Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khamenei Assassination Attempt : इराणच्या हुकूमशहावर जीवघेणा हल्ला; 250 मुजाहिदीन थेट घरात घुसले आणि पुढे जे झाले…

Iran News : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांच्या निवासस्थानावर पीपल्स मुजाहिदीन (MEK) ने हल्ला केल्याच्या बातम्या आल्या. अनेक सदस्यांना अटक करण्यात आली, काही मारले गेले, खामेनेई एका बंकरमध्ये सुरक्षित आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 25, 2026 | 02:15 PM
iran supreme leader ayatollah khamenei residence attack mek mujahedin tehran updates

iran supreme leader ayatollah khamenei residence attack mek mujahedin tehran updates

Follow Us
Close
Follow Us:
  • ऐतिहासिक हल्ला
  • खामेनी बंकरमध्ये
  • बंडखोरांचा दावा

Ayatollah Khamenei house attack news 2026 : इराणच्या (Iran) सत्तेचे केंद्र असलेले तेहरान सोमवारी रात्री रक्ताळलेल्या थराराने हादरून गेले. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी ( Ayatollah Khamenei) यांच्या अधिकृत निवासस्थानावर ‘पीपल्स मुजाहिदीन’ (MEK) या संघटनेच्या सुमारे २५० सशस्त्र सदस्यांनी भीषण हल्ला केला. १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर प्रथमच देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीच्या निवासस्थानात अशा प्रकारे घुसखोरी झाल्याने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. हा हल्ला इतका नियोजित होता की, खामेनी यांना वाचवण्यासाठी सुरक्षा रक्षकांना मोठी कसरत करावी लागली.

निवासस्थानात घुसून गोळीबार: नेमका काय घडला थरार?

मिळालेल्या माहितीनुसार, आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या २५० मुजाहिदीन बंडखोरांनी मध्य तेहरानमधील खामेनी यांच्या ‘बेत-ए-राहबारी’ या कार्यालयावर आणि निवासस्थानावर सर्व बाजूंनी हल्ला चढवला. बीबीसी पर्शियनच्या रिपोर्टनुसार, सुरक्षा रक्षकांशी झालेल्या चकमकीत अनेक सैनिक मारले गेल्याची भीती व्यक्त होत आहे. हल्लेखोर खामेनींच्या शयनकक्षाच्या अगदी जवळ पोहोचले होते, परंतु शेवटच्या क्षणी त्यांना थोपवण्यात यश आले. या हल्ल्यानंतर संपूर्ण तेहरानमध्ये लष्करी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump 2026: मैत्री की गळ्याचा फास? डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा काढली पाकिस्तानची लायकी; ‘या’ एका विधानाने जागतिक स्तरावर फजिती

खामेनी सुरक्षित पण दहशतीखाली!

हल्ला सुरू होताच सुरक्षा दलांनी अयातुल्ला अली खामेनी यांना तातडीने एका गुप्त भूमिगत बंकरमध्ये हलवले. सध्या ते तिथेच असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या संकटकाळी खामेनी यांचा मुलगा, मोज्तबा खामेनी याने निवासस्थान आणि कार्यालयाची संपूर्ण सुरक्षा जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. इराणच्या मेहर न्यूज एजन्सीने आतापर्यंत ४ हल्लेखोरांना अटक केल्याची पुष्टी केली आहे, तर उर्वरित हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी ड्रोन आणि हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे.

कोण आहे ‘पीपल्स मुजाहिदीन’ (MEK) संघटना?

