फोटो सौजन्य: Social Media
सध्या देशभरात अनेक कार्स लाँच होताना दिसत आहे. यात लक्झरी पासून बजेट फ्रेंडली कार्सचा देखील समावेश आहे. भारतीय ग्राहक सुद्धा नवीन येणाऱ्या कार्सना भरघोस प्रतिसाद देताना दिसत आहे. तसे आपल्याकडे अनेक कार्स या उत्तम परफॉर्मन्ससाठी ओळखल्या जातात. परंतु एक उत्तम कंपनी फक्त नवीन कार्समुळे नव्हे तर उत्तम निर्णयांमुळे सुद्धा ओळखल्या जातात. असाच एक उत्तम निर्णय स्कोडा-फोक्सवॅगन कंपनीने घेतला आहे.
इलेक्ट्रिक कार मालकांनो, हिवाळ्यात कार चालवताना फॉलो करा ‘या’ 5 टिप्स
स्कोडा-फोक्सवॅगनच्या कार्स उत्तम परफॉर्मन्ससाठी ओळखल्या जातात. पण नुकताच एक रिपोर्ट प्रदर्शित करण्यात आला आहे. या रिपोर्टनुसार, स्कोडा-फोक्सवॅगनने आपल्या चार कार्सबद्दल रीकॉल जारी केला आहे. स्कोडा कुशाक आणि स्लाव्हिया आणि फोक्सवॅगन तैगुन आणि व्हरटस हे परत मागवलेले मॉडेल आहेत. परत मागवलेल्या कार्सची संख्या 52 आहे. या कार्स 29 नोव्हेंबर 2023 ते 20 जानेवारी 2024 दरम्यान तयार करण्यात आल्या होत्या. पण या कार्स नेमक्या का परत मागवण्यात आल्या आहेत याबद्दल जाणून घेऊया.
सियामच्या अहवालानुसार या चार मॉडेल्समध्ये वेल्डिंगची समस्या दिसली आहे. यामुळे, कारच्या ट्रॅक कंट्रोल आर्म्समध्ये समस्या दिसू शकतात. त्याच्या बिघाडामुळे लोकांना कार चालवताना समस्यांना सामोरे जावे लागू शकते. चालकांचे कारवरील नियंत्रण अचानक सुटू शकते. त्यामुळे तो अपघाताचा बळी ठरू शकतो. SIAM ने प्रदान केलेली रिकॉल माहिती भारत सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाच्या निर्देशानुसार आहे. हे सामान्य लोक आणि इतर भागधारकांसाठी एक चांगला निणर्य आहे.
बाईकचे इंजिन ऑइल किती दिवसानंतर बदलावे माहीत आहे का?
कुशाक, स्लाव्हिया, तैगुन आणि व्हरटस ही चारही मॉडेल्स पुण्यातील चाकण येथे उत्पादित केली जातात. स्कोडाच्या बाबतीत, कुशाक आणि स्लाव्हियाच्या 14 कार्सना वेल्डिंगच्या समस्येसाठी मार्क करण्यात आला आहे. फोक्सवॅगनच्या बाबतीत, तैगुन आणि व्हरटसचे 38 मॉडेल्स परत मागवण्यासाठी मार्क केले गेले आहेत, या आकड्यानुसार, एकूण 52 मॉडेल्स आहेत जे कंपनीने परत बोलावले आहे. कार परत मागवण्याची समस्या कमी आहे, त्यामुळे या वाहनांच्या मालकांशी वैयक्तिकरित्या संपर्क साधला जाईल.
बऱ्याच रीकॉल केसेसमध्ये, कारच्या पार्ट्सची दुरुस्ती किंवा बदली विनामूल्य केली जाते. हे दुरुस्त करण्यासाठी किती वेळ लागेल याची संपूर्ण माहिती कंपनीच्या डोमेनवर जाहीर केलेली नाही. कारमधील वेल्डिंगच्या समस्येमुळे अपघात होऊ शकतो. ग्लोबल NCAP द्वारे रेट केलेल्या भारतातील ही सर्वात सुरक्षित कार आहे.
या चार मॉडेलपैकी कुशाक नुकतेच भारतीय रस्त्यांवर टेस्टिंग करताना दिसले आहे. ही कार 2021 मध्ये लाँच करण्यात आले होते.
आता कंपनी त्याचे फेसलिफ्ट आणण्याच्या तयारीत आहे. काही कॉस्मेटिक टच-अप आणि नवीन फीचर्स जसे की ADAS आणि 360° कॅमेरा यामध्ये दिसू शकतात.