Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Best Mileage Family Cars: बजेटचा विचार अन् मायलेजची चिंता? ‘या’ फॅमिली Car देतील दोन्हीचं Perfect कॉम्बिनेशन

Best Mileage Family Cars: : दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवीन कार घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी 10 लाख रुपयांच्या आत येणाऱ्या काही बजेट आणि मायलेज-केंद्रित कारचे पर्याय देण्यात आले आहेत. यामध्ये Maruti Alto K10, Maruti Celerio, Maruti Wagon R, Maruti Swift, Tata Punch आणि Hyundai Exter यांचा समावेश आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 20, 2026 | 01:20 PM
Best Mileage Family Cars: बजेटचा विचार (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Best Mileage Family Cars: बजेटचा विचार (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ₹3.69 लाखांपासून 10 लाखांच्या आत सहा बजेट-फ्रेंडली कारचे पर्याय.
  • Maruti Celerio CNG साठी 35.12 किमी/किलोपर्यंत मायलेजचा कंपनी दावा.
  • Tata Punch आणि Hyundai Exterसह हॅचबॅक आणि कॉम्पॅक्ट SUVचे पर्याय उपलब्ध.
Best Mileage Cars Under 10 Lakhs: दसरा आणि दिवाळी जवळ आली की सगळ्यांना वाटतं आपल्या घरी पण एक नवीन गाडी यावी. पण बजेट कमी असेल तर कोणती गाडी घ्यायची हा मोठा प्रश्न असतो. जास्त मायलेज पाहिजे, देखभाल खर्च कमी पाहिजे आणि फीचर्स पण चांगले पाहिजेत. टेन्शन घेऊ नका, आम्ही तुमच्यासाठी 10 लाखाच्या आत येणाऱ्या 6 भारी गाड्यांची लिस्ट आणली आहे. या गाड्या तुमच्या खिशाला परवडतील आणि रोजच्या वापरासाठी एकदम परफेक्ट आहेत.  Best Mileage Family Cars:

1. मारुती अल्टो K10 – सगळ्यात स्वस्त

पहिली गाडी घ्यायची असेल आणि बजेट खूपच कमी असेल तर अल्टो K10 पेक्षा दुसरा पर्याय नाही. ही मध्यमवर्गीयांची लाडकी गाडी आहे.

  • किंमत: फक्त 3.69 लाखापासून सुरू होते. याच्या बेस मॉडेलची ही किंमत आहे.
  • मायलेज: कंपनी सांगते की ही गाडी 1 लिटरमध्ये 24.8 किलोमीटर धावते.
  • फायदा: गाडी छोटी असल्याने ट्रॅफिकमध्ये चालवायला सोपी आहे. कुठेही पार्क करता येते आणि सर्व्हिसिंगचा खर्च पण एकदम कमी आहे.

2. मारुती सेलेरिओ – मायलेजची राणी

जर तुम्हाला सगळ्यात जास्त मायलेज पाहिजे असेल तर सेलेरिओ घ्या. पेट्रोलचे पैसे वाचवायचे असतील तर ही गाडी बेस्ट आहे.
  • किंमत: 4.69 लाखापासून सुरू होते.
  • मायलेज: पेट्रोलवर ही 26.6 किमी/लिटर देते आणि जर CNG घेतली तर तर तब्बल 35.12 किमी/किलो.
  • म्हणजे महिन्याचा पेट्रोलचा खर्च अर्धा होईल. रोजच्या वापरात पण ही गाडी 25 ते 30 चं मायलेज आरामात देते.
Mahindra xuv 3xo revx edge: SUV प्रेमींसाठी खुशखबर! 10 लाखांच्या बजेटमध्ये Mahindra XUV 3XOचं नवं व्हेरियंट लाँच

3. मारुती वॅगन आर – कुटुंबासाठी बेस्ट

वॅगन आर ही नावापासूनच सगळ्यांना माहीत आहे. उंच गाडी असल्याने आतमध्ये खूप जागा असते. डोक्याला भरपूर जागा आणि मोठी डिकी.

