Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI ची जादू! Nano Banana 2 मुळे त्वरित बनवा 4K इमेजेस; फोटोंच्या बॅकग्राउंडमध्ये कमालीचे बदल…

तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठी घडामोड म्हणजे Google ने त्यांचे नवीन AI इमेज जनरेशन मॉडेल Nano Banana 2 लाँच केले आहे. कंपनीचे CEO Sundar Pichai यांनी याला गुगलचे 'सर्वोत्तम इमेज मॉडेल' संबोधले आहे. 4k इमेज जनरेट करता येतील.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 28, 2026 | 02:44 PM
nano banana 2

nano banana 2

Follow Us
Close
Follow Us:
  • सर्वात प्रगत AI इमेज जनरेशन मॉडेल, ‘नॅनो बनाना २’ लाँच
  • हे टूल तुमच्यासाठी कसं उपयुक्त ?
  • आता तुम्हीच करा तुमचं काम
Google Nano Banana 2: तंत्रज्ञान क्षेत्रातील एक मोठी बातमी! गुगलने त्यांचं सर्वात वेगवान आणि सर्वात प्रगत AI इमेज जनरेशन मॉडेल, ‘नॅनो बनाना २’ लाँच केलं आहे. CEO सुंदर पिचाई यांनी त्याचे वर्णन गुगलचे “सर्वोत्तम इमेज मॉडेल” असे केले आहे. हे नवीन टूल कल्पनाशक्तीला हाय-क्वालिटी प्रतिमांमध्ये रूपांतरित करू शकते. गुगल सर्चच्या मदतीने रियल टाइम माहितीचा वापर करुन अचूक आणि वास्तववादी दिसणारी इमेज तयार करते. हे इतर साधारण  AI साधनांपेक्षा जलद आणि अधिक बारकाव्यांसह काम करतं.

हे टूल तुमच्यासाठी कसं उपयुक्त ?

जुन्या फोटोला नवीन रुप देण्यासाठी – तोच चेहरा मात्र नवीन शैली

आपल्याला बऱ्याचदा जुन्या फोटोची बॅकग्राउंड बदलायचं असतं. पण त्यासोबत चेहराही बदलेलं अशी काळजी वाटते. मात्र नॅनो बनाना २ च्या ‘फेस कंसिस्टन्सी’ वैशिष्ट्यामुळे, तुम्ही आता तुमचा चेहरा तसाच ठेवून तुमचे कपडे, हेयरस्टाईल किंवा बॅकग्राऊंड अचूकपणे बदलता येते. कसं करावं: फक्त एक फोटो अपलोड करा आणि त्याला कमांड द्या की ‘माझा चेहरा तसाच राहूदेत. पण माझ्या बॅकग्राऊंडला डोंगराळ भाग असूदे आणि मला फॉर्मल सूट घालून दाखवा’ त्यानंतर तुम्ही दिलेली कमांड फॉलो करत प्रतिमा तयार करेल.

मुलांना अभ्यासात आणि प्रकल्पांमध्ये मदत करण्यासाठी

या टूलची कल्पकता इतकी खोल आहे की ते किचकट ग्राफिक्स देखील तयार करू शकतं. जसं शालेय प्रकल्पांसाठी, आपल्याला अनेकदा ऑनलाइन अचूक आकृत्या सापडत नाहीत. कधीकधी ते तुमच्या स्वतःच्या भाषेतही उपलब्ध नसतात. हे टूल तुम्हाला तुमच्या पसंतीच्या भाषेत 4K इन्फोग्राफिक्स तयार करुन देते. ते इंग्रजी ग्राफिक्स हिंदीमध्ये देखील रूपांतरित करू शकतं.
कसं करावं: जेमिनी अॅपवर जा आणि त्याला कमांड द्या की, ‘प्रत्येक ग्रहाची नावे हिंदीमध्ये लिहिताना सौर मंडळाचा 4K चार्ट तयार करा.’ तुम्ही दिलेल्या कमांडप्रमाणे एक चांगली प्रतिमा तयार करुन देईल.

