फोटो सौजन्य: Social Media
Bharat Mobility Global Expo 2025 मध्ये आतापर्यंत अनेक कार लाँच झाल्या आहेत. या ऑटो एक्सपोमध्ये अनेक अत्याधुनिक कारची झलक पाहायला मिळाली आहे. त्यातही टाटा मोटर्सने आपली Tata Avinya सादर केली, ज्याचा लूक पाहून अनेक जण आलिशान कारला विसरून जातील. फ्यूचरिस्टिक डिझाइनसह ही कंसेप्ट कार सादर झाली आहे. पान आता टाटाने अजून एक दमदार एसयूव्ही या ऑटो एक्सपोमध्ये सादर केली आहे, जी 100 टक्के इथेनॉलवर धावणार आहे.
कार खरेदीदारांच्या डोक्याला ताप ! ‘या’ ऑटो कंपनीच्या कार 32 हजार रुपयांनी महागल्या
ऑटो एक्स्पो 2025 मध्ये टाटाने त्यांची नवीन पंच फ्लेक्स फ्युएल कंसेप्ट सादर केली आहे. टाटा पंच फ्लेक्स फ्युएल कंसेप्ट कार सादर करणे हे भविष्याच्या दृष्टिकोनातून उचललेले एक महत्वाचे पाऊल आहे. आपल्याला सगळ्यांच माहित आहे की टाटा पंच आहे पेट्रोल, इलेक्ट्रिक आणि सीएनजी मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे. पण आता त्यात एक विशेष बदल करण्यात आला आहे. पंच आता 100 टक्के इथेनॉलवर चालण्यास सक्षम असणार आहे. Tata Punch Flex Fuel Concept कोणत्या फीचर्ससह येऊ शकते त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया.
टाटा पंच फ्लेक्स फ्युएल मॉडेलची वैशिष्ट्ये जाणून घेण्यापूर्वी, फ्लेक्स फ्युएल म्हणजे नेमके काय? हेजाणून घेणे महत्वाचे. फ्लेक्स फ्युएल वाहनांसाठी एक खास इंजिन आहे, जे पेट्रोल व्यतिरिक्त इथेनॉलच्या मिश्रणावर देखील चालू शकते. इथेनॉल हे गहू, मका आणि ऊसापासून बनवलेले जैवइंधन (Bio Fuel)आहे. पेट्रोलला पर्याय म्हणून फ्लेक्स इंधनाचा वापर करता येतो. त्याचा वापर प्रदूषण कमी करण्यास मदत करते. याशिवाय, उर्जेचीही बचत होते.
टाटा पंच फ्लेक्स फ्युएलमध्ये त्याच १.२-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनचा वापर केला जातो जे त्याच्या पेट्रोल व्हेरियंटला शक्ती देते. या कारचे इंजिन इथेनॉलच्या अधिक धोकादायक परिणामांपासून संरक्षण करण्यासाठी अपडेट करण्यात आले आहे. याचा अर्थ असा की त्यात बसवलेले इंजिन आता 100 टक्के इथेनॉलवरही धावेल.
यात पेट्रोल व्हेरियंटइतकीच 86bhp पॉवर आणि 115Nm टॉर्क असेल. त्याचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी (ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन) पर्यायांमध्ये आणले जाईल. यामध्ये, ड्रायविंग अजून आरामदायी होऊ शकते.
टाटा पंचच्या पेट्रोल व्हेरियंटमध्ये अलीकडेच अपडेट करण्यात आले आहे. यात 10.25 -इंच टचस्क्रीन, वायरलेस फोन चार्जर, कूल्ड ग्लोव्हबॉक्स, सिंगल-पॅन सनरूफ, सेमी-डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, मागील व्हेंट्ससह ऑटो एसी आणि उंची अॅडजेस्ट करता येईल अशा ड्रायव्हर सीट फीचर्स समाविष्ट आहे.
त्याच वेळी, 2021 मध्ये ग्लोबल एनसीएपीने या कारची क्रॅश-टेस्टिंग केली, जिथे याला 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, त्यात 2 एअरबॅग्ज, ABS, EBD, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), मार्गदर्शक तत्त्वांसह रिव्हर्सिंग कॅमेरा, ISOFIX चाइल्ड सीट माउंट असे फीचर्स देण्यात आले आहे.