Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

X India: अश्लील पोस्टबद्दल X ने मागितली माफी; 600 हून अधिक खाती केली डिलीट, म्हणाले, ‘भारतीय कायद्याचे…’

MeitY Action on Grok : एक्सने भारतात पोर्नोग्राफिक सामग्री सुलभ केल्याबद्दल आपली चूक मान्य केली, 3,500 पोस्ट ब्लॉक केल्या आणि 600 खाती हटवली, भविष्यात नियमांनुसार कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 11, 2026 | 12:38 PM
x apologizes to india deletes 600 accounts for obscene content grok ai controversy

x apologizes to india deletes 600 accounts for obscene content grok ai controversy

Follow Us
Close
Follow Us:
  • X कडून चूक मान्य
  • ६०० हून अधिक खाती डिलीट
  • Grok AI वर सरकारचा निशाणा

X India apology on pornographic content :  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X‘ (पूर्वीचे ट्विटर) आणि भारत सरकार यांच्यातील तणाव आता एका निर्णायक वळणावर पोहोचला आहे. अश्लील आणि आक्षेपार्ह मजकुराबाबत केंद्र सरकारने पाठवलेल्या नोटिसीनंतर, ‘X’ ने आपली चूक मान्य केली आहे. भारतीय कायद्यांचे पालन करण्यात आपल्याकडून त्रुटी राहिल्याचे मान्य करत, कंपनीने आतापर्यंत ६०० हून अधिक खाती कायमची बंद केली असून ३,५०० हून अधिक पोस्ट्स ब्लॉक केल्या आहेत. विशेष म्हणजे, भारताच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) दिलेला कठोर इशारा या कारवाईला कारणीभूत ठरला आहे.

नेमकं प्रकरण काय? Grok AI आणि अश्लीलतेचा धोका

एलन मस्क यांच्या मालकीच्या ‘X’ प्लॅटफॉर्मवरील ‘Grok AI’ हे साधन सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या AI टूलचा वापर करून काही वापरकर्ते महिलांचे अश्लील, अपमानजनक आणि बनावट फोटो/व्हिडिओ (Deepfakes) तयार करत असल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या होत्या. केंद्र सरकारने याला आयटी कायद्याचे गंभीर उल्लंघन मानले आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले की, ‘Grok’ कडून अशा प्रकारचा बेकायदेशीर मजकूर तयार होणे ही तांत्रिक आणि देखरेखीची मोठी त्रुटी आहे.

सरकारचा अल्टिमेटम आणि ७२ तासांचा थरार

सुरुवातीला, ‘X’ ला ५ जानेवारीपर्यंत आपला अहवाल सादर करण्यास सांगितले होते, परंतु सरकारने ही मुदत ७ जानेवारीपर्यंत वाढवली होती. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने ‘X’ ला स्पष्ट बजावले होते की, जर ७२ तासांच्या आत आक्षेपार्ह मजकूर काढला नाही, तर ‘X’ ला मिळणारे कायदेशीर संरक्षण (Safe Harbour Protection) काढून घेतले जाईल. याचा अर्थ असा की, प्लॅटफॉर्मवर कोणीही चुकीची पोस्ट टाकली, तर त्यासाठी कंपनीला जबाबदार धरून थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल.

X admits mistake, says will follow Indian laws on AI use; blocks obscene content: Sources Read @ANI Story l https://t.co/xCqOql0PKN #Grok #AIUse #IndianLaws pic.twitter.com/pfssIrfl6d — ANI Digital (@ani_digital) January 11, 2026

credit : social media and Twitter

X ने सुरक्षेची दिली हमी; बीएनएस (BNS) चा धाक

सरकारच्या दणक्यानंतर, ‘X’ ने आपल्या अधिकृत सुरक्षा हँडलवरून निवेदन जारी केले आहे. कंपनीने म्हटले आहे की, “आम्ही भारतीय कायद्यांचा आदर करतो आणि प्लॅटफॉर्मवर अश्लील किंवा प्रतिबंधित सामग्रीला थारा दिला जाणार नाही. आम्ही स्थानिक सरकारला पूर्ण सहकार्य करण्यास बांधील आहोत.” जर ‘X’ ने पुन्हा अशा नियमांचे उल्लंघन केले, तर त्यांना आयटी कायदा आणि नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.