  • किंमत: 4.98 लाखापासून सुरू होते.
  • मायलेज: 26.1 किमी/लिटर.
  • फायदा: फॅमिलीसाठी एकदम आरामदायक आहे. 4-5 लोक आरामात बसू शकतात. लांबच्या प्रवासासाठी पण चांगली आहे.

4. मारुती स्विफ्ट – तरुणांची आवडती

तरुणांना स्पोर्टी दिसणारी गाडी हवी असेल तर स्विफ्ट एकदम भारी ऑप्शन आहे. लुक एकदम दमदार आहे आणि चालवायलाही मजा येते.
  • किंमत: 5.84 लाखापासून सुरू होते.
  • मायलेज: 23.2 किमी/लिटर पर्यंत मायलेज देते.
  • फायदा: दिसायला स्टायलिश आहे आणि फीचर्स पण भरपूर आहेत.

5. टाटा पंच – छोटा हत्ती, मजबूत बॉडी

तुम्हाला हॅचबॅक नको, थोडी मोठी आणि मजबूत गाडी हवी असेल तर टाटा पंच बघा. ही छोटी SUV आहे. रस्ता खराब असला तरी ही गाडी काहीच मानत नाही.
  • किंमत: 5.75 लाखापासून सुरू होते.
  • मायलेज: 18.0 किमी/लिटर.
  • फायदा: सगळ्यात मोठा फायदा म्हणजे सुरक्षा. हिला 5-स्टार सेफ्टी रेटिंग आहे. बॉडी एकदम मजबूत आहे आणि ग्राउंड क्लिअरन्स जास्त असल्याने खड्ड्यात पण अडकत नाही.

6. ह्युंदाई एक्सटर – फीचर्सचा बादशाह

नवीन टेक्नॉलॉजी आणि भरपूर फीचर्स हवे असतील तर ह्युंदाई एक्सटर घ्या. ही पण एक कॉम्पॅक्ट SUV आहे आणि तरुणांमध्ये खूप फेमस झाली आहे.
  • किंमत: 5.79 लाखापासून सुरू होते.
  • मायलेज: 19.0 किमी/लिटर.
  • फायदा: उंचावर बसल्यासारखं वाटतं, त्यामुळे रस्ता स्पष्ट दिसतो. लुक एकदम आकर्षक आहे आणि सेफ्टी फीचर्स पण आधुनिक आहेत.
तर या दिवाळीत तुमचं बजेट किती आहे आणि तुम्हाला गाडी कशासाठी हवी आहे याचा विचार करून यापैकी एक गाडी तुम्ही नक्की घेऊ शकता. कमी किमतीत जास्त फायदा देणाऱ्या या गाड्या आहेत.

Maruti Suzuki चा मोठा धमाका! Swift, Dzire आणि Baleno आता CNG Automatic; किंमत-मायलेज पाहून व्हाल थक्क

 

Web Title: Best mileage family cars under 10 lakh india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 01:20 PM

Topics:  

  • automobile news marathi
  • best car
  • CNG Price
  • Maruti

संबंधित बातम्या

Mahindra XUV : लोकांच्या मनात घर करणारी Mahindra XUV 3XO; अडीच वर्षांत 2.5 लाखांहून अधिक गाड्या विकल्या!
1

Mahindra XUV : लोकांच्या मनात घर करणारी Mahindra XUV 3XO; अडीच वर्षांत 2.5 लाखांहून अधिक गाड्या विकल्या!

Maruti Suzuki :  मस्तच! मारुती सुझुकिच्या तीन नव्या कार बाजारात,  मॉडेल्स, किंमत आणि मायलेज…जाणून घ्या
2

Maruti Suzuki : मस्तच! मारुती सुझुकिच्या तीन नव्या कार बाजारात, मॉडेल्स, किंमत आणि मायलेज…जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.