Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buddharoid: विज्ञानाच्या जगात अध्यात्माचा शिरकाव; जपानने तयार केला ‘यांत्रिक भिक्षू’ जो करणार सर्वच शंकांचे निरसन

Buddharoid Spiritual Robot : जपानच्या क्योटो विद्यापीठाने 'बुडाह्रॉइड' नावाचा एक एआय रोबोट विकसित केला आहे जो बौद्ध ग्रंथांचे अर्थ लावण्यास आणि लोकांना आध्यात्मिक सल्ला देण्यास सक्षम आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 25, 2026 | 04:00 PM
kyoto university develops buddharoid ai spiritual monk robot japan

kyoto university develops buddharoid ai spiritual monk robot japan

Follow Us
Follow Us:
  • टेक्नोलॉजी आणि अध्यात्म
  • कठीण ग्रंथांचे ज्ञान
  • भविष्यातील भिक्षू

Buddharoid robot Kyoto University Japan : तंत्रज्ञानाच्या बाबतीत जपान (Japan) नेहमीच जगाच्या दोन पावले पुढे असतो. पण आता जपानी शास्त्रज्ञांनी विज्ञानाला थेट अध्यात्माशी जोडले आहे. जपानमधील क्योटो विद्यापीठातील संशोधकांनी ‘बुद्धरॉइड’ (Buddharoid) नावाचा एक हायटेक रोबोट तयार केला असून तो चक्क बौद्ध भिक्षूंप्रमाणे लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शन करणार आहे. विज्ञान आणि श्रद्धेचा हा संगम केवळ जपानमध्येच नाही, तर संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरला आहे.

क्योटो विद्यापीठाचा ‘मास्टरस्ट्रोक’

क्योटो विद्यापीठातील ‘एआय मंक रिसर्च युनिट’ (AI Monk Research) अंतर्गत हा रोबोट विकसित करण्यात आला आहे. संशोधनाचे नेतृत्व करणारे प्राध्यापक सेजी कुमागाई यांच्या मते, बुद्धरॉइड केवळ यंत्र नाही, तर तो धार्मिक स्थळांवर आपली उपस्थिती जाणवून देणारा एक ‘यांत्रिक संत’ आहे. हा रोबोट धार्मिक विधींमध्ये सक्रिय सहभाग घेऊ शकतो आणि लोकांशी संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन करू शकतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump 2026: मैत्री की गळ्याचा फास? डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा काढली पाकिस्तानची लायकी; ‘या’ एका विधानाने जागतिक स्तरावर फजिती

गूढ धर्मग्रंथांचे सखोल प्रशिक्षण

बौद्ध धर्मातील अनेक ग्रंथ अत्यंत गूढ आणि समजण्यास कठीण आहेत. बुद्धरॉइडला या कठीण भागांचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. विद्यापीठाच्या दाव्यानुसार, हा रोबोट अशा संवेदनशील प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो जे विचारताना लोक अनेकदा मानवी भिक्षूंसमोर कचरतात. मनात दाटलेली भीती, नैराश्य किंवा आयुष्यातील संकटे यावर हा ‘एआय भिक्षू’ बौद्ध तत्त्वज्ञानाच्या आधारे अचूक उपाय सुचवतो.

चिनी बनावटीचा देह आणि एआयचा मेंदू

बुद्धरॉइडचा बाह्य देह चिनी बनावटीच्या ‘युनिट्री जी१’ (Unitree G1) या ह्युमनॉइड रोबोटवर आधारित आहे. मात्र, त्याचा खरा आत्मा म्हणजे ‘बुद्धबॉटप्लस’ (Buddhabot Plus) नावाचे एआय मॉडेल. हे मॉडेल ओपन एआय (OpenAI) आणि इतर प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आले आहे. एका मीडिया प्रात्यक्षिकादरम्यान, राखाडी रंगाच्या झग्यात आलेल्या या रोबोटने आपल्या हालचालींनी सर्वांना मंत्रमुग्ध केले.