कलम ७९ आणि कंपन्यांची जबाबदारी

आयटी कायद्याचे कलम ७९ हे सोशल मीडिया कंपन्यांना ‘मध्यस्थ’ (Intermediary) म्हणून संरक्षण देते. जोपर्यंत या कंपन्या नियमांचे पालन करतात, तोपर्यंत वापरकर्त्यांच्या पोस्टसाठी कंपनीला दोषी धरले जात नाही. मात्र, ‘X’ ने ज्या प्रकारे अश्लीलतेला मोकळीक दिली होती, त्यामुळे हे संरक्षण धोक्यात आले होते. आता ‘X’ ने आपली मॉनिटरिंग सिस्टम अधिक मजबूत करण्याचे आणि भविष्यात कोणत्याही तांत्रिक कमतरता राहू न देण्याचे आश्वासन दिले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: 'X' ने कोणत्या प्रकारची चूक मान्य केली आहे?

    Ans: 'X' ने भारतीय आयटी कायद्यांचे उल्लंघन करून प्लॅटफॉर्मवर अश्लील आणि अपमानजनक मजकूर (विशेषतः Grok AI द्वारे तयार केलेला) प्रसारित होऊ दिल्याबद्दल चूक मान्य केली आहे.

  • Que: सरकारने 'X' ला काय इशारा दिला होता?

    Ans: मंत्रालयाने इशारा दिला होता की, जर ७२ तासांत आक्षेपार्ह मजकूर हटवला नाही, तर 'X' चे कायदेशीर संरक्षण काढून घेतले जाईल आणि कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील.

  • Que: 'Grok AI' चा या वादाशी काय संबंध आहे?

    Ans: 'Grok' या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून महिलांचे अश्लील फोटो तयार केले जात होते, जे प्लॅटफॉर्मच्या सुरक्षा प्रणालीतील अपयश मानले गेले आहे.

Web Title: X apologizes to india deletes 600 accounts for obscene content grok ai controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 12:38 PM

Topics:  

  • elon musk
  • international news
  • Twitter Account

संबंधित बातम्या

CENTCOM: वेचून मारणार!Trump च्या आदेशानंतर अमेरिकेचा सीरियात सर्वात मोठा हवाई हल्ला; 70 पेक्षा जास्त दहशतवादी ठार
1

CENTCOM: वेचून मारणार!Trump च्या आदेशानंतर अमेरिकेचा सीरियात सर्वात मोठा हवाई हल्ला; 70 पेक्षा जास्त दहशतवादी ठार

Pakistan Coup: पाकिस्तानात ‘पाळीव साप’ मालकालाच चावणार? लष्कर-ए-तैयबाचे असीम मुनीर यांना उघड आव्हान; सत्तापालटाची चिन्हे
2

Pakistan Coup: पाकिस्तानात ‘पाळीव साप’ मालकालाच चावणार? लष्कर-ए-तैयबाचे असीम मुनीर यांना उघड आव्हान; सत्तापालटाची चिन्हे

VIDEO VIRAL : Iranमध्ये महिला शक्तीचा उग्र उद्रेक; हिजाबनंतर आता सिगारेट बनली क्रांतीचे शस्त्र, ‘त्या’ फोटोने उडाली जगभरात खळबळ
3

VIDEO VIRAL : Iranमध्ये महिला शक्तीचा उग्र उद्रेक; हिजाबनंतर आता सिगारेट बनली क्रांतीचे शस्त्र, ‘त्या’ फोटोने उडाली जगभरात खळबळ

Reza Pahlavi: 50 वर्षांच्या वनवसांनंतर इराणच्या क्राउन प्रिन्सचे पुनरागमन; रझा पहलवींमुळे जाणार खामेनेई सरकारच्या राजवटीला तडा
4

Reza Pahlavi: 50 वर्षांच्या वनवसांनंतर इराणच्या क्राउन प्रिन्सचे पुनरागमन; रझा पहलवींमुळे जाणार खामेनेई सरकारच्या राजवटीला तडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.