फोटो सौजन्य: Social Media
आपल्याकडे दिवसाला किती तरी लोकं वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसवतात. आणि मग कधीतरी ते ट्रॅफिक पोलिसांच्या तावडीत सापडतात. अशावेळी मग त्यांना चांगलाच दंड बसवला जातो. आपल्याकडे आजही अनेक जण फक्त दंड भरावा लागू नाय म्हणून हेल्मेट किंवा सीट बेल्ट्सचा वापर करत असतात.
कोणतेही वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे. आजच्या काळात यासाठी वाहतूक पोलिसांनी व्यक्तीला थांबवण्याची गरज नाही. फक्त फोटो क्लिक केल्यावर दुचाकी किंवा कारमध्ये बसलेल्या व्यक्तीला चालान जारी केले जाते. आता तर ट्राफिक पोलीस फक्त एका फोटोवर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत असतात. यामुळेच अनेक जण आपल्या बाइक्स किंवा कारचे नंबर प्लेट झाकायचा प्रयत्न करतात.
आजच्या काळात वाहतूक पोलिस त्यांच्या मोबाइलवरून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या व्यक्तीच्या वाहनाचा फोटो क्लिक करताना दिसतात. हा फोटो क्लिक झाल्या झाल्या, त्या व्यक्तीच्या मोबाइल क्रमांकावर तुम्हाला फाइन लागला आहे याचा संदेश पाठवला जातो. संदेशाच्या अधिसूचनेसह, व्यक्तीला चालान कापल्याची माहिती मिळते.
नवीन तंत्रज्ञान आणि सुविधांचा वापर करून, NHAI ने अनेक राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे वापरले आहेत. कोणत्याही व्यक्तीने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास ती घटना कॅमेऱ्यात कैद होऊन आपोआप चालान जारी केले जाते.
नुकतेच याचे एक उदाहरण समोर आले आहे, ज्यामध्ये भारत सरकारमधील केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या वाहनाचे चालान जारी करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. चिराग पासवान आपल्या कारने हाजीपूरहून चंपारणला जात असताना परिवहन विभागाने चिराग पासवान यांच्या गाडीला ओव्हर स्पीडिंग केल्यामुळे चालान बजावल होते.
तुमच्या कार किंवा बाईकला फाइनला बसण्यापासून वाचवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करणे. बाईक असो कि स्कूटर नेहमी ते चालवताना हेल्मेट घालावे. तसेच कार चालक आणि त्याच्यासोबत बसलेल्या व्यक्तीने सीट बेल्ट घालणे आवश्यक आहे.
रस्त्याच्या कडेला पोस्ट केलेल्या सर्व वाहतूक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे. वाहतूक नियमांचे पालन केल्यास फाइन बसण्याचा धोका नाही.