Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अँटी-ड्रोन पेट्रोल वाहन इंद्रजाल रेंजर! एआय-आधारित प्रगत कमांड सिस्टम

टोयोटा हायलक्सवर आधारित हे 4x4 ऑल-टेरेन वाहन कठीण परिस्थितीतही सहज हालचाल करत 10 किमीवरून ड्रोन शोधू व 4 किमीवरून निष्क्रिय करू शकते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 04, 2025 | 07:23 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘टी-हब’ या स्टार्टअप इनक्यूबेटर इव्हेंटमध्ये या वाहनाचे अनावरण करण्यात आले
  • 4×4 ऑल-टेरेन वाहनाच्या स्वरूपात ते अत्यंत कठीण परिस्थितीतही सहज हालचाल
  • इंद्रजाल रेंजर हे देशातील सुरक्षा यंत्रणांसाठी भविष्यातील सर्वात आधुनिक आणि सक्षम अँटी-ड्रोन उपाय
जगातील पहिले पूर्णपणे मोबाइल एआय-सक्षम अँटी-ड्रोन पेट्रोल वाहन ‘इंद्रजाल रेंजर’ लाँच करण्यात आले असून हे वाहन 10 किमी अंतरावरून कोणताही ड्रोन शोधू, ट्रॅक करू शकते आणि 4 किमीवरून त्याला निष्क्रिय करण्याची क्षमता ठेवते. हैदराबादमधील एरियल डिफेन्स सिस्टम कंपनी इंद्रजाल ड्रोन डिफेन्सने हे वाहन शहरी परिसर आणि सीमावर्ती भागातील परवानगीशिवाय उडणाऱ्या ड्रोनचा धोका ओळखून त्यांना तत्काळ थांबवण्यासाठी विकसित केले आहे. ‘टी-हब’ या स्टार्टअप इनक्यूबेटर इव्हेंटमध्ये या वाहनाचे अनावरण करण्यात आले आणि यावेळी प्रत्यक्ष डेमोसुद्धा देण्यात आला.

हीच ती संधी! Maruti Suzuki च्या ‘या’ Cars वर धमाकेदार डिस्काउंट

इंद्रजाल रेंजरमध्ये एआय-आधारित प्रगत कमांड सिस्टम SkyOS बसवण्यात आली आहे, जी संपूर्ण ऑपरेशन स्वयंचलितपणे नियंत्रित करते. वाहनावर जीएनएसएस सॅटेलाइट स्यूफिंग तंत्रज्ञान, रेडिओ फ्रिक्वेन्सी जॅमिंग सिस्टम आणि सिग्नल-आधारित किल स्विच बसवण्यात आला आहे, ज्याच्या मदतीने क्षणात ड्रोन खाली पाडणे शक्य होते. हे वाहन पूर्णपणे फिरण्यायोग्य असून विविध प्रकारच्या भूभागांवर चालण्यासाठी डिझाइन केलेले आहे. इंद्रजाल रेंजरचे एक्सटीरियर टोयोटा हायलक्सवर आधारित आहे आणि 4×4 ऑल-टेरेन वाहनाच्या स्वरूपात ते अत्यंत कठीण परिस्थितीतही सहज हालचाल करू शकते.

वाहनाच्या पुढील भागात मजबूत बंपर, उच्च-संवेदनशील सेन्सर्स आणि रिस्क-डिटेक्शन मॉड्यूल्स दिले आहेत. बाजूला रेनफोर्स्ट पॅनेल्स आणि बाह्य अँटेना सेटअप बसवला असून तो ड्रोनच्या हालचाली अचूकपणे टिपतो. मागील बाजूस इंटिग्रेटेड जॅमर आणि लेझर युनिट्स दिले असून त्यांचा वापर करून ड्रोनला निर्बंधित किंवा निष्क्रिय करण्यात येते. या गाडीत टोयोटा हायलक्समधील 2.8 लिटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे, जे 201 HP पॉवर आणि 500 Nm टॉर्क निर्माण करते.

Hyundai Venue ने इतरांंचा बाजार बसवला! लाँचनंतर फक्त एका महिन्यात मिळाली विक्रमी बुकिंग

वाहनाची टॉप स्पीड 180 किमी प्रतितास असून ते 0 ते 100 किमी प्रतितास वेग फक्त 10 सेकंदांत गाठू शकते. 4×4 ऑल-व्हील ड्राइव्ह सेटअपसोबत वाळू, चिखल आणि दगडी भूभागासाठी स्वतंत्र ऑफ-रोड मोड्स दिले आहेत. वाहन सुरक्षिततेसाठी ABS, EBD, सहा एअरबॅग्स, 360-डिग्री कॅमेरा आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम बसवण्यात आले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान, उच्च सुरक्षा घटक आणि एआय-चालित कमांड सिस्टीममुळे इंद्रजाल रेंजर हे देशातील सुरक्षा यंत्रणांसाठी भविष्यातील सर्वात आधुनिक आणि सक्षम अँटी-ड्रोन उपाय म्हणून पाहिले जात आहे.

Web Title: Anti drone patrol vehicle indrajal ranger

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 07:23 PM

Topics:  

  • ai
  • Car

संबंधित बातम्या

Ai AC Tickets Fraud : चक्क AI वापरून बनवला AC Local चा पास, पुन्हा रेल्वे तिकीट घोटाळा प्रकरण समोर
1

Ai AC Tickets Fraud : चक्क AI वापरून बनवला AC Local चा पास, पुन्हा रेल्वे तिकीट घोटाळा प्रकरण समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.