फोटो सौजन्य: Gemini
Ola-Uber चा बाजार उठला म्हणून समजाच! भारत सरकारचा ‘हा’ ॲप ड्रायव्हरला देईल 100 टक्के भाडे
मारुती सुजुकीने आपली पहिली इलेक्ट्रिक कार E-Vitara भारतीय बाजारात अधिकृतपणे रिव्हील केली आहे. याचे लाँच जानेवारी 2026 मध्ये होणार आहे. ही कार लाँच होण्यापूर्वीच या कारने Bharat NCAP क्रॅश टेस्ट उत्तीर्ण केली असून तिला 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. Adult Occupant Protection (AOP) मध्ये या कारला 32 पैकी 31.49 गुण तर Child Occupant Protection (COP) मध्ये 49 पैकी 43 गुण मिळाले आहे.
टाटा मोटर्सच्या अनेक इलेक्ट्रिक कारना इंडिया एनसीएपीकडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. या कारमध्ये पंच ईव्ही, हॅरियर ईव्ही, नेक्सन ईव्ही आणि कर्व्ह ईव्ही यांचा समावेश आहे.
भारतीय बाजारात टाटा मोटर्सनंतर सर्वाधिक इलेक्ट्रिक कार्स महिंद्रा कंपनीकडे आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देताना महिंद्राने आपल्या ईव्ही मॉडेल्समध्ये उत्कृष्ट सेफ्टी फीचर्स दिले आहेत. महिंद्राच्या अनेक इलेक्ट्रिक गाड्यांनी Bharat NCAP क्रॅश टेस्ट उत्तीर्ण करत 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवले आहे. या यादीमध्ये Mahindra XUV400 EV, XEV 9e आणि BE 6 या मॉडेल्सचा समावेश आहे.
Mahindra XUV400 EV






