Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ना पेट्रोल-डिझेल, ना पार्किंगचं टेन्शन! Tata Motors ला टक्कर देणारी नॅनोसारखी कार बाजारात, काय आहे खासियत?

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत असताना Blink Mobility ही गुरुग्रामस्थित स्टार्टअप कंपनी किफायतशीर EV कार विकसित करत आहे. सुमारे 4 लाख रुपयांच्या किंमतीत येऊ शकणारी ही कार नॅनोसारख्या कॉम्पॅक्ट डिझाइनची कार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 17, 2026 | 02:07 PM
GURUGRAM CAR

GURUGRAM CAR

Follow Us
Close
Follow Us:
  • मोठ्या कंपन्यांना टक्कर
  • सुमारे 4 लाखांच्या किंमतीत मिळणार कार
  • नॅनोसारखा लूक, पण आधुनिक तंत्रज्ञान
भारतात सध्या अनेक वाहनधारक इलेक्ट्रीक वाहनांना पसंती देताना दिसत आहेत. ही गरज लक्षात घेता एमजी मोटर्स, टाटा या कंपन्यांनी इलेक्ट्रीक कार बाजारात उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यांच्या MG Coment EV आणि Tata Tiago EV सारख्या मॉडेलला टक्कर देण्यासाठी आता नवीन कार बाजारात उतरणार आहे. कंपनी एका नवीन इलेक्ट्रिक कारवर काम करत आहे. त्या कारची चाचणी अगोदरपासूनच सुरु झाली असून नुकताच या कारचा व्हिडीओ सोशल मीडियावरही समोर आला आहे. ज्यामुळे बाजारात या कारबाबत उत्सुकता वाढत आहे.

गुरुग्रामच्या कंपनीचं मोठ्या कंपन्यांना आव्हान?

एमजी मोटर्स, टाटा अशा अशा कंपन्यांनीसुद्धा त्यांच्या इलेक्ट्रीक कार बाजारात उपलब्ध केल्या आहेत. पण या कंपन्यांच्या स्पर्धेत ब्लिंक मोबिलिची कंपनीही उतरली आहे. प्राथमिक माहितीनुसार, कंपनीकडून किफायतशीर ईव्हीची चाचणी सुरु आहे.

उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंडसह देशातील ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाने म्हटले…

किती असू शकते किंमत?

एका ब्लॉगरच्या माहितीनुसार या नवीन कारचं ‘कार1’ असं नाव देण्यात आलं असून हे अंतिम नाव नाही. कंपनी 2026 वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत या प्रकल्पाच्या कामाला गती देणार आहे. सध्या रस्त्यांवर या कारची चाचणी घेतली जात आहे. ज्यामुळे तांत्रिक त्रूटी दुरुस्त केल्या जाऊ शकतील. अहवालांनुसार, या इलेक्ट्रिक कारची किंमत सुमारे 4 लाख असू शकते. या किंमतीत ही कार बाजारात उतरल्यास ग्राहकांना मात्र नक्कीच आनंद होणार आहे.

कारच्या डिझाईनमध्ये काय विशेष?

पहिल्याच झलकमध्ये ही कार टाटा Nano सारखी दिसते. या कारचा बेस नॅनो कारवर आधारित आहे, की तिची डिझाईन पूर्णपणे पुन्हा नव्याने डिझाईन केली आहे याबाबत स्पष्टता नाही. कंपनीने पॅनल्ससाठी एक विशेष हलकं आणि मजबूत मटेरियल वापरलं आहे, असा दावा करण्यात आला आहे. हे मटेरियल पारंपरिक स्टीलपेक्षा मजबूत आहे. गर्दीच्या शहरातील रस्त्यांवर चालणं सोपं व्हावं यासाठी कारला विशिष्ट प्रकारे डिझाईन करण्यात आलं आहे. या कार मॉडेलचा कॉम्पॅक्ट आकार लहान ठेवण्यात आला आहे. ब्लिंक मोबिलिटी बॅटरी तंत्रज्ञानावर काम करते. त्याचबराबर जलद चार्जिंगला सपोर्टही करु शकते. कंपनी या कारसाठी अशा प्रणालीवर काम करत आहे ज्या बॅटरी सहजपणे काढता येते आणि पुन्हा बसवताही येते. जर ही प्रणाली यशस्वी झाली तर ते ग्राहकांसाठी सोयीचं ठरणार आहे.

आयआयटी विद्यार्थी बनवतोय कार

या स्टार्टअपची सुरुवात आयआयटी दिल्लीचे माजी विद्यार्थी निकेश बिष्ट यांनी केली आहे. या कंपनीच्या टीममध्ये टेस्लासारख्या मोठ्या कंपनीत काम केलेल्या लोकांचा सहभाग आहे. त्यामुळे या कारकडून मोठ्या अपेक्षा ठेवल्या जात आहे. संकल्पनेनुसार ही कार बाजारात उपलब्ध झाली तर भारतीय बाजारपेठेत मोठा आविष्कार ठरु शकतो.

Haryana Blast: केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट; पोलिसांसह 35 जण जखमी, रस्त्यांवरील गाड्या…

Web Title: Auto news indian startup blinq mobility launches first affordable electric car mg comet tata tiago

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 02:07 PM

Topics:  

  • auto news
  • electric car
  • Mg motors car
  • tata cars

संबंधित बातम्या

EV Market आमच्या घरचं! Mahindra आणि MG ला समजलंच नाही आणि ‘ही’ कंपनी पोहोचली सर्वोच्च शिखरावर
1

EV Market आमच्या घरचं! Mahindra आणि MG ला समजलंच नाही आणि ‘ही’ कंपनी पोहोचली सर्वोच्च शिखरावर

EV Two Wheeler मार्केटमध्ये ‘या’ कंपनीचा दबदबा, एका महिन्यात 49,453 दुचाक्यांची विक्री; जाणून घ्या टॉप 5 कंपन्या
2

EV Two Wheeler मार्केटमध्ये ‘या’ कंपनीचा दबदबा, एका महिन्यात 49,453 दुचाक्यांची विक्री; जाणून घ्या टॉप 5 कंपन्या

फक्त 21 मिनिटांत चार्ज! BMW ची ‘ही’ इलेक्ट्रिक कार घरालाही देऊ शकते पॉवर सप्लाय
3

फक्त 21 मिनिटांत चार्ज! BMW ची ‘ही’ इलेक्ट्रिक कार घरालाही देऊ शकते पॉवर सप्लाय

भारतात Vinfast च्या ‘या’ 7 सीटर इलेक्ट्रिक कारची पहिली झलक समोर! जाणून घ्या फीचर्स आणि पॉवर
4

भारतात Vinfast च्या ‘या’ 7 सीटर इलेक्ट्रिक कारची पहिली झलक समोर! जाणून घ्या फीचर्स आणि पॉवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.