
फोटो सौजन्य: Pinterest
आजही एखाद्या व्यक्तीला जेव्हा 7 सीटर कार खरेदी करायची असते तेव्हा तो सर्वात पहिले Ertiga कारचा विचार करतो. गेली अनेक वर्ष ही कार भारतीयांची एक फॅमिली मेम्बर बनली आहे.
गेल्या काही वर्षांत भारतीय ग्राहकांमध्ये 7-सीटर कारची मागणी सातत्याने वाढत आहे. या सेगमेंटमधील विक्रीचा विचार केला तर, मारुती सुझुकी एर्टिगाने आपले वर्चस्व नेहमीप्रमाणे कायम ठेवले आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की गेल्या महिन्यात, नोव्हेंबर 2025 मध्ये, Ertiga ही देशातील 7-सीटर विक्री होणारी नंबर वन कार ठरली होती. मागील महिन्यात 16000 हून अधिक लोकांनी मारुती एर्टिगा खरेदी केली. चला, मारुती सुझुकी एर्टिगाच्या लोकप्रियतेची पाच प्रमुख कारणे काय आहेत? त्याबद्दल जाणून घेऊयात.
Renault साठी ‘ही’ कार ठरली भाग्यवान! झटपट बनली लोकप्रिय, विक्रीत 56 टक्के वाटा
मारुती एर्टिगा ही भारतातील अशा काही मोजक्या कारपैकी एक आहे जी परवडणाऱ्या किमतीत 7-सीटर पर्यायासह येते. मोठे कुटुंब असो, नातेवाईकांसोबतची सहल असो किंवा मुलांसोबतची सहल असो, ही कार प्रत्येक गरजेची पूर्तता करते.
एर्टिगाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे याचे उत्कृष्ट मायलेज. पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही पर्यायांची उपलब्धता असल्याने या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. सीएनजमध्ये ही कार सुमारे 25 किमी/ताशी मायलेज देते. तर कमी सर्व्हिस कॉस्ट आणि मारुतीची विश्वासार्ह मेंटेनन्स यामुळे ती दीर्घकालीन वापरासाठी परवडणारी बनते.
मारुती सुझुकीचे देशव्यापी सेवा नेटवर्क एर्टिगाची विक्री मजबूत करते. लहान शहरे आणि गावांमध्येही सर्व्हिस आणि स्पेअर पार्टसची सहज उपलब्धता ग्राहकांसाठी एक प्रमुख घटक आहे.
‘या’ 5 फीचर्समुळे Maruti e Vitara इतर इलेक्ट्रिक कारचा बाजार उठणार
एर्टिगा आरामदायी सस्पेंशन, चांगली केबिन स्पेस आणि अन्य फीचर्सदेते. टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, मागील एसी व्हेंट्स, फोल्डेबल सीट्स आणि भरपूर बूट स्पेस ही कुटुंब-केंद्रित एमपीव्ही बनवते.
मारुतीची एर्टिगाची किंमत याच्या सेगमेंटमध्ये खूपच स्पर्धात्मक आहे, ज्यामुळे ती बजेट फ्रेंडली कार शोधणाऱ्या कार खरेदीदारांसाठी एक उत्कृष्ट रिसेल व्हॅल्यू पर्याय बनते. भारतात, एर्टिगाची एक्स-शोरूम किंमत 8.80 लाख रुपयांपासून सुरू होते.