Year Ender 2024: 'इस्त्रायल-हमास संघर्षापासून ते...'; जागतिक स्तरावरील 'अशा' घटना ज्या दिर्घकाळ लक्षात राहतील
आता नवीन वर्ष सुरु होण्यास अवघे 2 दिवसंच राहिले आहेत. 2024 हे वर्ष जागतिक स्तरावर अनेक ऐतिहासिक आणि राजकीय घटनांनी व्यापलेले राहिले. तुम्हाला या घटना माहित आहेत का? या घटनांनी जागतिक राजकारणावर दीर्घकालीन परिणाम केले आहेत. इझ्राएल-हमास संघर्षापासून, रशिया-युक्रेन युद्ध, बांगलादेशात शेख हसीनांचे पतन आणि भारत-अमेरिकेतील राजकीय बदल, सीरियातील सत्तापालटापर्यंत अशा अनेक घटना वर्षभर चर्चेचा विषय बनल्या आहेत.
आज आपण या घटनांबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. या घटना आपल्याला दिर्घकाळ लक्षात राहतील
इस्त्रायल-हमास संघर्ष: 2023 मध्ये सुरू झालेला इझ्राएल-गाझा संघर्ष 2024 पर्यंत सुरूच राहिले. या संघर्षात 45,000 हून अधिक पॅलेस्टिनी मरण पावले. यामध्ये महिलांचा आणि मुलांचा समावेश होता. गाझातील संपूर्ण पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या. तर, युद्ध संपवण्यासाठी अनेक प्रयत्न निष्फळ ठरले. हे युद्ध आता 2025 मध्ये काय वळण घेतील असा प्रश्न निर्माण झाला आहे.
रशिया-युक्रेन युद्ध: फेब्रुवारी 2022 मध्ये सुरू झालेल्या या युद्धाने दोन वर्षे पूर्ण केली. यामध्ये लाखो सैनिक मरण पावले असून युद्ध संपवण्यासाठी डॉनल्ड ट्रम्प यांच्या पुढाकारावर सर्वांचे लक्ष आहे. रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी या चर्चेसाठी सकारात्मक संकेत दिले आहेत.
इस्त्रायल-इराण संघर्ष: गाझा युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्त्रायल आणि इराणमध्येही संघर्ष वाढला. इराणने हमासला पाठिंबा दिला, तर इस्त्रायलने हमास आणि हिजबुल्लाहवर जोरदार हल्ले केले. या संघर्षाने मध्य-पूर्वेत तणाव वाढवला.
भारत-कॅनडा तणाव: हरदीप सिंह निज्जर यांच्या हत्येनंतर भारत-कॅनडा संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला. दोन्ही देशांनी एकमेकांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना हद्दपार केले. भारतीय समुदायाच्या भविष्यासाठी या तणावाचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
शेख हसीनांचे पतन: ऑगस्ट 2024 मध्ये बांगलादेशात शेख हसीनांची सत्ता उलथवण्यात आली. अर्थतज्ज्ञ युनूस मोहम्मद यांनी अंतरिम सरकार स्थापन केले, परंतु अल्पसंख्याकांवरील अत्याचार वाढल्याने भारत-बांगलादेश संबंध बिघडले. तसेच आता हिंदूंनंतर ख्रिश्चनांना लक्ष्य केले जात आहे.
नरेंद्र मोदींचा विजय: 2024 च्या लोकसभा निवडणुकीत NDA 292 जागांवर विजय मिळवत तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले. नरेंद्र मोदी यांच्या विजयाने जागतिक राजकारणावरही परिणाम केला.
डॉनल्ड ट्रम्प पुन्हा अध्यक्ष: अमेरिकेच्या निवडणुकीत डॉनल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला. त्यांच्या अध्यक्षतेखाली रशिया-युक्रेन युद्ध किंवा गाझा संघर्षाच्या स्थितीत बदल अपेक्षित आहे.
सीरियात असद यांचे पतन: 2024 च्या अखेरच्या महिन्यात सीरियाच्या विद्रोही गटाने दमास्कसवर ताबा मिळवून बशर अल-असद यांना पदउतार केले आणि सीरियाचे नेतृत्व हयात-तहरीर-अल-शाम (HTS) या बंडखोर गटांच्या ताव्यात आली.
पाकिस्तानची अस्थिरता: इम्रान खान यांच्या समर्थकांच्या आंदोलनांमुळे पाकिस्तानमध्ये अस्थिरता वाढली. याचा परिणाम 2025 मध्ये दिसण्याची शक्यता आहे. तसेच पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे संबंध बिघडले.