फोटो सौजन्य: Gemini
Bharat Taxi हे जगातील पहिले National Mobility Cooperative App असून ते Sahkar Taxi Cooperative Ltd ही मल्टी-स्टेट सहकारी संस्था चालवते. या ॲपमध्ये कोणत्याही शासकीय विभागाची हिस्सेदारी नाही. या प्लॅटफॉर्मची सर्वात मोठी खासियत म्हणजे ॲपचे मालक स्वतः ड्रायव्हरच असतील. त्यामुळे ड्रायव्हर आपली संपूर्ण कमाई स्वतःकडे ठेवू शकतील, तसेच त्यांच्यावर कोणताही कमिशन किंवा हिडन चार्ज लागू होणार नाही. याशिवाय त्यांना दरवर्षी नफ्यातून हिस्सा आणि डिव्हिडेंडदेखील मिळेल.
543 Km रेंज, 7 एअरबॅग्स आणि ADAS फिचर! Maruti E-Vitara कंपनीसाठी का गेमचेंजर ठरणार? जाणून घ्या
सध्या दिल्ली आणि सौराष्ट्र/गुजरातमधील 51,000 पेक्षा अधिक ड्रायव्हर्स या ॲपशी जोडले गेले आहेत, ज्यामुळे हे जगातील सर्वात मोठे ड्रायव्हर-ओन्ड प्लॅटफॉर्म बनले आहे.
2 डिसेंबर 2025 पासून Bharat Taxi ॲपचे सॉफ्ट लाँच दिल्ली आणि गुजरातमध्ये सुरू झाले आहे. हा ॲप सध्या Android वर उपलब्ध असून iOS आवृत्ती लवकरच येणार आहे. या प्लॅटफॉर्मवर स्कूटर, बाईक, ऑटो, टॅक्सी आणि कार – सर्व वाहनांची सेवा एकाच ॲपवर मिळणार आहेत.
Kia ने सबको बुझा दिया! मार्केट हलवून सोडलं; नोव्हेंबरमध्ये तब्बल ‘इतक्या’ वाहनांची केली विक्री
ॲपमध्ये योग्य भाडे दाखवले जाईल आणि कोणताही हिडन चार्ज नसेल. तसेच वापरकर्त्यांना लाइव्ह ट्रॅकिंगची सुविधा मिळेल. हा ॲप अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असेल. ड्रायव्हर आणि प्रवासी दोघांसाठीही 24×7 हेल्पलाइन असेल.
सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांसोबत मिळून फीचर्स तयार केले जात आहेत आणि प्रत्येक ड्रायव्हरची काटेकोर तपासणी केली जाणार आहे.
Bharat Taxi ला भारतातील अनेक प्रमुख सहकारी संस्थांचा पाठिंबा मिळाला आहे, जसे की IFFCO, NCDC, AMUL (GCMMF), NABARD, NDDB, NCEL, KRIBHCO आणि Sahkar Bharati.
या संपूर्ण मॉडेलमध्ये सरकारचा कोणताही आर्थिक सहभाग नाही, आणि ॲपचा संपूर्ण ताबा ड्रायव्हर्स व सहकारी संस्थांकडेच राहणार आहे.






