फोटो सौजन्य: Social Media
आपली स्वतःची कार खरेदी करणे ही खूप मोठी गोष्ट असते. खरंतर कार खरेदी करताना त्यातील फीचर्सच नाही तर ती कुटुंबाला आवडेल का? याचाही विचार केला जातो. त्यातही जर आपले कुटुंब मोठे असेल तर योग्य कार निवडणे कठीण होऊन बसते.
जर तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी सर्वोत्तम 7 सीटर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 6 लाख रुपयांच्या बजेटमध्ये तुम्हाला उत्तम पर्याय उपलब्ध आहे. या कारमध्ये जागेची भरपूर सुविधा आहे, ज्यामुळे तुमच्या कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याला आरामदायक बसायला मिळेल. मोठ्या कुटुंबासाठी आदर्श असलेली ही कार तुमच्यासाठी एक उत्कृष्ट निवड ठरू शकते. आरामदायक, सुरक्षित आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून योग्य असलेली कार कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण करू शकते. त्यामुळे, कमी बजेटमध्ये चांगली आणि जागेची भरपूर सुविधा देणारी 7 सीटर कार खरेदी करणे तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.
‘या’ बाईकच्या किमतीत तब्बल 2 लाख रुपयांची कपात ! आता किंमत फक्त…
आपण ज्या कारबद्दल जाणून घेणार आहोत त्याचे नाव Renault Triber आहे, जे एक मल्टी पर्पज व्हेईकल (MPV) आहे. ही कार एका मोठ्या कुटुंबासाठी डिझाइन करण्यात आली आहे. रेनॉल्ट ट्रायबरची किंमत आणि फीचर्स काय आहेत त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
रेनॉल्ट ट्रायबरच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, या कारची किंमत 6 लाख 9 हजार रुपयांपासून सुरू होते. कमी बजेटमध्ये येणाऱ्या या 7 सीटर कारमध्ये उत्कृष्ट फीचर्स आहेत. ही कार 1.0-लिटर नॅचरली -एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह येते जी 72 पीएस पॉवर आणि 96 एनएम टॉर्क जनरेट करू शकते. या कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय आहे.
रेनॉल्ट ट्रायबरमध्ये 14-इंच फ्लेक्स व्हील दिसत आहे. यात पियानो ब्लॅक फिनिशसह ड्युअल-टोन डॅशबोर्ड, अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट असलेली टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, फुल डिजिटल व्हाइट एलईडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, नवीन स्टायलिश फॅब्रिक अपहोल्स्ट्री, क्रोम रिंगसह एचव्हीएसी नॉब्स, ब्लॅक इनर डोअर हँडल, ही फीचर्स आहेत.
10 हजारांपेक्षा कमी पैसे भरून Hunter 350 होईल तुमच्या नावावर, फक्त जाणून घ्या EMI चं संपूर्ण गणित
याशिवाय, ट्रायबर कारमध्ये पुश-बटण स्टार्ट/स्टॉप, सिक्स-वे अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, एलईडी डीआरएलसह प्रोजेक्टर हेडलॅम्प, स्टीअरिंगवरील ऑडिओ कंट्रोल यांसारखी फीचर्स देखील उपलब्ध आहेत. कारच्या मॅन्युअल व्हेरियंट 19 किमी प्रति लिटर पर्यंत मायलेज देते.
ही एमपीव्ही कार एकूण 10 व्हेरियंटमध्ये बाजारात उपलब्ध आहे. ही कार प्रति लिटर 20 किलोमीटर मायलेज देते. कारमध्ये 84 लिटरची बूट स्पेस आहे. थर्ड रो सील्ड फोल्ड करून 625 लिटरपर्यंत ही बूट स्पेस वाढवता येते.