फोटो सौजन्य- iStock
गणेशोत्सव ते दिवाळी या सणासुदीच्या काळामध्ये सर्वच ऑटोमोबाईल कंपन्या कारवर बंपर सवलत देत ग्राहकांना आकर्षित करत आहेत. या काळातच सर्वात जास्त कार विक्री होते त्यामुळे भारतीय बाजारपेठेमध्ये सवलतींचा उत्सव असतो. भारतातील मोठी कार निर्मित कंपनी टाटा मोटर्सने (Tata Motors) कंपनीकडूनही नवरात्रीच्या अगोदर एका कार खरेदीवर जबरदस्त सवलत देण्यात येत आहे. जाणून घेऊया या सवलतीबद्दल
टाटाची सवलतीमध्ये उपलब्ध असलेली कार आहे Altroz RACER. या कारवर टाटाकडून उत्तम सवलत दिली जात आहे. Altroz RACER च्या पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही व्हेरिएंटवर 15 हजार रुपयांची ऑफर आहे. याशिवायच विशिष्ट डीलरशिप्सवर 10 हजार पर्यंत अधिकची सवलत दिली जात आहे. एकूण 25 हजार पर्यंतच्या सवलतीचा तुम्ही फायदा करुन घेऊ शकता.
फोटो सौजन्य- Official Website
Tata Altroz Racer चे इंजिन
टाटा अल्ट्रोझ रेसरचे ( Tata Altroz Racer) सर्वात प्रमुख वैशिष्ट आहे कारचे इंजिन, जे 1.2L, 3-सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल युनिट आहे. हे पेट्रोल युनिट 120bhp पॉवर आणि 170 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यावरुनच इंजिन क्षमतेचा अंदाज लावू शकतो. इंजिन आउटपुट Altroz iTurbo पेक्षाही 10bhp/30Nm जास्त आहे. एवढेच नाही तर टॉर्कच्या बाबतीत हे Hyundai i20 N लाइनपेक्षाही पुढे आहे. या कारमध्ये ट्रान्समिशनसाठी 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स उपलब्ध असणार आहे.
Tata Altroz Racer ची वैशिष्ट्ये
Altroz Racer या कारमध्ये नवीन 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह अपडेटेड सॉफ्टवेअरसह सुसज्ज आहे. मॉडेलमध्ये नवीन 7.0-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. तसेच कारमध्ये वायरलेस चार्जिंग, हवेशीर फ्रंट सीट्स, एअर प्युरिफायर आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने कारमध्ये 6 एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत. अल्ट्रोझ रेसरचा स्पोर्टी लूकही आकर्षित करतो.
टाटा अल्ट्रोज रेसरची किंमत
या कारची एक्स शो रुम किंमत ही 9.49 लाख रुपये ते 10.99 लाख रुपयांपर्यंत आहे. या कारची थेट स्पर्धा ही Hyundai i20 N लाइनशी आहे जिची किंमत 9.99 लाख रुपये ते 12.52 लाख रुपयापर्यंत आहे.
Tata Altroz Racer वरील या सवलतीमुळे ग्राहकांसाठी कार खरेदीचा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.