फोटो सौजन्य: iStock
नवीन वर्षात अनेक उत्तम कार्स लाँच करण्याची तयारी अनेक ऑटो कंपन्या करणार आहे. ज्याप्रमाणे 2024 चे वर्ष अनेक कार्सने गाजवले तसेच 2025 चे वर्ष सुद्धा नवीन आणि अत्याधुनिक कार्स गाजवत अशी आशा आहे. येणाऱ्या नवीन वर्षात जानेवारीमध्ये भारत मोबिलिटी 2025 नावाचा ऑटो इव्हेंट होणार आहे. या कार्यक्रमात अनेक ऑटो कंपन्या आपल्या आगामी कार्स लाँच करणार आहे. त्यामुळेच अनेक कार्सप्रेमींचे लक्ष या कार्यक्रमाकडे असणार आहे. त्यापैकीच एक कंपनी म्हणजे एमजी मोटर्स.
एमजी मोटर्स देशात अनेक उत्तम कार्स लाँच करत आहे. कंपनीच्या कार्स उत्तम परफॉर्मन्स आणि बेस्ट फीचर्समुळे ओळखल्या जातात. आता कंपनी आगामी Bharat Mobility 2025 मध्ये आपल्या कार्स सादर करणार आहे.
कमी किंमतीत कार खरेदी करण्याची आज शेवटची संधी, उद्यापासून ‘या’ कार्स होणार महाग
कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारीमध्ये होणाऱ्या भारत मोबिलिटी 2025 मध्ये एमजी मोटर्स तीन कार सादर किंवा लाँच करू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीकडून फुल साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये एक कार भारतात लाँच केली जाईल, दुसरी कार इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार म्हणून भारतात लाँच केली जाईल, तर तिसरी कार फक्त भारतातच सादर केली जाईल. यातील दोन कार ग्लोबल पोर्टफोलिओमधून घेतल्या जातील.
एमजी ग्लोस्टर कंपनीने फुल साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये ऑफर केली आहे. माहितीनुसार, भारत मोबिलिटी 2025 दरम्यान या कारचे फेसलिफ्ट व्हर्जन भारतीय बाजारपेठेत लाँच केले जाऊ शकते. ज्यामध्ये अनेक कॉस्मेटिक बदल केले जातील आणि काही नवीन फीचर्स जोडता येतील. पण सध्याच्या ग्लोस्टरमध्ये जे इंजिन वापरले आहे तेच इंजिन वापरणार आहे.
Year Ender 2024: यावर्षी ‘या’ बाईक्सने मार्केटला केले टाटा बाय बाय, आता दिसणार सुद्धा नाहीत
एमजी सायबरस्टर कंपनीने अनेक देशांमध्ये इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार म्हणून ऑफर केली आहे. भारतातही ही कार 17 ते 22 जानेवारी 2025 दरम्यान होणाऱ्या भारत मोबिलिटी 2025 मध्ये लाँच केली जाईल. ही कार ताशी 0-100 किलोमीटरचा वेग केवळ 3.2 सेकंदात गाठू शकते. कंपनी ही कार केवळ निवडक शोरूम एमजी सिलेक्टवर ऑफर करेल.
MG Mifa 9 देखील MG Motors ने ग्लोबल पोर्टफोलिओ मध्ये ऑफर केले आहे. आता ही कार पुन्हा एकदा भारत मोबिलिटी 2025 मध्ये सादर केले जाऊ शकते. याआधीही ही कार जानेवारी २०२३ मध्ये झालेल्या ऑटो एक्सपोमध्ये दाखवण्यात आली होती. जानेवारी 2025 मध्ये सादर केल्यानंतर काही महिन्यांनी ही कार अधिकृतपणे भारतात लाँच होईल अशी अपेक्षा आहे. हे इलेक्ट्रिक एमपीव्ही म्हणून भारतात येऊ शकते. ज्यामध्ये अनेक उत्तम फीचर्स दिले जाऊ शकतात.