Introducing Nano Banana 2, our best image model yet 🍌🍌 It uses Gemini’s understanding of the world and is powered by real-time information and images from web search. That means it can better reflect real-world conditions in high-fidelity. Check out “Window Seat,” a demo… pic.twitter.com/zhe8tC4jCL — Sundar Pichai (@sundarpichai) February 26, 2026

व्यवसायांसाठी मोफत ग्राफिक डिझायनर

जर तुम्ही लहान व्यवसाय चालवत असाल आणि सोशल मीडियावर उत्पादनाचे फोटो पोस्ट करायचे असतील, तर महागड्या डिझायनरला कामावर ठेवण्याची गरज नाही. नॅनो बनाना तुमच्यासाठी ते कमी वेळात अचूक करुन देईल. कसं करावं: तुमच्या उत्पादनाचा फोटो घ्या आणि AI ला सूचना द्या – ‘हा शूज फोटो स्टायलिश शोरूम बॅकग्राउंड ठेवा आणि वर ‘५०% डिस्काउंट’ असं लिहून द्या.’

व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियासाठी स्टिकर्स आणि डीपी

तुम्ही तुमच्या सोयीनुसार मीम्स आणि स्टिकर्स तयार करु शकता. असे स्टिकर्स जे तुम्हाला इंटरनेटवर इतर कुठेही सापडणार नाहीत. कसं करावं: जेमिनी अॅपवर जा आणि त्याला कमांड द्या की, ‘चष्मा घातलेल्या कुत्र्याचा समोसा खाताना एक मजेदार फोटो बनवा.’ ते तुम्हाला काही सेकंदात तुम्ही सांगितलेली प्रतिमा तयार करुन देतील. 

हे गुगल अॅप्स नॅनो बनाना २ ला सपोर्ट करतील

गुगल त्यांच्या संपूर्ण इकोसिस्टममध्ये नॅनोचा समावेश करत आहे. जेमिनी अॅप, गुगल सर्चचा AI मोड, गुगल लेन्स आणि गुगलच्या फ्लो व्हिडिओ टूलमध्ये वापरू शकतील. यामुळे प्रत्येकासाठी ग्राफिक डिझाइन आणि फोटो एडिटिंग सोपं होणार आहे.

नॅनो बनवण्याचा प्रवास 

  • गुगलने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये त्यांचे इमेज जनरेशन मॉडेल ‘नॅनो बनाना’ पहिल्यांदा लाँच केले होते. जे त्याच्या हाय-रिझोल्यूशन फोटोंसाठी सगळ्यांना फार आवडलं. 
  • त्यानंतर नोव्हेंबरमध्ये आणखी चांगल्या प्रतिमा बनवण्यासाठी “नॅन बनाना प्रो” मॉडेल सादर करण्यात आले. ते व्यावसायिक स्टुडिओ-गुणवत्तेच्या प्रतिमांसाठी डिझाइन करण्यात आले होते.
  • आता, नॅनो बनाना २ हे कंपनीने वेग आणि इंटिलीजंट एकत्रित करून हे टूल तयार करण्यात आलं आहे. सामान्य वापरकर्त्यांसाठी आणि व्यावसायिकांसाठी गेम चेंजर ठरू शकते.

Web Title: Google nano banana 2 ai image generator launch update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • ai
  • Business News
  • google photo

संबंधित बातम्या

8th Pay Commission: काय आहे ICMR चा 3490 कॅलरी फॉर्म्युला? जेवणाची थाळी ठरवणार तुमची सॅलरी? नेमका काय प्रकार?
1

8th Pay Commission: काय आहे ICMR चा 3490 कॅलरी फॉर्म्युला? जेवणाची थाळी ठरवणार तुमची सॅलरी? नेमका काय प्रकार?

Hardwyn India Limited चे आर्थिक निकाल जाहीर! वार्षिक उत्पन्नाने ओलांडला 200 कोटींचा टप्पा; कंपनी देणार बोनस शेअर्स?
2

Hardwyn India Limited चे आर्थिक निकाल जाहीर! वार्षिक उत्पन्नाने ओलांडला 200 कोटींचा टप्पा; कंपनी देणार बोनस शेअर्स?

तुमच्या पाकीटात असलेली 500 ची नोट खोटी तर नाही ना! RBI कडून इशारा, बाजारात 20% Fake Currency?
3

तुमच्या पाकीटात असलेली 500 ची नोट खोटी तर नाही ना! RBI कडून इशारा, बाजारात 20% Fake Currency?

तब्बल 22 रुपयांनी स्वस्त झालं Petrol – Diesel, सरकारचा मोठा निर्णय; जनतेने घेतला सुटकेचा श्वास
4

तब्बल 22 रुपयांनी स्वस्त झालं Petrol – Diesel, सरकारचा मोठा निर्णय; जनतेने घेतला सुटकेचा श्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.