Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

7 एअरबॅग्स, दमदार इंजिन आणि बरंच काही! नवीन Hyundai Verna झाली लाँच, किंमत…

भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम कार्स उपलब्ध आहेत. अशीच एक कार म्हणजे Hyundai Verna. नुकतेच या कारचे अपडेटेड मॉडेल लाँच करण्यात आले आहे. चला या कारच्या फीचर्सबद्दल माहिती घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 09, 2026 | 06:04 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • नवीन Hyundai Verna झाली लाँच
  • दमदार इंजिन आणि 7 एअरबॅग्सने सुसज्ज
  • जाणून घ्या फीचर्स
भारतात अनेक कार लोकप्रिय ठरल्या आहेत. विशेष म्हणजे अनेक कंपन्या या कार्सची लोकप्रियता तशीच राहावी म्हणून त्याचे अपडेटेड मॉडेल भारतात लाँच करत असतात. नुकतेच Hyundai ने सुद्धा त्यांच्या लोकप्रिय कारचे अपडेटेड मॉडेल भारतात लाँच केले आहे.

Hyundai ने Hyundai Verna च्या लाँचच्या वेळी कंपनीच्या CEO यांनी सांगितले की, ही नवीन कार फक्त जुन्या मॉडेलचे अपडेट नसून ती स्वतःमध्ये एक स्वतंत्र आणि खास ब्रँड आहे. बाजारात कितीही बदल झाले तरीही ह्युंदाई उत्तम इंजिनिअरिंग आणि उत्कृष्ट ड्रायव्हिंग अनुभव देण्यास कटिबद्ध आहे. ही कार चालवताना स्थिरता आणि सुरक्षिततेचा उत्तम अनुभव देते तसेच याचे इंजिनही खूप पॉवरफुल आहे.

दमदार आणि आकर्षक लुक

नवीन Verna चे डिझाइन आधीपेक्षा अधिक शार्प आणि स्टायलिश बनवण्यात आले आहे, त्यामुळे ती अधिक प्रीमियम आणि कॉन्फिडेंट दिसते. आपल्या सेगमेंटमध्ये ही सर्वात रुंद कार असून तिचा 2670 मिमी व्हीलबेस सर्वात लांब आहे. पुढील बाजूस चमकदार ब्लॅक क्रोम ग्रिल देण्यात आली आहे जी कारला स्पोर्टी लुक देते. 1765 मिमी रुंदी आणि 4565 मिमी लांबीमुळे कारमध्ये अधिक केबिन स्पेस मिळतो आणि प्रवास अधिक आरामदायी होतो.

रस्ता सुरक्षेसाठी Kia India चा पुढाकार; सुरू केला ‘या’ उपक्रमाचा दूसरा टप्पा

डिझाइनमध्ये अनेक बदल

रात्री अधिक चांगले दृश्य मिळावे यासाठी ड्युअल LED प्रोजेक्टर हेडलाइट्स देण्यात आले आहेत. कारच्या पुढील आणि मागील बंपरचे डिझाइन आधीपेक्षा अधिक बोल्ड आणि मजबूत बनवले आहे. तसेच यात 16 इंच डायमंड-कट अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत जे कारच्या आकर्षणात भर घालतात.

इंटीरियर

या कारमध्ये स्टायलिश D-कट स्टीयरिंग व्हील देण्यात आले आहे, जे स्पोर्टी लुक देते. सीट्सवर प्रीमियम लेदरेट (Leatherette) मटेरियल वापरण्यात आले आहे. ड्रायव्हर सीट बटणांच्या मदतीने 8 वेगवेगळ्या पद्धतींनी ॲडजस्ट करता येते. याशिवाय ड्रायव्हिंग सीटसाठी स्मार्ट मेमरी फंक्शन देण्यात आले आहे. मागील खिडक्यांसाठी पडदे देण्यात आले असून हे फीचर या सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच उपलब्ध झाले आहे. याचा 528 लिटरचा बूट स्पेस हा या सेगमेंटमधील सर्वात मोठा मानला जातो.

15 हजार पगारातही शक्य! Triumph Speed T4 चा EMI तर 10 हजारांपेक्षा कमी, जाणून घ्या संपूर्ण कॅल्क्युलेशन

हाय-टेक फीचर्स

या कारमध्ये 52.06 सेमी (10.25″ + 10.25″) ड्युअल इंटीग्रेटेड इन्फोटेनमेंट आणि डिजिटल क्लस्टर, इलेक्ट्रिक सनरूफ, राउंड व्ह्यू मॉनिटर, ब्लाइंड स्पॉट व्ह्यू मॉनिटर, स्मार्टफोन वायरलेस चार्जर, तसेच वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay यांसारखी आधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत. याशिवाय 8 स्पीकर्सचा साउंड सिस्टम देखील देण्यात आला आहे, जो या सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच देण्यात आला आहे. तसेच स्मार्ट कीचे फीचरही उपलब्ध आहे.

किती दमदार आहे इंजिन?

नवीन Hyundai Verna दोन शक्तिशाली इंजिन पर्यायांसह येते. पहिला 1.5 लिटर पेट्रोल इंजिन असून तो चांगले मायलेज देण्यासाठी ओळखला जातो. दुसरा 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे, जो अधिक पॉवर आणि जलद पिकअपसाठी योग्य आहे.

किंमत

कंपनीच्या माहितीनुसार नवीन Hyundai Verna ची सुरुवातीची किंमत 10,98,400 रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. या लॉन्चमुळे मिड-साईज सेडान सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा उत्साह निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच 7 एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत.

Web Title: New hyundai verna launched in india know price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 06:04 PM

Topics:  

  • automobile
  • Hyundai
  • new car

संबंधित बातम्या

TVS Ronin मध्ये मोठे अपडेट! नवीन Base+ व्हेरिएंट लाँच; मिळाले खास सेफ्टी आणि टेक फीचर्स
1

TVS Ronin मध्ये मोठे अपडेट! नवीन Base+ व्हेरिएंट लाँच; मिळाले खास सेफ्टी आणि टेक फीचर्स

सिंगल चार्जमध्ये 400 किमीपर्यंत रेंज! भारतातील जास्त रेंज देणारे 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स; पाहा किंमत आणि फीचर्स
2

सिंगल चार्जमध्ये 400 किमीपर्यंत रेंज! भारतातील जास्त रेंज देणारे 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स; पाहा किंमत आणि फीचर्स

एकदा घेतली की बदलावीशी वाटणार नाही! Honda च्या 10 टिकाऊ बाइक्सची यादी; जाणून घ्या
3

एकदा घेतली की बदलावीशी वाटणार नाही! Honda च्या 10 टिकाऊ बाइक्सची यादी; जाणून घ्या

Vinfast Grand  Premia इलेक्ट्रिक मोटरबाइकचे डिझाइन आले समोर! खास फ्रंट फेअरिंगसह येणार ही नवी बाइक
4

Vinfast Grand Premia इलेक्ट्रिक मोटरबाइकचे डिझाइन आले समोर! खास फ्रंट फेअरिंगसह येणार ही नवी बाइक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.