फोटो सौजन्य: YouTube
Discount Offer September 2024: भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात टाटा मोटर्सचा एक वेगळाच दबदबा राहिला आहे. आजही कित्येक नवीन ग्राहक आपली पाहिली कार घ्यायची असल्यास टाटा मोटर्सला पाहिले प्राधान्य देत असतात. कंपनीला आपल्या ग्राहकांच्या अपेक्षा ठाऊक असल्याने कंपनीच्या कार्स नेहमीच मार्केटमध्ये लोकप्रिय होत असतात.
सध्या कंपनी इलेक्ट्रिक कार्स निर्मितीवर जास्त लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. तसेच येणारा सणासुदीचा काळ लक्षात घेत कंपनीने आपल्या काही प्रीमियम कार्सवर विशेष ऑफर्स काही केल्या आहेत. चला या कार्स आणि त्यांच्यावरील ऑफरबद्दल जाणून घेऊया.
टाटाच्या 3-रो एसयूव्ही सफारीवर 50 हजार रुपयांपासून ते 1.4 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. टाटाने 20 लाख एसयूव्हीच्या विक्रीवर ही ऑफर आणली आहे. MY23 मॉडेलवर 25 हजार रुपयांची अतिरिक्त सूटही दिली जात आहे. तुम्हाला या कारच्या मिड-स्पेक व्हेरियंटमध्ये सर्वाधिक फायदे मिळू शकतात. या कारची एक्स-शोरूम किंमत 15.49 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 27.34 लाख रुपयांपर्यंत जाते.
हे देखील वाचा: Traffic Rules: फक्त फोटो क्लिक करून कसा बसतो फाइन? यातून सुटण्याचा मार्ग कोणता?
Tata Harrier ही 5 सीटर SUV आहे. या कारवर कंपनीकडून 1.20 लाख रुपयांची सूट दिली जात आहे. त्याच वेळी, त्याच्या MY23 मॉडेलवर 25 हजार रुपयांची जास्त सूट दिली जात आहे. सर्वात जास्त सूट त्याच्या मिड-स्पेक व्हेरियंटवर उपलब्ध आहे. लोअर-स्पेक व्हेरियंटवर 70 हजार रुपये आणि टॉप-एंड व्हेरिएंटवर 50 हजार रुपयांची डिस्काउंट ऑफर आहे. टाटा हॅरियरची एक्स-शोरूम किंमत 14.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 26.44 लाख रुपयांपर्यंत जाते.
टाटा नेक्सॉनवर कंपनीकडून 16 हजार रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंतच्या डिस्काउंट ऑफर दिल्या जात आहेत. त्याच्या MY23 मॉडेलवर अतिरिक्त कॅश डिस्काउंट दिली जात आहे. Tata Nexon ची एक्स-शोरूम किंमत 8 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 15.8 लाख रुपयांपर्यंत जाते.
तुम्ही सप्टेंबरमध्ये टाटा टिगोरचे MY23 मॉडेल खरेदी करून 90 हजार रुपयांपर्यंत बचत करू शकतात. या कारच्या लेटेस्ट मॉडेलवर 60 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 5.65 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 8.90 लाख रुपयांपर्यंत जाते.