आध्यात्मिक शांतीचा अनुभव

एका विशेष कार्यक्रमात बुद्धरॉइडने पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. जेव्हा एका पत्रकाराने त्याला स्वतःच्या चिंतेबद्दल विचारले, तेव्हा रोबोटने अतिशय संथ आणि खोल आवाजात उत्तर दिले, “घाई करू नका, मन शांत ठेवा. बौद्ध धर्म आपल्याला विचारांच्या मागे धावायला नाही, तर विचारांना शांत करायला शिकवतो.” रोबोटचा हा मानवी आणि प्रेमळ संवाद पाहून तंत्रज्ञान आणि मानवी संवेदनांमधील अंतर कमी होत असल्याचे जाणवले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : UK Election: ब्रिटनच्या निवडणुकीत PM मोदींच्या फोटोवरून राडा; ‘ग्रीन पार्टी’वर गंभीर आरोप; हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचा प्रयत्न?

भविष्यातील डिजिटल मंदिरे

जपानमध्ये सध्या तरुणाईचा कल धर्माकडे कमी होत असून मानवी भिक्षूंची मोठी कमतरता भासत आहे. अशा परिस्थितीत बुद्धरॉइड हे एक क्रांतिकारी पाऊल ठरू शकते. मंदिरामधील रोजची प्रार्थना असो किंवा अंत्यविधींचे विधी, हे रोबोट भविष्यात सर्व काही हाताळू शकतील. क्योटो विद्यापीठाचा हा प्रयोग केवळ जपानपुरता मर्यादित नसून, संपूर्ण जगाला तंत्रज्ञानाद्वारे मनाची शांती कशी मिळवता येईल, याचा मार्ग दाखवणारा आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बुद्धरॉइड रोबोट नक्की काय करतो?

    Ans: हा रोबोट बौद्ध ग्रंथांचा अर्थ सांगतो, लोकांना आध्यात्मिक सल्ला देतो आणि त्यांच्या मानसिक समस्या सोडवण्यासाठी संवाद साधतो.

  • Que: या रोबोटमध्ये कोणते तंत्रज्ञान वापरले आहे?

    Ans: यामध्ये 'बुद्धबॉटप्लस' नावाचे प्रगत एआय मॉडेल वापरले असून, त्याचा देह चिनी बनावटीच्या 'युनिट्री जी१' रोबोटचा आहे.

  • Que: हा रोबोट मानवी भिक्षूंची जागा घेणार का?

    Ans: जपानमध्ये भिक्षूंची कमतरता असल्याने, भविष्यात मंदिरांमधील रोजचे विधी आणि मार्गदर्शनासाठी या रोबोटची मदत घेतली जाऊ शकते.

Web Title: Kyoto university develops buddharoid ai spiritual monk robot japan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • international news
  • Japan
  • Robot

संबंधित बातम्या

AI Chatbot बदलू शकतो तुमचं राजकीय मत? लोकशाहीसाठी धोक्याचा इशारा? नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती
1

AI Chatbot बदलू शकतो तुमचं राजकीय मत? लोकशाहीसाठी धोक्याचा इशारा? नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती

मोठी बातमी ! अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध संपणार? इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेशकियान म्हणाले…
2

मोठी बातमी ! अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध संपणार? इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेशकियान म्हणाले…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला मोठा दावा; म्हणाले, ‘होर्मुझवर आमचं संपूर्ण नियंत्रण…’
3

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला मोठा दावा; म्हणाले, ‘होर्मुझवर आमचं संपूर्ण नियंत्रण…’

US Election Funding: अमेरिकन राजकारणात क्रिप्टो आणि AI कंपन्यांचा धुमाकूळ; निवडणुकीतील देणगीचे झाले सर्व रेकॉर्ड ब्रेक
4

US Election Funding: अमेरिकन राजकारणात क्रिप्टो आणि AI कंपन्यांचा धुमाकूळ; निवडणुकीतील देणगीचे झाले सर्व रेकॉर्ड ब्रेक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.