फोटो सौजन्य: Social Media
एक काळ जेव्हा फक्त रस्त्यावर इंधनावर चालणाऱ्या कार्स, बाईक्स, आणि स्कूटर दिसायच्या. पण आज ही स्थिती हळहळू बदलेली दिसत आहे. आज फक्त देशातच नव्हे तर जगभरात इलेक्ट्रिक वाहनं मोठ्या संख्येने वापरताना दिसत आहे. वाढत्या इंधनाच्या किंमतीमुळे अनेक ग्राहक सध्या इलेक्ट्रिक कार्सना प्राधान्य देताना दिसतात.
अनेक ऑटो कंपनीज सुद्धा आपल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनावर विशेष लक्ष देताना दिसत आहे. यावरून हे तर सिद्ध होते की येणारा आगामी काळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा असणार आहे. आता इलेक्ट्रिक कार्ससोबतच ई स्कूटर सुद्धा मार्केटमध्ये लाँच होताना दिसत आहे. लवकरच देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी म्हणजेच होंडा भारतात आपली पहिली वाहिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत आहे.
जपानी दुचाकी उत्पादक Honda Motorcycle and Scooter India (HMSI) अनेक सेगमेंटमध्ये बाईक आणि स्कूटर ऑफर करते. कंपनी आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर म्हणून Honda Activa Electric लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही स्कूटर लाँच होण्यापूर्वी याचा नवा टिझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. नवीन टिझरमध्ये कोणत्या प्रकारची माहिती उपलब्ध झाली आहे हे आपण या बातमीत जाणून घेऊया.
Honda ने अॅक्टिव्ह इलेक्ट्रिक लाँच करण्यापूर्वी एक नवीन टीझर रिलीज केला आहे. कंपनीने रिलीज केलेल्या नवीन टीझरमध्ये स्कूटरच्या बॅटरीबद्दल माहिती देण्यात आली आहे.
टिझरमध्ये अशी माहिती देण्यात आली आहे की फिक्स्ड बॅटरीशिवाय स्कूटरमध्ये स्वॅप करण्यायोग्य बॅटरीचा पर्यायही असेल. ज्यामध्ये एकाच वेळी दोन बॅटरी वापरल्या जातील.
फिक्स बॅटरी व्यतिरिक्त, स्कूटरमध्ये स्वॅप करण्यायोग्य बॅटरी आणल्यास रेंजचा प्रश्न दूर होईल. बॅटरी चार्ज करण्याऐवजी, ती जवळच्या स्वॅप करण्यायोग्य पॉईंटवर बदलली जाऊ शकते. बॅटरी बदलणे अवघ्या काही सेकंदात केले जाईल आणि रायडर आपला प्रवास सुरू ठेवण्यास सक्षम असेल.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझर आधीही तीन टीझर रिलीज झाले आहेत. ज्यामध्ये मोटारपासून ते Honda Activa इलेक्ट्रिकच्या फीचर्सपर्यंतची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत रिलीज झालेल्या टीझरमध्ये दोन प्रकारचे डिजिटल स्पीडोमीटर, एलईडी लाइट्स, रेंज, स्कूटरचे ड्रायव्हिंग मोड याविषयी माहिती देण्यात आले आहे.
Honda द्वारे 27 नोव्हेंबर 2024 रोजी भारतीय बाजारपेठेत Activa Electric लाँच केले जाईल. या स्कूटरसोबत कंपनी दुसरी इलेक्ट्रिक टू-व्हीलरही आणू शकते, जी बाईक किंवा दुसऱ्या स्कूटरच्या स्वरूपात आणली जाईल.
Honda ची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर म्हणून लाँच होणारी Honda Activa इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात Ola, Ather, Vida, TVS iQbue आणि चेतक या इलेक्ट्रिक स्कूटरशी थेट स्पर्धा करणार आहे.