फोटो सौजन्य: iStock
नवीन वर्ष सुरु होण्यास आता फक्त काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. नवीन वर्षात अनेक ऑटो कंपन्या नव्या धोरणासह येणार आहेत. यात ते कारची किंमत सुद्धा वाढवण्याची शक्यता आहे. भारतीय मार्केटमध्ये, मारुती, ह्युंदाई, टाटा, महिंद्रा, स्कोडा, फोक्सवॅगन, एमजी, निसान आणि मर्सिडीज बेंझ, बीएमडब्ल्यू, ऑडी, व्होल्वो सारख्या काही लक्झरी वाहन निर्माते कार विकत असतात.
वर्ष 2025 सुरू झाल्यानंतर, बहुतेक कंपन्या त्यांच्या कारच्या किंमती वाढवतील. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही कार खरेदी करणार असाल तर वर्षाच्या शेवटच्या दिवशी जुन्या किंमतीतच कार खरेदी करता येईल. चला जाणून घेऊया नवीन वर्षात कोणती कंपनी आपल्या कार्स महाग करणार आहे.
Year Ender 2024: यावर्षी ‘या’ बाईक्सने मार्केटला केले टाटा बाय बाय, आता दिसणार सुद्धा नाहीत
मर्सिडीज बेंझ कार खरेदी करणे नवीन वर्षापासून महाग होणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2025 पासून कंपनीच्या सर्व कारच्या किंमतीत तीन टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, जर ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत कोणत्याही वाहनाचे बुकिंग केले असेल तर त्या ग्राहकांना जुन्या किंमतीतच कार दिली जाईल.
नवीन वर्षापासून ऑडी इंडिया कार तीन टक्क्यांनी महाग करणार आहे. ही माहिती कंपनीने डिसेंबरमध्येच दिली होती. कंपनीने सुमारे 16 मॉडेल्स विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत.
Maruti च्या ‘या’ कारने ग्राहकांना पाडली भुरळ, तब्बल 30 लाख युनिट्सची विक्री करत तोडले रेकॉर्ड्स
बीएमडब्ल्यूने डिसेंबर 2024 मध्ये देखील माहिती दिली होती की कंपनी 2025 च्या सुरुवातीला आपल्या कार महाग करेल. कंपनी नवीन वर्षात आपल्या कार्स तीन टक्क्यांनी महाग करणार आहेत.
देशातील आघाडीच्या वाहन उत्पादकांपैकी एक असलेल्या मारुती सुझुकीने डिसेंबरमध्येच किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनीने म्हटले आहे की नवीन वर्षापासून ते आपल्या सर्व कारच्या किंमतीत चार टक्क्यांपर्यंत वाढ करणार आहेत.
ह्युंदाईने डिसेंबरमध्येच माहिती दिली होती की नवीन वर्षात कंपनीच्या कारच्या किंमतीत 25 हजार रुपयांनी वाढणार आहेत.
टाटा मोटर्सने हॅचबॅक ते एसयूव्ही सेगमेंटपर्यंत वाहने विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. कंपनीने नवीन वर्षात आपल्या कारच्या किंमतीत तीन टक्क्यांनी वाढ करणार असल्याची माहिती दिली आहे.
महिंद्र 1 जानेवारी 2025 पासून भारतातील त्यांच्या संपूर्ण कार्सच्या किंमतीत तीन टक्क्यांची वाढ करणार आहे.
एमजी मोटर इंडियाही नवीन वर्षापासून आपल्या वाहनांच्या किंमती 3 टक्क्यांनी वाढवणार आहे.
स्कोडा, किया, जीप, सिट्रोएन सुद्धा आगामी वर्षात कार्सच्या किंमती वाढवणार आहे.