी रहिवासी बनण्याची सुवर्णसंधी; कार्नी सरकारने पाठवले आमंत्रण
2

IRCC : कॅनडामध्ये भारतीयांना कायमस्वरूपी रहिवासी बनण्याची सुवर्णसंधी; कार्नी सरकारने पाठवले आमंत्रण

Yudh Abhyas 2025 : ड्रोन विरुद्ध काउंटर-ड्रोन; हिमालयात धोका? अलास्कातील भारत-अमेरिका युद्ध सरावामागे ‘मोठं’ गुपित
3

Yudh Abhyas 2025 : ड्रोन विरुद्ध काउंटर-ड्रोन; हिमालयात धोका? अलास्कातील भारत-अमेरिका युद्ध सरावामागे ‘मोठं’ गुपित

World Muslim Population : मुस्लिम देशांचा नेता बनण्याचा प्रयत्न करणाऱ्या तुर्कीमध्ये लोक का सोडत आहेत इस्लाम?
4

World Muslim Population : मुस्लिम देशांचा नेता बनण्याचा प्रयत्न करणाऱ्या तुर्कीमध्ये लोक का सोडत आहेत इस्लाम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.