Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maruti Dzire 2024 च्या ‘या’ टॉप व्हेरियंटला घरी आणण्यासाठी 2 लाख पुरेसे, पण EMI किती?

कॉम्पॅक्ट सेडान कार सेगमेंटमध्ये मारुती डिझायरच्या नवीन व्हेरियंटला नुकतेच लाँच केले आहे. चला जाणून घेऊया जर ही कार 2 लाख रुपये देऊन खरेदी केली तर किती ईएमआय आपल्याला द्यावा लागेल.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 17, 2024 | 01:31 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

आपल्या स्वतःच्या कारमध्ये आपण आणि आपल्या कुटुंबाने कुठे तरी लांब फिरायला जावं, हे प्रत्येक मध्यम वर्गीय व्यक्तीचे स्वप्न असते. यामुळेच कित्येक जण सणासुदीच्या काळात आपली हक्काची नवीन कार विकत घेत असतात. गेल्या काही वर्षांपासून भारतात कार्सची विक्री झपाट्याने वाढत आहे. यामागे अनेक कारणं आहेत त्यातीलच एक म्हणजे ईएमआय.

हल्ली ईएमआयमुळे अनेक जणांना कार घेणं शक्य झालं आहे. नुकतेच देशातील आघाडीच्या कार उत्पादक कंपनीने म्हणजेच मारुती सुझुकीने आपल्या लोकप्रिय डिझायरचे अपडेटेड व्हर्जन 11 नोव्हेंबरला मार्केटमध्ये लाँच केले आहे.

कॉम्पॅक्ट सेडान कार सेगमेंटमध्ये नवीन जनरेशनची डिझायर ऑफर करण्यात आली आहे. जर तुम्ही या SUV चा टॉप व्हेरियंट ZXI+ घरी आणण्याचा विचार करत असाल, तर 2 लाख रुपयांचे डाऊन पेमेंट केल्यानंतर, दरमहा किती रुपयांचा EMI तुम्हाला भरावा लागेल त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया. पण त्याआधी या कारची किंमत जाणून घेऊया.

Maruti Dzire 2024 ZXI+ Price

ZXI+ हे मारुतीने Dzire 2024 चे टॉप व्हेरियंट म्हणून ऑफर केले आहे. कंपनी या सेडान कारच्या टॉप व्हेरियंटचे मॅन्युअल व्हर्जन 9.69 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे.

जर ही कार राजधानी दिल्लीत खरेदी केली तर 9.69 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीसह, तुम्हाला त्यावर रजिस्ट्रेशन टॅक्स आणि आरटीओ देखील भरावा लागेल. ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला आरटीओसाठी 67830 रुपये आणि इंश्युरन्ससाठी 48416 रुपये द्यावे लागतील. यानंतर या कारची ऑन रोड किंमत 1085246 रुपये होईल.

Skoda-Volkswagen ने ‘या’ मॉडेल्सच्या 52 कार्स बोलावल्या परत, जाणून घ्या कारण?

2 लाखाचे डाउन पेमेंट केल्यानंतर किती असेल ईएमआय?

तुम्ही Maruti Dzire 2024 चा टॉप व्हेरियंट ZXI+ खरेदी केल्यास, बँकेकडून फक्त एक्स-शोरूम किंमतीवर फायनान्स पुरवला जाईल. अशा परिस्थितीत, 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला सुमारे 885246 रुपयांची रक्कम बँकेकडून फायनान्स करावी लागेल. बँकेने तुम्हाला सात वर्षांसाठी नऊ टक्के व्याजासह 885246 रुपये दिले, तर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी दरमहा केवळ 14243 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.

ईएमआय घेतल्यास किती रुपयांनी महाग होईल कार

जर तुम्ही बँकेकडून नऊ टक्के व्याजदराने सात वर्षांसाठी 885246 रुपयांचे कार लोन घेतले तर तुम्हाला सात वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 14243 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. अशा परिस्थितीत, सात वर्षांमध्ये तुम्हाला मारुती डिझायर 2024 च्या ZXI+ व्हेरियंटसाठी सुमारे 3.11 लाख रुपये व्याज द्यावा लागेल. त्यानंतर तुमच्या कारची एक्स-शोरूम, ऑन-रोड आणि व्याजासह एकूण किंमत सुमारे 13.96 लाख रुपये असेल.

मारुती डिझायरची कोणासोबत आहे स्पर्धा?

मारुतीने कॉम्पॅक्ट सेडान कार सेगमेंटमध्ये नवीन जनरेशन डिझायर आणली आहे. या सेगमेंटमध्ये, त्याची थेट स्पर्धा Hyundai Aura, Honda Amaze, Tata Tigor यांसारख्या कॉम्पॅक्ट सेडान कारशी आहे. याशिवाय काही प्रीमियम हॅचबॅक कार्सकडून किंमतीच्या बाबतीतही आव्हान असणार आहे.

Web Title: 2 lakh is enough to buy the top variant of maruti dzire 2024 but how much will be emi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2024 | 01:31 PM

Topics:  

  • Maruti suzuki Dzire

संबंधित बातम्या

30 ते 40 हजार पगार असणाऱ्या व्यक्तीच्या बजेटमध्ये Maruti Dzire फिट होईल का?
1

30 ते 40 हजार पगार असणाऱ्या व्यक्तीच्या बजेटमध्ये Maruti Dzire फिट होईल का?

Maruti Suzuki च्या ‘या’ कारने मार्केटमध्ये तोडले विक्रीचे सर्वच रेकॉर्ड्स, 1 महिन्यात विकले ‘इतके’ युनिट्स
2

Maruti Suzuki च्या ‘या’ कारने मार्केटमध्ये तोडले विक्रीचे सर्वच रेकॉर्ड्स, 1 महिन्यात विकले ‘इतके’ युनिट्स

काय कार आहे बॉस ! सनरूफ, 6 एअरबॅग, आणि 5 – स्टार सेफ्टी, किंमत 10 लाखांपेक्षा कमी
3

काय कार आहे बॉस ! सनरूफ, 6 एअरबॅग, आणि 5 – स्टार सेफ्टी, किंमत 10 लाखांपेक्षा कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.