फोटो सौजन्य: YouTube
सध्या भारतात अनेकानेक कार्स लौकण्ह होताना दिसत आहे. यातही सध्या इलेक्ट्रिक कार्सचा बोलबाला खूप आहे. ग्राहकांची वाढती मागणी पाहता अनेक कंपनीज सुद्धा आपल्या आगामी कार्स लवकरच मार्केटमध्ये लाँच करणार आहे. पण जेव्हा आपण कार खरेदी करायला जातो तेव्हा समोर एक किंमत आणि पेपरवर एक किंमत आपल्याला दिसते.
भारतात मोठी कार खरेदी करणे ही सोपी गोष्ट नाही. आपल्या देशातील कर रचना पाहिल्यानंतर अनेक कार खरेदीदारांचे चेहरे बदलले असतात. जर एका कारची किंमत लाखो रुपये असेल आणि तुम्ही ती कार खरेदी करता त्यावर किती कर आकारला जाईल आणि त्यातून सरकारला किती पैसे मिळेल हे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. चला महिंद्र थारवर लागू होणारे कर आणि उपकर यांचे संपूर्ण गणित आज आपण जाणून घेऊया.
माहितीनुसार, कारच्या नोंदणीवर सरकारकडून 28 टक्के जीएसटी लावला जातो आणि कारच्या कॅटेगरीनुसार त्यावर अतिरिक्त उपकर लावला जातो, जो प्रत्येक सेगमेंटसाठी वेगळा असतो.
जीएसटीसोबतच सरकार नवीन कार खरेदीवर सेसही आकारते. उपकर एक टक्क्यांपासून ते 22 टक्क्यांपर्यंत असतो. याशिवाय डिझेल वाहनांवरही हा कर अधिक असतो. याशिवाय हॅचबॅक वाहनांवर 18 टक्के जीएसटी आकारला जातो, तर लक्झरी वाहनांवर 28 टक्के जीएसटी लावला जातो. याशिवाय सेडान वाहनांवर २२ टक्के उपकर आणि एसयूव्हीवर २२ टक्के उपकर लावला जातो.
जर आपण असे गृहीत धरले की महिंद्र थारची मूळ किंमत ही 11 लाख 65 हजार रुपये आहे. तर या कारवर 14 टक्के राज्य कर आणि 14 टक्के केंद्रीय कर असतो. अशा प्रकारे दोन्ही कर मिळून ३ लाख २६ हजार रुपये होतात. 2 लाख 33 हजार रुपयांच्या या थारवर 20 टक्के उपकरही लावला जातो.
या कारवर 17 हजार 240 रुपयांचा टीसीएस आणि 2 लाख 19 हजार रुपयांचा रोड टॅक्सही लागू आहे. याशिवाय एक लाख रुपयांचा विमा सुद्धा यात समाविष्ट असतो. कर आणि उपकर मिळून या कारची एकूण किंमत सुमारे 20 लाख 60 हजार रुपये आहे. ही किमंत तुमच्या जवळील शोरूमनुसार बदलू शकते.