
फोटो सौजन्य: Gemini
Maruti S-Presso च्या STD (O) व्हेरिएंटची किंमत याआधी 4.26 लाख रुपये होती. GST कपातीनंतर ती घटून 3.49 लाख रुपये झाली आहे. म्हणजेच ग्राहकांना सुमारे 76,600 रुपयांचा फायदा झाला आहे. जवळपास 18 टक्के किंमत कपात झाल्याने ही कार आता बजेट सेगमेंटमधील सर्वाधिक मागणीची आणि स्वस्त कार ठरली आहे.
पूर्वी भारतातील सर्वात स्वस्त कार म्हणून Maruti Alto K10 कडे पहिले जायचे, मात्र आता ती दुसऱ्या स्थानावर आहे. याच्या STD (O) व्हेरिएंटची किंमत 4.23 लाख रुपयांवरून घटून 3.69 लाख रुपये झाली आहे. यामुळे ग्राहकांना सुमारे 53,100 रुपयांची बचत होत आहे. किफायतशीर किंमत आणि विश्वासार्ह परफॉर्मन्समुळे Alto K10 आजही लोकप्रिय आहे.
Renault Kwid आता देशातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात स्वस्त कार ठरली आहे. याच्या 1.0 RXE व्हेरिएंटची किंमत 4.69 लाख रुपयांवरून कमी होऊन 4.29 लाख रुपये झाली आहे. यामध्ये सुमारे 40,000 रुपयांचा फायदा मिळतो. SUV-स्टाइल डिझाइन आणि बजेट-फ्रेंडली किंमत यामुळे एंट्री-लेव्हल ग्राहकांसाठी Kwid हा उत्तम पर्याय आहे.
Tata Tiago ही भारतातील चौथ्या क्रमांकाची सर्वात स्वस्त कार आहे. पूर्वी याच्या XE व्हेरिएंटची किंमत 4.99 लाख रुपये होती, मात्र GST कपातीनंतर ती 4.57 लाख रुपये इतकी झाली आहे. म्हणजेच ग्राहकांना सुमारे 42,500 रुपयांचा फायदा झाला आहे. मजबूत बिल्ड क्वालिटी आणि आकर्षक डिझाइनमुळे Tiago या किमतीत व्हॅल्यू फॉर मनी ठरते.
1 लिटर पेट्रोलवर 65 किमी धावण्याची धमक! Hero Splendor ला प्रत्येकवेळी पाणी पाजते ‘ही’ बाईक
Maruti Celerio देखील भारतातील स्वस्त कार्सच्या यादीत सामील आहे. याच्या LXI व्हेरिएंटची किंमत 5.64 लाख रुपयांवरून घटून 4.69 लाख रुपये झाली आहे. यामध्ये ग्राहकांना सुमारे 94,100 रुपयांची बचत होते. जवळपास 17 टक्के किंमत कपात झाल्यामुळे Celerio आता आणखी किफायतशीर पर्याय बनली आहे.