ज्या संघटनेने हा हल्ला केला, तिचा इतिहास अतिशय जुना आहे. १९६५ मध्ये शाह पहलवी यांच्या राजवटीविरुद्ध लढण्यासाठी या संघटनेची स्थापना झाली होती. सुरुवातीला खामेनींसोबत असलेल्या या संघटनेचे नंतर कट्टर मतभेद झाले आणि इराणमध्ये त्यांच्यावर बंदी घालण्यात आली. याच संघटनेने २००२ मध्ये इराणच्या गुप्त अणुकार्यक्रमाचा पर्दाफाश केला होता. मरियम रझावी यांच्या नेतृत्वाखालील ही संघटना इराणमध्ये धर्मनिरपेक्ष लोकशाही आणण्यासाठी धडपडत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nuclear Threat: आता ‘पाकिस्तान’ इस्रायलच्या निशाण्यावर; ‘इस्लामिक अणुबॉम्ब’ नष्ट करण्यासाठी ज्यू राष्ट्राचा महाभयंकर प्लॅन

इराणमध्ये यादवी युद्धाचे सावट?

संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा आयोगाचे सदस्य अहमद बख्शायेश अर्देस्तानी यांनी या घटनेवर थेट भाष्य करणे टाळले असले तरी, इस्लामिक रिपब्लिकला कमकुवत करण्याचे हे मोठे कारस्थान असल्याचे त्यांनी मान्य केले. गेल्या काही काळापासून इराणमध्ये अंतर्गत विरोध तीव्र झाला आहे. हिजाब आंदोलन आणि ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळे जनता संतापलेली असतानाच आता थेट सर्वोच्च नेत्यावर हल्ला झाल्याने इराणमध्ये यादवी युद्ध (Civil War) सुरू होण्याची शक्यता संरक्षण तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अयातुल्ला खामेनी यांच्यावर कोणी हल्ला केला?

    Ans: हा हल्ला 'पीपल्स मुजाहिदीन' (MEK) नावाच्या प्रतिबंधित बंडखोर संघटनेने केला आहे, ज्यांना इराणमध्ये धर्मनिरपेक्ष सत्ता हवी आहे.

  • Que: खामेनी सध्या कुठे आणि कोणत्या परिस्थितीत आहेत?

    Ans: खामेनी सध्या त्यांच्या निवासस्थानाखालील एका अतिसुरक्षित भूमिगत बंकरमध्ये असून ते सुरक्षित आहेत. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांचा मुलगा मोज्तबा पाहत आहे.

  • Que: या हल्ल्याचा इराणवर काय परिणाम होईल?

    Ans: या हल्ल्यामुळे इराणमधील अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून, देशात मोठी लष्करी कारवाई किंवा यादवी युद्ध सुरू होण्याची दाट शक्यता आहे.

Web Title: Iran supreme leader ayatollah khamenei residence attack mek mujahedin tehran updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • Attack
  • international news
  • iran

संबंधित बातम्या

Trump 2026: मैत्री की गळ्याचा फास? डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा काढली पाकिस्तानची लायकी; ‘या’ एका विधानाने जागतिक स्तरावर फजिती
1

Trump 2026: मैत्री की गळ्याचा फास? डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा काढली पाकिस्तानची लायकी; ‘या’ एका विधानाने जागतिक स्तरावर फजिती

UK Election: ब्रिटनच्या निवडणुकीत PM मोदींच्या फोटोवरून राडा; ‘ग्रीन पार्टी’वर गंभीर आरोप; हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचा प्रयत्न?
2

UK Election: ब्रिटनच्या निवडणुकीत PM मोदींच्या फोटोवरून राडा; ‘ग्रीन पार्टी’वर गंभीर आरोप; हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचा प्रयत्न?

India-US Trade: व्यापार करार की केवळ कागदी घोडे? भारत-अमेरिका महत्त्वाची बैठक रद्द; ट्रम्पच्या ‘अशा’ विधानाने उडाला गोंधळ
3

India-US Trade: व्यापार करार की केवळ कागदी घोडे? भारत-अमेरिका महत्त्वाची बैठक रद्द; ट्रम्पच्या ‘अशा’ विधानाने उडाला गोंधळ

Turkey F-16 Crash: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! उड्डाणानंतर काही मिनिटांतच तुर्कीचे F-16 फायटर जेट कोसळले; पहा भयानक VIDEO
4

Turkey F-16 Crash: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! उड्डाणानंतर काही मिनिटांतच तुर्कीचे F-16 फायटर जेट कोसळले; पहा भयानक VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.