
फोटो सौजन्य: Pinterest
Tata Harrier आणि Tata Safari चा पेट्रोल व्हर्जन भारतात लाँच करण्यात आले आहे. आतापर्यंत, या दोन्ही लोकप्रिय एसयूव्ही फक्त डिझेल इंजिनसह उपलब्ध होत्या, परंतु आता त्या पेट्रोल पर्यायात सुद्धा सुरू झाल्यामुळे ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध आहेत. टाटा हॅरियर पेट्रोलची किंमत 12.89 लाख (एक्स-शोरूम) रुपयांपासून सुरू होते, तर टाटा सफारी पेट्रोलची किंमत 13.29 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. चला या कारच्या अन्य माहितीबद्दल जाणून घेऊयात.
Skoda Kylaq साठी 2 लाखाचं Down Payment केल्यास किती द्यावा लागेल EMI? ‘हा’ हिशोब लक्षात ठेवा
हॅरियर आणि सफारी पेट्रोल इंजिन टाटाच्या नवीन 1.5-लिटर हायपरियन टर्बो-जीडीआय पेट्रोल इंजिनने सुसज्ज आहेत. हे इंजिन 170 पीएस पॉवर आणि 280 एनएम टॉर्क निर्माण करते. हे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दोन्हीसह ऑफर केले जाते. कंपनीचा दावा आहे की या पेट्रोल एसयूव्ही त्यांच्या सेगमेंटमध्ये उत्कृष्ट मायलेज देतात. टाटा हॅरियर पेट्रोलने 12 तासांच्या ड्राईव्हमध्ये सर्वाधिक मायलेज मिळवून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे.
नवीन पेट्रोल इंजिनसह, हॅरियर आणि सफारीचा ड्राईव्ह पूर्वीपेक्षा स्मूथ झाला आहे. आवाज आणि व्हायब्रेशन देखील लक्षणीयरीत्या कमी झाले आहेत, ज्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवास अधिक आरामदायी झाला आहे. पेट्रोल इंजिनच्या परिचयामुळे, या एसयूव्ही आता इतर पेट्रोल एसयूव्हींशी थेट स्पर्धा करतील.
या दोन्ही SUVs मध्ये मोठे 36.9 सेमी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डॉल्बी एटमॉस सपोर्ट असलेला साउंड सिस्टम आणि इनबिल्ट डॅशकॅमसह डिजिटल रिअर-व्यू मिरर देण्यात आला आहे. याशिवाय कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, व्हॉइस कमांडसह नेव्हिगेशन आणि स्लाइडिंग फ्रंट आर्मरेस्ट यांसारखी फीचर्सही मिळतात, ज्यामुळे ड्रायव्हिंग अधिक सोयीस्कर आणि आरामदायी होते.
Tata Harrier आणि Safari पेट्रोलच्या सर्व व्हेरिएंट्सना Bharat NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. यामध्ये पूर्वीप्रमाणेच लेव्हल-2 ADAS सिस्टम देण्यात आली असून, त्यात 22 सेफ्टी फीचर्सचा समावेश आहे. त्यामुळे सेफ्टीच्या बाबतीत पेट्रोल मॉडेल्सही पूर्णपणे मजबूत ठरतात. पेट्रोल इंजिनसह Tata Harrier आणि Safari आता अधिक ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय बनल्या असून, दमदार इंजिन, उत्कृष्ट फीचर्स आणि भक्कम सेफ्टीच्या जोरावर या SUVs सेगमेंटमधील आपली पकड आणखी मजबूत करतील.