फोटो सौजन्य: सोशल मीडिया
2024 वर्ष संपायला आता काही आठवडेच बाकी आहेत. या वर्षात जगभरात अनेक बदल घडून आले. विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, तसेच अनेक राजकीय आणि सामाजिक बदल देखील घडून आले. काही संकटे आली पण अनेकांनी या संकटांवर विजय मिळवला. हवामानत देखील बरेच बदल घडून आले. कुठे उन्हाळ्यात थंडी-पाऊस पाहायला मिळला तर कुठे पावसाळ्यात उन्हाळा पाहायला मिळाला.
विविध क्षेत्रात अनेक नवनवीन शोध लागले. या 2024 च्या वर्षात सोशल मीडियाच्या जगात देखील अनेक बदल घडून आले आहेत.अनेक ट्रेंड्स झपाट्याने बदलले आहेत. या वर्षात सोशल मीडियाद्वारे अनेक वेगवेगळ्या तसेच अनोख्या गोष्टींचा अनुभव लोकांनी घेतला आहे.
1.शॉर्ट व्हिडिओजचा ट्रेंड– TikTok, Instagram Reels आणि YouTube Shorts सारख्या प्लॅटफॉर्म्सवरील व्हिडिओंची लोकप्रियता वाढली आहे. लोक अलीकडे 15 ते 60 सेकंदांच्या व्हिडिओ अधिक पाहत आहेत. यामुळे अनेकांनी यासांरखे व्हिडिओ बनवण्यामध्ये गुंतवणूक केली आहे. यामुळे ब्रँड्ससाठी हे एक प्रभावी माध्यम बनले आहे.
2.सोशल कॉमर्सचा उदय: सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट विक्री करण्याचे आणि खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे.लोकांनी थेट Instagram आणि Facebook सारख्या प्लॅटफॉर्म्सवरून शॉपिंग केली आहे. यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात छोट्या छोट्या ब्रॅंड्स नवीन विक्री चॅनेल्स उघडले आहेत.
3.कृत्रिम (AI) बुद्धिमत्तेचा वापर: अलीकडे वेगवेगळे ब्रँड्स आर्टिफिशिअल इंटेलिजंन्सच्या मदतीने फोटो, व्हिडिओ आणि टेक्स्ट तयार करण्याचा ट्रेंड वाढला. AI टूल्सचा वापर कंटेंट क्रिएटर्सने मोठ्या प्रमाणात केला आहे. यामुळे मार्केटिंग क्षेत्रात कार्यक्षमता वाढली आहे.
4.लाईव्ह स्ट्रीमिंगची: लोकांनी विविध विषयांवर लाईव्ह स्ट्रीमिंग केले आहे. जसे की गेमिंग, शिक्षण, फिटनेस आणि कुकिंग. लाईव्ह संवादामुळे फॉलोअर्ससोबत जवळीक निर्माण झाली.
5. सोशल मीडिया SEO- विविध ब्रँड्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून शोध परिणाम सुधारण्यासाठी SEO रणनीतींचा वापर करत आहेत. म्हणजे लोक एखादी गोष्ट सर्च करण्यासाठी काय करतात, त्याचा वापर करुन आपला कंटेंट लोकांपर्यंक कसा पोहोचवायचा यावर रस्वात जास्त भर देण्यात आला आहे.
6. सोशल मीडिया ग्राहक सेवा: लोकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून थेट ब्रँड्सशी संपर्क साधला आहे. तसेच ब्रँड्सने देखील ग्राहकांना त्वरित प्रतिसाद देऊन ग्राहक सेवा सुधारल्या आहेत.
7. नॅरो-टार्गेटेड सोशल मीडिया जाहिराती: अनेक ब्रँड्न्सने अधिक विशिष्ट प्रेक्षकांसाठी जाहिराती तयार करून लोकांची गुंणतवणूक परतावा(ROI) वाढवला आहे.
8.सोशल मीडिया सर्च इंजिन्सचा उदय: लोकांनी माहिती शोधण्यासाठी अधिकाधिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा वापर केला आहे.
9. डिजिटल अवतार आणि व्हर्च्युअल आयडेंटिटी: लोकांनी AI टूलचा वापर करुन डिजिटल अवतार क्रिएट केले आहेत. हे अवतार गेमिंगपासून मेटाव्हर्सपर्यंत पोहोचले आहेत. तसेच अनेकांनी याद्वारे सोशल मीडिया इनफ्लुएंसर बनवल्या आहेत.
10. सामाजिक आणि पर्यावरणीय मुद्द्यांवर चर्चा: लोकांनी सोशल मीडियाचा उपयोग करुन सामाजिक आणि पर्यावरणीय मुद्दे मांडले आहेत. जनजागृतीसाठी सोशल मीडिया प्रभावी माध्यम ठरले आहे.