फोटो सौजन्य: Social Media
भारतात लक्झरी कारची चर्चा अनेकदा होत असते. आजही रस्त्यांवरून एखादी लक्झरी कार जाताना दिसली की अनेक जणांच्या नजरा त्यावर रोखल्या जात असतात. तसेच भारतात या कारची विक्री सुद्धा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.
देशात अनेक लक्झरी कार उत्पादक कंपन्या आहेत, त्यातीलच एक म्हणजे ऑडी. आता कंपनीने भारतात Audi RS Q8 facelift ची लाँचिंग तारीख जाहीर केली आहे. ही कार १७ फेब्रुवारी २०२५ रोजी भारतात लाँच केली जाईल. ही कार सध्याच्या मॉडेलपेक्षा चांगले असणार आहे. त्याच्या नवीन व्हर्जनमध्ये एक्सटिरिअर आणि इंटिरिअर डिझाइनमधील बदल दिसून येतात.
Auto Expo 2025 मध्ये TATA चा जलवा, सादर केली 100 टक्के इथेनॉलवर चालणारी SUV
फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये एक मोठे इंजिन दिसू शकते, जे अधिक शक्ती प्रदान करते. भारतात कोणत्या उत्तम फीचर्ससह ऑडी आरएस क्यू८ लाँच केली जाऊ शकते त्याबद्दल आपण जाणून घेऊया.
ऑडी आरएस क्यू८ फेसलिफ्टमध्ये सध्याच्या मॉडेलपेक्षा अधिक ठळक डिझाइन दिसू शकते. ही अपडेटेड 3D हनीकॉम्ब पॅटर्नसह नवीन काळ्या ग्रिलसह, फ्रंट लिपवर कार्बन फायबर घटकांसह आणि एअर व्हेंट्ससह पाहिले जाऊ शकते. कार चालवताना चांगल्या व्हिसिबिलीटीसाठी LED मॅट्रिक्स हेडलाइट्स आणि OLED टेल लाइट्स देखील प्रदान केले जाऊ शकतात. 22-इंच अलॉय व्हील्ससोबत, 23-इंच व्हील्स देखील पर्याय म्हणून दिली जाऊ शकतात.
भारतीयांची आवडती स्कूटर आता नवीन रूपात ! 2025 Honda Activa झाली लाँच, किंमत 1 लाखांपेक्षा कमी
ऑडी आरएस क्यू८ च्या केबिनमध्ये एक नवीन डिझाइन दिसू शकते. यात स्पोर्ट सीट्स प्लस असू शकते जे रेस-टेक्स अपहोल्स्ट्रीसह अतिरिक्त आधार आणि आराम देईल. त्यात RS ड्राइव्ह मोडसह ड्युअल-स्क्रीन सेंटर कन्सोल देखील असू शकतो. आरामदायी केबिन वातावरण प्रदान करण्यासाठी फॉर-झोन क्लायमेट कंट्रोल देखील पाहिले जाऊ शकते. यामध्ये अॅक्टिव्ह रोल स्टेबिलायझेशन, ऑल-व्हील स्टीअरिंग, अॅडॉप्टिव्ह एअर सस्पेंशन आणि बॉडी रोलसाठी नवीन क्वाट्रो स्पोर्ट डिफरेंशियल देखील पाहता येईल.
ऑडी आरएस क्यू८ फेसलिफ्टमध्ये 4.0-लिटर ट्विन-टर्बो V8 इंजिन असण्याची अपेक्षा आहे जे सध्याच्या मॉडेलपेक्षा (591 बीएचपी आणि 800 एनएम) 631 बीएचपी आणि 850 एनएम टॉर्क निर्माण करते. याशिवाय, ऑडी आरएस क्यू८ परफॉर्मन्समध्ये 48V माइल्ड-हायब्रिड सिस्टम देखील प्रदान केली जाऊ शकते. ही कार फक्त 3.6 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग गाठण्यास सक्षम असेल. या कारची टॉप स्पीड ताशी ३०५ किमी पर्यंत असू शकते.
भारतात ऑडी आरएस क्यू८ परफॉर्मन्सची एक्स-शोरूम किंमत अंदाजे २ कोटी रुपये असू शकते. भारतीय बाजारपेठेत, ही कार Lamborghini Urus SE आणि Porsche Cayenne GTS शी स्पर्धा करेल.