
TATA Moters
टेस्टिंग वेळी दिसलेल्या Tataच्या Tiago EVच्या मॉडलमध्ये बाहेरील डिझाइनमध्ये बरेच बदल होण्याची शक्यता आहे.
नवीन LED लाईट्स – कारच्या पुढच्या भागात नवीन LED लाईट्स आणि स्टायलिश DRLs(डेटाइम रनिंग लाईट्स) यांच्यात बदल होऊ शकतो. सर्वात खास गोष्ट म्हणजे नवीन Tiago EV मध्ये कंपनीने बसवलेले इलेक्ट्रिक सनरूफ असणार आहे. ज्यामुळे लक्झरी फिलींग येईल. ३६०-डिग्री कॅमेरा ही या कारमध्ये असणार आहे. कारचे साइड मिरर पूर्वीपेक्षा मोठे असू शकतात, याचा अर्थ ज्याच्यामुळे सगळीकडे लक्ष ठेवणारे देखरेखीसाठी ३६०-डिग्री कॅमेरा देखील मिळू शकतात. यासोबतच, कारमध्ये नवीन डिझाइन अलॉय व्हील्स देखील दिले जाऊ शकतात.
कारचे इंटीरियर आता पूर्वीपेक्षा अधिक आलिशान असू शकते. कारमध्ये मोठी टचस्क्रीन आणि पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरची सोय असणार आहे. इतर टाटा कारप्रमाणे, नवीन टियागो ईव्ही मॉडेलमध्ये नवीन टू-स्पोक स्टीअरिंग व्हील देखील असणार आहे. त्यासोबतच नवीन Tiago EVमध्ये वायरलेस चार्जिंग आणि सुधारित कनेक्टेड कार टेक्नोलॉजी यासारख्या वैशिष्ट्यांचा देखील समावेश असणार आहे.
सध्या, Tiago EV दोन बॅटरी पर्यायांसह येते. 19.2 किलोवॅट प्रति तास आणि 24 किलोवॅट प्रति तास अशा दोन बॅटरीपर्याय आहेत. जे अंदाजे 170 ते 200 किलोमीटरची रियल वर्ल्ड रेंज देतात. येणाऱ्या नवीन Tiago EV मध्ये मोठी बॅटरी असण्याची अपेक्षा आहे. नवीन Tiagoमध्ये 30 किलोवॅट प्रति तास बॅटरी असू शकते, जी नुकत्याच लाँच झालेल्या पंच EVमध्ये दिसली होती. ही नवीन बॅटरी कारची रियल-वर्ल्ड रेंज 265 किलोमीटर जास्त वाढवू शकते.
TATA Moterया वर्षाच्या अखेरीस, म्हणजेच २०२६ पर्यंत नवीन TATA Motors लाँच करण्याची अपेक्षा आहे. टाटा या वर्षी सिएरा ईव्ही आणि टाटा अविन्या ही आणखी दोन इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.